मला बरेच कलाकार आवडतात. त्यांचे चित्रपट सुद्धा आवडतात. या कलाकारांवर मला त्यांचे छंद / शैक्षणिक माहिती / कौटुंबिक माहिती / अफेअर्स / करीअर / त्यांचे रँकिंग या व अशा अनेक विषयांवर धागे काढायचे आहेत. पण मायबोलीवर जर एका कलाकारावर , चित्रपटावर किती धागे काढावेत याची काही मर्यादा असल्यास ते डिलीट झाले तर मेहनत वाञा जाईल यासाठी हा प्रश्न विचारला आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
बहुचर्चित 'हृदयांतर' चित्रपट पाहिला, प्रोमो पाहून विषय कळला होताच तसा, पण विख्यात डिझायनर विक्रम फडणीस दिग्दर्शनात उतरतोय आणि तेही मराठीत म्हणून चित्रपट पहायची उत्सुकता होती.
पण चित्रपट पाहण्याचे मुख्य कारण आणि आकर्षण म्हणजे मुक्ता बर्वे अन सुबोध भावे... दोन्ही अतिशय उत्तम कलाकार, माझे अतिशय आवडते... आणि 'एक डाव धोबीपछाड'मधली त्यांची केमिस्ट्री तर इतकी मस्त होती,
त्यामुळे बऱ्याच वर्षांनी दोघे एकत्र येतायत म्हटल्यावर पिक्चर देखना तो बनता है बॉस... असा विचार करून गेले अन्.. भ्रमनिरास झाला!

आदित्यने दिग्दर्शित केलेला या पहिल्याच चित्रपटात मी नायकाची भूमिका करतो आहे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक प्रोजेक्ट्स मध्यंतरी आले, त्यावर विचार झाला, पण काही ना काही कारणाने ते पूर्णत्वास गेले नाहीत. पण 'पाऊलवाट' त्याला अपवाद ठरला. ही नवी वाट आदित्यला मराठी चित्रपटसृष्टीतल्या एका महत्त्वाच्या मुक्कामावर घेऊन जाईल, असा मला विश्वास आहे.