बहुचर्चित 'हृदयांतर' चित्रपट पाहिला, प्रोमो पाहून विषय कळला होताच तसा, पण विख्यात डिझायनर विक्रम फडणीस दिग्दर्शनात उतरतोय आणि तेही मराठीत म्हणून चित्रपट पहायची उत्सुकता होती.
पण चित्रपट पाहण्याचे मुख्य कारण आणि आकर्षण म्हणजे मुक्ता बर्वे अन सुबोध भावे... दोन्ही अतिशय उत्तम कलाकार, माझे अतिशय आवडते... आणि 'एक डाव धोबीपछाड'मधली त्यांची केमिस्ट्री तर इतकी मस्त होती,
त्यामुळे बऱ्याच वर्षांनी दोघे एकत्र येतायत म्हटल्यावर पिक्चर देखना तो बनता है बॉस... असा विचार करून गेले अन्.. भ्रमनिरास झाला!
चित्रपट तसा यथातथाच आहे, कहाणी तर आधीपासूनच माहिती, तशी सरधोपटच, फक्त प्रेझेंटेशन (?)उत्तम .... मोठ्ठालं घर, लॅव्हिश लाइफस्टाइल... थोडक्यात बॉलिवूडमध्ये, मुख्यत्वाने करण जोहर, सूरज बडजात्या यांच्या चित्रपटात
जे राहणीमान दिसतं ते ते सगळं... पॅकिंग मस्त पण आतला माल यथातथाच! एक जोडपं, त्यांच्या मुली, जीवन, त्या जोडप्यातल्या कुरबूरी, मग त्यांच्यावर येणारं संकट आणि मग ते एकत्र त्याला कसे सामोरे जातात इत्यादी इत्यादी....
मी जेवढ्या वरवर लिहीलं आहे ना हे सगळं, तेवढ्याच वरवर हे चित्रपटातही दाखवण्यात आलेलं आहे... म्हणजे शेखर (सुबोध) आणि समायराचं (मुक्ता) का पटत नाही, 12 वर्षांच्या संसारानंतरही त्यांचं काय चुकतयं वगैरे,
हे अगदीच वरवर दिसतं...एका टप्प्यानंतर भांडणाला वैतागून ते वेगळं व्हायचं ठरवतात, पण त्यांच्या मोठ्या मुलीला एक मोठ्ठा आजार होतो, ते खचतात म्हणून थोडावेळ एकत्र येतात... पण तिची ट्रीटमेंट सुरू झाल्यावर
पुन्हा त्यांचे मार्ग वेगळे होण्याकडेच....?
अरे म्हणजे कमॉन, स्वत:च्या पोटच्या पोरीला एक दुर्धर आजार झालाय आणि तुम्ही डिव्होर्सबद्दल काय बोलताय, म्हणजे एकत्र राहणं शक्य नसेल हे मान्य, पण प्रायॉरिटी काय आहे ते तर ठरवा. मध्येच भांडतात काय, मग
परत एकत्र येतात, मध्येच दिवाळीचा सीन? (साजरी करण्याबद्दल आक्षेप नाही, पण मुलगी पूर्णपणे बरी झालेली नसतानाही एवढं सेलिब्रेशन? मला तरी खटकलं)... कन्टिन्युइटी (सलगता) मला तरी दिसली नाही,
तुकड्या तुकड्यातला पिक्चर पाहण्यात कोणाला इंटरेस्ट?
मुलीचे केस गेल्यानंतर तिला धीर देण्यासाठी वडिलांनीही केस काढून टाकणं... ( अचाट आणि अतर्क्य... खरया आयुष्यात करत असतीलही, पण तरीही मला जरा जास्तच वाटलं) तो सीन पूर्पणणे गंडलेला आहे... सर्व प्रकारच्या भावभावना
दाखवण्यात, ( अभिनयात) मुक्ता आणि सुबोध कुठेच कमी पडत नाहीत, पण म्हणून इतका अतिरेक? इतर (सह!) कलाकार जाम म्हणजे जाम गंडलेत...
