Submitted by किरण कुमार on 13 February, 2023 - 06:03
जरा जरासे प्रेम करावे ,फार कशाला
कोमल हृदयी आत खोलवर वार कशाला
तिला पाहिजे स्वप्नामधला चंद्र उराशी
खोट्या खोट्या त्या स्वप्नांचा भार कशाला
शब्द पुरेसा असतो नाती तोडायाला
म्यानामधल्या तलवारीला धार कशाला
काळजातल्या कुपीत जर तू तिला ठेवतो
तिला पाहण्या सताड उघडे दार कशाला
वार शत्रूचे छातीवरती झेलत जावे
विश्वासाचे आप्त घातकी यार कशाला
रुसवा फुगवा भांडण तंटे आणि अबोला
सारे नखरे झेलत होतो ठार कशाला
षडरिपु आता आयुष्याला पुरुन उरले
उगा वाचतो गीतेचे ते सार कशाला
किरण कुमार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान. लिहिते राहा.
छान. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
वाह खूप छान.
वाह खूप छान.