लिसन तो, काल काय झालं तो श्याम आहे ना, मराठी मिड्यमचा गं. ही अॅप्रोचड मी अन म्हणतो कसा "माझ्याशी मैत्री करायला आवडेल का तुला?" याईकस!!! मैत्री? सरळ सरळ गर्लफ्रेन्ड बनशील का विचारायचं की. व्हाय कान्ट दे स्टे इन देअर औकात यार? तोंड बघा मैत्री म्हणे. आय टेल यु, सच क्रीप्स ना, बोट दिलं की सरळ हातच धरतात. टोटल फ्रीक्स गं.
तो एक ऊन्हाळी दिवस होता. आकाशात चिटपाखरूही दिसत नव्हतं. माणिकराव आज सकाळीच घरातून बाहेर पडले होते. झपाट्याने पावलं टाकत ते सासुरवाडीला निघाले होते. रणरणत्या उन्हामुळे त्यांचा जीव कासावीस झाला होता. म्हणून एका झाडाची सावली बघून ते घडीभर बसले. तंबाखूची चंची सोडली. गोळी दाढेखाली धरली. थोडा दम खाऊन पुन्हा चालू लागले. दिवस मावळतीला आला तेव्हा ते पिंपळगावी पोचले.
"सुमेss पावनं आलं बग" माणिकरावांना बघताच पारूआत्यांनी लेकीला हाळी दिली. आणि सुमाताई डोक्यावरून पदर घेत खुदकन लाजल्या.
आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने, मराठी मनावर गेली पन्नास वर्षे तरी आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदाची मोहोर ठसवून हसवत ठेवणाऱ्या अशोक सराफ या नटवराला नमन करावेसे वाटले. यंदा पंच्याहत्तरी गाठलेल्या त्यांना खरंतर आदराने, मानाने नटवर्य म्हणावे लागेल पण त्यांच्या खट्याळ विनोदी भूमिकांचा विचार करता 'नटवर' च जास्त जवळचे वाटेल. त्यांचा जन्म कधी कुठे झाला , मग शिक्षण नोकरी आणि रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास ही अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला इंटरनेटवर मिळूच शकते त्यामुळे त्या तपशीलात न जाता या लेखात मी फक्त मला भावलेला अशोक सराफ शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
जरा जरासे प्रेम करावे ,फार कशाला
कोमल हृदयी आत खोलवर वार कशाला
तिला पाहिजे स्वप्नामधला चंद्र उराशी
खोट्या खोट्या त्या स्वप्नांचा भार कशाला
शब्द पुरेसा असतो नाती तोडायाला
म्यानामधल्या तलवारीला धार कशाला
काळजातल्या कुपीत जर तू तिला ठेवतो
तिला पाहण्या सताड उघडे दार कशाला
वार शत्रूचे छातीवरती झेलत जावे
विश्वासाचे आप्त घातकी यार कशाला
रुसवा फुगवा भांडण तंटे आणि अबोला
सारे नखरे झेलत होतो ठार कशाला
षडरिपु आता आयुष्याला पुरुन उरले
उगा वाचतो गीतेचे ते सार कशाला
गदर २.०
सन्नी पाजींच्या फिल्मचं शूटींग संपत आलेलं आहे. आता ही फिल्म रिलीज व्हायच्या वाटेवर आहे.
गदरने भारतात सर्वाधिक पाहिली गेलेली फिल्म हा रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे. लगान पेक्षा अर्ध्या बजेट मधे बनलेल्या (३० करोड) या फिल्मने लगान पेक्षा जास्त बिझनेस केला. लगान सुद्धा चालली. पण तितका बिझनेस करायला लगानला दीड वर्षे लागलं. त्या वेळच्या ३० करोड मधे म्हणजे आजच्या दीडशे करोडच्या बजेट मधे बनलेल्या या फिल्मचा त्या वेळचा बिझनेस आजच्या जमान्यात पाचशे कोटी (फक्त तिकीट बारीवर) आहे.
नमस्कार माबोकर्स,
सुचेतसची वाटचाल धीमे धीमे सुरु आहे. तुम्हा सर्वाचा सपोर्ट वेळोवेळी मिळाला आहे, त्याबद्दल धन्यवाद __/\__
सुचेतसने लहान मुलांसाठी बालसाहीत्य युट्युब चॅनेल सुरु केले आहे. आत्ता सुरुवात आहे. एक एक व्हिडिओ येत जाईल.
आपल्या मुलांना नक्की दाखवा ही विनंती
चॅनेल लिंक - किलबिल गाणी गोष्टी
https://www.youtube.com/channel/UCLbZeEmMmdY2TaaQ9GmkO7Q
हिंदूस्थानातल्या महिलांना परधर्मिय अभिनेतेच का आवडतात ? त्यांच्या मुळे आज हे अभिनेते एव्हढे माजून राहीलेत कि ते आमच्या महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी कलाकारांचे चांगले चाललेले पिक्चर उतरवतात आणि त्यांचे घाणेरडे सिनेमे तिथे लावतात. वाळवीचे शोज कमी केल्याने त्याला जो
आर्थिक फटका बसला त्याच्यावर बोलणार का ?
साऊथ मधे दक्षिणेतले चित्रपट उतरवून तिथे या परधर्मिय कलाकारांचे चित्रपट लावून दाखवा बरं.
मला बरेच कलाकार आवडतात. त्यांचे चित्रपट सुद्धा आवडतात. या कलाकारांवर मला त्यांचे छंद / शैक्षणिक माहिती / कौटुंबिक माहिती / अफेअर्स / करीअर / त्यांचे रँकिंग या व अशा अनेक विषयांवर धागे काढायचे आहेत. पण मायबोलीवर जर एका कलाकारावर , चित्रपटावर किती धागे काढावेत याची काही मर्यादा असल्यास ते डिलीट झाले तर मेहनत वाञा जाईल यासाठी हा प्रश्न विचारला आहे. कृपया मार्गदर्शन करावे.