दोघे एका मोठ्या पिंपळाच्या झाडापाशी पोचले. विसाजी सीमाला म्हणाला -
" तू जरावेळ या झाडाखाली बस. मी दोन मिनिटात आलो." असं म्हणून त्याने तिला झाडाला टेकुन बसवल, आणि तो जाण्यासाठी वळणार तोच सीमाने विचारलं -
" आता कुठं जाता ? "
विसाजीने करंगळीच बोट दाखवलं. सीमाने खुदकन हसत मान डोलावली. विसाजी समोरच्या, रस्त्यापलीकडच्या झाडीत गेला. आता त्या मिट्ट काळोखात तिथे सीमा एकटीच होती. पुन्हा भीती तिच्या मनाला घेरू लागली. ती डोळे मिटून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. तिने एक दीर्घ श्वास घेतला. इतक्यात समोरच्या झाडीत जराशी खुडबुड झाली. सीमाचा श्र्वास घशातच अडकला.
•••••••
विसाजी परतताना विचार करत होता. सीमाच्या नावाशिवाय त्याला काहीच माहीत नव्हतं. महत्त्वाच म्हणजे ती एवढ्या रात्री एकटीच कुठे फिरत होती. ती काही काम होत, असं म्हणाली होती ; पण कसलं हे त्याने विचारलं नव्हतं, आणि तिनेही सांगितल नाही. डोक्यातले भलते सलते विचार झटकून तो झाडाजवळ आला. सीमा तिथे नव्हती. त्याच्या काळजात धस्स झालं. त्याने बॅटरीच्या प्रकाशात इकडे तिकडे पाहिलं. सीमाला हाका मारल्या ; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. ' सीमा पुढे तर निघून गेली नसेल ? ' त्याच्या मनात विचार आला. त्याने रस्त्यावर जाऊन पाहिलं. जिथपर्यंत नजर जात होती, तिथपर्यंत रस्ता पूर्णपणे मोकळा होता. तो निराश होऊन परत जागेवर आला. अचानक त्याच्या पाठीवर हात पडला. त्याने मागे वळून पाहिलं. मागे सीमा उभी होती. केस मोकळे सोडलेले. साडी चुरगळली होती. रागारागाने ती त्याच्याकडे बघत होती. मग घोगऱ्या, खरखरीत आवाजात ती बोलू लागली -
" पाच वर्षांपूर्वी याच झाडाखाली मी फाशी घेऊन जीव दिला होता. तुला काय वाटल ? तु इथे स्वत:च्या मर्जीने थांबलास ? नाही. मी तुला इथे थांबायला भाग पाडलं. आता मी तुला... हा हा हा "
हसत हसत तिने विसाजीचा गळा पकडला. त्याचा चेहरा मात्र शांत आणि निर्विकार होता. त्याने सीमाचे हात झटकले, आणी सणकन तिच्या थोबाडीत मारली. सीमा धडपडत खाली. कोसळली. तिथल्या एका मोठ्या दगडावर तिचं डोकं जोरात आपटल. डोकं गरगरू लागलं. समोरच दृश्य अंधुक, अस्पष्ट होऊ लागलं. शुद्ध हरपताना तिला दिसलं की विसाजी तिच्या डोक्याशेजारी बसला होता. त्याच्या हातातील सुरा तिच्या गळ्याजवळ येत चालला होता. अन् त्याच्या डोळ्यात होती एक अनामिक लालसा. ते त्याच्या डोळ्यातले ते भाव बघून तिला एकच व्यक्ती आठवली. ती म्हणजे लोकांची नरडी फाडून रक्त पिणारा माथेफिरू ' काळू खत्री. '
समाप्त
@ प्रथमेश काटे
हसत हसत तिने विसाजीचा गळा पकडला. त्याचा चेहरा मात्र शांत आणि निर्विकार होता. त्याने सीमाचे हात झटकले, आणी सणकन तिच्या थोबाडीत मारली. सीमा धडपडत खाली. कोसळली. तिथल्या एका मोठ्या दगडावर तिचं डोकं जोरात आपटल. डोकं गरगरू लागलं. समोरच दृश्य अंधुक, अस्पष्ट होऊ लागलं. शुद्ध हरपताना तिला दिसलं की विसाजी तिच्या डोक्याशेजारी बसला होता. त्याच्या हातातील सुरा तिच्या गळ्याजवळ येत चालला होता. अन् त्याच्या डोळ्यात होती एक अनामिक लालसा. ते त्याच्या डोळ्यातले ते भाव बघून तिला एकच व्यक्ती आठवली. ती म्हणजे लोकांची नरडी फाडून रक्त पिणारा माथेफिरू
दोन भूतं? की दोन माथेफिरू?
दोन भूतं? की दोन माथेफिरू?
आवडली गोष्ट. मला आधी वाटलंं
आवडली गोष्ट. मला आधी वाटलंं कि "भुताचा जन्म" च्या वळणावर जाणार पण तसंं झालंं नाही.
दोन भूतं? >>> असा त्विस्त
दोन भूतं? >>> असा ट्विस्ट द्यायला पाहिजे होता.
"सीमा त्याच्या हातातून निसटली आणि उडून जाऊन झाडावर बसली. विकट हास्य करत म्हणाली,
"काळू खत्री, मै तुम्हारे बसमे नही आनेवाली. हा हा हा."" इत्यादी.
सीमा भूत नव्हती. तसं असतं तर
@मी चिन्मयी :- सीमा भूत नव्हती. तसं असतं तर विसाजी तिच्यावर हात उगारूच शकला नसता ना. सीमा फक्त विसाजी ची मस्करी करू पाहत होती ; पण... आणि विसाजी सुद्धा भूत नव्हता.
सीमा भुत होती आणि माथेफिरु
सीमा भुत होती आणि माथेफिरु माणूस भुताला सुद्धा सोडत नाही असा काहीतरी संदेश देऊन थोडं देशाच्या राजकारणावर प्रतीकात्मक कथा अधिक छान जमली असती.
@केशवकूल - आयडिया तर भन्नाट
@केशवकूल - आयडिया तर भन्नाट आहे सर. कुठे होतात ? पण फक्त कथेचा genre बदलला असता.
प्रथमेश काटे>> कथेचे मालक
प्रथमेश काटे>> कथेचे मालक तुम्ही आहात. माझे आपले लाउड म्युसिंग. विसरून जा.
@केशवकूल :- नाही हो. मी खरंच
@केशवकूल :- नाही हो. मी खरंच हे रागाने म्हणालो नाहीये. तुम्ही गमतीशीर कमेंट केलीत. त्याला तसाच प्रतिसाद दिला. आणि तुमची आयडिया खरच भन्नाट होती.
@अज्ञानी - खरंय ; पण देशाच्या
@अज्ञानी - खरंय ; पण देशाच्या राजकारणावर भाष्य करणं मोठं आव्हानात्मक काम आहे.