मनिष पॉल, हृतिक रोशन, शामक दावर वगैरे मोठमोठाली मंडळी घेऊन उगाच वाया घालवली आहेत, (नावापुरतीच घेतली आहेत खरंतर असं वाटतं).. त्यातल्या त्यात हृतिकचा क्रिशवाला सीन बरा जमला आहे, पण त्यातही आई एकटीच..
वडील कुठे जातात मध्येच? मुलीच्या महत्वाच्या ऑपरेशनच्या वेळेसही तीच परिस्थिती, आई ऑपरेशन थिएटरबाहेर अस्वस्थपणे येरझारा घालते, अन् पिताश्री कुठेत? तर बाहेर सिगरेटी फुंकतायत... आय मीन सीरियसली?
कठीण परिस्थितीत बायकोला धीर देण्याऐवजी सिगरेट? नक्की काय दाखवायचंय बॉस?
सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे गाणी, पार्श्वसंगीत.. इमोशनल करण्याच्या नादात एवढ्या मोठयामोठ्याने रडण्यात काय हाशील? त्याने प्रेक्षकांना बिलकूल रडायला येत नाही, उलटपक्षी इरिटेट जास्त होतं...
थोडक्यात काय, तर मुक्ता-सुबोधचे फॅन आहात (माझ्यासारखेच!) म्हणून (आणि अपेक्षा ठेवून..) चित्रपट बघायला जाणार असाल तर भ्रमनिरास करून घेण्याची तयारी ठेवा ( माझ्य़ासारखीच..!)
कारण फक्त कलाकार चांगले आहेत म्हणून चित्रपट चांगला असेलच असं नाही.. त्यासाठी इतर गोष्टींचीही ( दिग्दर्शक, सहकलाकार.. मुख्य म्हणजे कथा) गरज असतेच...
अन्यथा चित्रपट नाही बघितला तरी नुकसान नाही... 2-4 महिन्यात एखाद्या मराठी चॅनेलवर 'वर्ल्ड प्रिमिअर' पार पडेलच.
'हृदयांतर' पाहून माझं हृदयांतर बिलकूल झालेलं नाही, त्यामुळे विक्रम फडणीस आणि तथाकथित प्रभृतींचा चित्रपट पाहण्याचे धाडस पुन्हा करणे नाही..! कानाला खडा...!
हृदयांतर
Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 17 July, 2017 - 07:12
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकंदरीत कल्पना होतीच
एकंदरीत कल्पना होतीच भ्रमनिरास होणार याची. सुबोध मुक्तासाठी पहायची इच्छा होत होती. चकटफूच्या प्रतिक्षेत...
मीनाक्षीजी मी पण पाहिला, फक्त
मीनाक्षीजी मी पण पाहिला, फक्त मुक्तासाठी. पण घोर निराशा झाली.
कारण फक्त कलाकार चांगले आहेत
कारण फक्त कलाकार चांगले आहेत म्हणून चित्रपट चांगला असेलच असं नाही.. त्यासाठी इतर गोष्टींचीही ( दिग्दर्शक, सहकलाकार.. मुख्य म्हणजे कथा) गरज असतेच... >> फारच अपेक्षा तुमच्या.
चित्रपटाला चांगली कथा >> ऐतेन ! अशा बहुचर्चित बहुतांशी चित्रपटात सर्वांत दुर्लक्ष करण्यात येणारी गोष्ट म्हणजे कथा आणि त्या खालोखाल screenplay
हृद्यांतरः आता चित्रपट
हृद्यांतरः आता चित्रपट काढणारा आहे फॅशन डिझायनर मग काय सगळे कैच्यकै दिखाउ असणारच.
मला सुबोध भावे इतका काही आवडत नाही काही भुमिका सोडल्यास. मुक्ता बोर होते .....
मराठी चित्रपटाच्या मुख्य
मराठी चित्रपटाच्या मुख्य नटीचे नाव समायरा असे ठेवल्यावर कसे काय होणार ना त्याचे. उगाच हायफाय दाखवायचे म्हणुन कायपण खपवावे.