असच कै च्या कै

Submitted by सामो on 1 March, 2023 - 03:37

लिसन तो, काल काय झालं तो श्याम आहे ना, मराठी मिड्यमचा गं. ही अ‍ॅप्रोचड मी अन म्हणतो कसा "माझ्याशी मैत्री करायला आवडेल का तुला?" याईकस!!! मैत्री? सरळ सरळ गर्लफ्रेन्ड बनशील का विचारायचं की. व्हाय कान्ट दे स्टे इन देअर औकात यार? तोंड बघा मैत्री म्हणे. आय टेल यु, सच क्रीप्स ना, बोट दिलं की सरळ हातच धरतात. टोटल फ्रीक्स गं.
मोनिकाचं नाही, झालं. "काय?" म्हणजे काय, अरे डोच्यु नो? डोन्ट टेल मी तुला अजुनी माहीत नाही. तोच गं श्यामच्या क्लासरुममधलाच पार्थ त्यानेही मोनिकाला सरळ सरळ असच प्रपोझ केलं. अन दॅट सिली मोनिका, शी अ‍ॅक्सेप्टेड इट गं. टू मच ना! आय मीन हाऊ, हाऊ कॅन यु गेट सो डेस्पो? आपल्या शाळेत मुलं नाही का? वरती दे आर मच मोअर क्लासी. मराठी मिड्यमचाच मुलगा शोधण्यापेक्षा मी तर सरळ सुइसाईडच करेन आणि तशीही माझे खूप अ‍ॅम्बिशन्स आहेत. मला नवरा कॉन्व्हेन्टचाच हवा. अमेरीकेला घेउन जाणाराच हवा. कार आणि पे पॅकेज इज अ मस्ट नावाडेझ यार. या मराठी मिड्यमच्या मुलांना जमणारे का? साधं फाडफाड इन्ग्लिश येत नाही त्यांना. जाऊ देत आपण आपलं डोकं कशाला खपवा. माझी सेल्फी घे ना. लास्ट टाइम तू काढलेली हॉरिबल आलेली गं एकही लाईक नाही आली मला. डोन्ट नो व्हाय!
.
.
खूप वर्षांनी. जगाचे टक्के टोणपे खाउन शहाणी झालेली, केस पांढरे झालेली ती ..... फॉरेन-रिटर्नड श्यामला पहाते. हाय श्याम!! अरे ओळखलं नाहीस मला? नाही नाही मी तुझ्या शेजारची मावशी नाही रे. ईईईईईईईई!!! नाही नाही. मी बबिता. लिसन तो मला प्रपोझ केलेलं - अरे विसरलास? अरे इतकी घाई आहे का तुला? थांब ना.हां जरा बदलले आहे मी पण तू मात्र तस्साच हं. काय म्हणतोस? काय? कुठेतरी जायचं आहे म्हणतोस? बरं पण नंबर तर दे. अरे अरे .... ओहो ही तुझी बायको का? हाSSSय. (मनातल्या मनात श्यामच्या आकर्षक पत्नीचा हेवा करत वरकरणी आणि हिरमुसलेली .....) नाईस टु मीट यु. ही इज माय ओल्ड फ्रेन्ड यु नो! तेव्हा एकाच सोसायटीत रहायचो आम्ही. आणि शिवाय ....... ओह तुम्हाला अपॉइन्ट्मेन्ट? बरं बरं मग बोलूच. अरे पण श्याम तुझा फोन.... गेले वाटतं Sad जाऊ दे नाहीतरी उपयोग काय होता! तेव्हाच पटवला असता तर बरं झालं असतं. स्वप्न थोडी ना पडलं होतं मला आणि श्यामही इतका हॅन्डसम कुठे होता तेव्हा

Wink Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली मराठी मुली इतर राज्यातल्या मुलांत मॅरेज मटेरियल बघतात. त्यांना मराठी पोरं हिणकस वाटतात.
मराठी पोरं....
कुणी लग्नाला मुलगी देता का हो म्हणत आक्रंदतात .
कुठे नेतोय रे महाराष्ट्र आपण....

तुमचा लेख सत्य घटना असू शकते.

कै च्या कै पण छान......+१.

मुलींनाही काही अपेक्षा असतात किंवा असाव्यात हे ,लोक विसरतात.मुलगे मात्र एकच मुलीत सुंदर,लांब केसवाली(हा भूतकाळ झाला),सासू सासरे आणि कुलाचार सांभाळणारी हवी.परत नोकरी तर हवीच हवी.त्याठी 9 ते 5 अशी नोकरी असेल तर अधिक उत्तम!
अर्थात अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही ,पाय जमिनीवर असावेत.

कैच्या कै?
नाही, छे, वास्तव आहे. कैच्या कै आम्ही झाकून ठेवतो. झाकलेले कधीतरी कथा कादंबऱ्यांतून बाहेर काढतो. वी हॅव क्रिएटिवटी यू नो?

मस्तं Proud
मा़झ्यासोबत सेम किस्सा झालाय Lol
असं लिहायचा मोह आवरला. जेनुं काम तेनुं ठाय, बिजा करे सो गोता खाय.