#littlemoments

एक झुळुक!

Submitted by छन्दिफन्दि on 14 February, 2025 - 01:29

गेल्या वर्षीचा १४ फेब्रुवारी, माझा इकडच्या ( अमेरिकेतील) हायस्कूल मधील पहिलाच व्हॅलेंटाईन डे.. म्हणजे (बदली) शिक्षिका म्हणून!
एरव्हीसुद्धा चिवचिवटाने गजबजणारी शाळा आज तर जास्तच बहरलेली.
फूल, फुगे, मऊ टेडी बेअर्स, चकचकीत गिफ्ट बॅग्स - अगदी “देता किती घेशील दोन करांनी’ अशी बऱ्याच जणींची अवस्था होती - अशी प्रेमसंपत्ती दोन्ही हातांत सांभाळत त्या षोडषा अगदी फुलपाखरांसारख्या भिरभिरत होत्या.

विषय: 
शब्दखुणा: 

चित्रावरून लिखाण: घरटं !

Submitted by छन्दिफन्दि on 8 March, 2024 - 03:13

दुसरीच्या वर्गाची पालकसभा संपतच आलेली, तेव्हढ्यात “आता ह्या वेळचा प्रोजेक्ट म्हणजे मुलांना एक घरट बनवायचय ..” , बाईंच्या ह्या घोषणेने एकदम शांतता पसरली.
“ काय? घरट… ?? खऱ्या खुऱ्या पक्षा सारखं..” अशी प्रश्न मंजुषा मनात तयार होतेय तोच, वर्गाच्या मागच्या बाजूला जरा कुज बुज सुरू झाली, आणि लगेचच “ उह .. आह… वा..” असे उद्गार ऐकू आले, म्हणून मागे वळून बघितलं तर एका पालकांनी एक घरटच बाहेर काढलं होत

विषय: 
शब्दखुणा: 

चित्रावरून कथा: गुलमोहोर..

Submitted by छन्दिफन्दि on 14 February, 2024 - 14:10

कित्येक वर्षानी या एरियात आलोच आहोत तर सहज नजर टाकू या, म्हणून ती कॉलेजशी डोकावली.
पूर्ण एरिया सारखीच कॉलेजनेही कात टाकली होती. दोन मजल्यांची साधीशी बैठी इमारत जावून कित्येक मजली उंच चकाचक टोलेजंग लिफ्टवांली इमारत झाली होती, आण्टीचा चहाचा stall, वडापावची गाडी काहीच ओळखीचं दिसत नव्हतं.. अपवाद फक्त ..
एकमेव तो बहरलेला गुलमोहोर आणि त्याखाली तसाच, तिथेच असलेला तो बाक.
हळूच हसत त्या बाकावर हलकेच टेकेपर्यंत मन विजेच्या वेगाने गेलं होत पार २५ वर्ष मागे..

विषय: 
शब्दखुणा: 

कोरी पाटी !

Submitted by छन्दिफन्दि on 1 February, 2024 - 00:03

कोरी पाटी !
आज पगाराचा दिवस,लग्नानंतरचा पहिलाच पगार.
गेल्याच आठवड्यात तिने नवऱ्याला विचारून ठेवलेलं "अरे तू तर नाहीयेस इकडे, माझा पगार होईल पण मग मी घरी आईंना देऊ का पैसे ?" लग्नानंतर ते दोघे रिटायर्ड सासू सासऱ्यांबरोबर राहत होते.
"तू नको त्याची काळजी करू. मी बघतो." पण तिला स्त्री शिक्षण, स्वावलंबन, आत्मनिर्भरता इ . इ बरीच अस्मिता होती, त्यामुळे घरात असं काहीच काँट्रीब्युशन न देता राहणं तिच्या मनाला काही पटलं नाही. पण तो विषय तेवढ्यावरच राहिला. नवरा बाहेरगावी कामानिमित्त निघूनही गेला.

विषय: 
शब्दखुणा: 

द्राक्ष - द्राक्षाचा रस - वारुणी

Submitted by छन्दिफन्दि on 28 January, 2024 - 02:17

“दारू म्हणजे रे काय भाऊ? “ हा प्रश्न पडला नव्हता पण “ ते एक मादक द्रव्य असते आणि ते घेतल्यावर माणूस वेड्यासारखा बोलायला लागतो, नव्हे झिंग झिंग झिगाट ही करतो” ही माहिती मात्र मिळाली होती.
म्हणजे असा गैरसमज नसावा की घरी काही समस्या होती की काय. घरीच काय अख्ख्या बिल्डिंग मध्ये “दारू बिरू.. ?” छे छे. नावचं नाही, तर दारूचा ‘ द’ जरी कढला तरी चमकले असते.
आणि कोणतीही दूरसंचार साधने नसतानाही काही क्षणात कुजबुजत ती कर्णोपकर्णी झाली असती. आताचं what's app आणि FB पण मागे पडेल.
अशा बाळबोध वातावरणात वाढताना हे झिंगाट कळायचे कारण म्हणजे ..

विषय: 
शब्दखुणा: 

पाहुणे येती घरा...!

Submitted by छन्दिफन्दि on 17 December, 2023 - 03:43

मिली चित्रपट आठवतोय का?
मिलीच्या वाढदिवसाला लोकं येताच राहतात, अन्न कमी पडते. मग जी काय गंमत होते...
असच काहीसं कधी कधी आपल्या घरी पण होत..
***
माझी बहिण आणि मी एकदम विरुद्ध स्वभावाच्या. माझ्या मोजक्याच मैत्रिणी तर तिचा कायमच मोठा जनसंपर्क.
लहानपणची ही एक गंमत..

विषय: 
शब्दखुणा: 

दरवर्षी दिवाळीत!

Submitted by छन्दिफन्दि on 29 October, 2023 - 00:42

आमची दिवाळी ३ plots वर होत असे.
एक गावाला, बिनाफटाके बिनारोषणाई बिनामित्रमंडळींची दिवाळी. आमची अगदी नावडतीच म्हणा ना! एखाद् दोन दिवळीचं तिकडे गेलो असू. म्हणजे आम्हाला ( मी आणि बहीण) गणपती गावाला अगदी साग्रसंगीत आवडे पण दिवाळीची मजा मात्र शहरातच येई, ठाण्याला आणि आजोळी पनवेलला.

राखी मनातली....

Submitted by छन्दिफन्दि on 30 August, 2023 - 02:45

क्लास सुटल्यावर नेहेमी प्रमाणे ते निघाले. रात्री जरा एरवी ची वर्दळ थोडी थंडावली होती. नेहेमी प्रमाणे टाटा बाय बाय करून वेस्टर्नवाले वेस्टर्न ला गेले आणि सेन्ट्रलवाले ते दोघं गर्दी मधून वाट काढत प्लॅटफॉर्म वर आले.

विषय: 
शब्दखुणा: 

पावसाळी चारोळी, पाचोळी..

Submitted by छन्दिफन्दि on 24 August, 2023 - 00:43

मित्रहो ह्यांनी लिहिलेला मी पाऊस आणि कविता हा लेख वाचला.
पूर्वी मंगेश पाडगावकर लिज्जत पापडची जाहिरात म्हणून पावसाळ्यात एक. कविता करायचे ( ऐकून आहे, मी स्वतः कधी पाहिली / वाचली नाही ये, चुकीचं असेल तर कृपया सांगा)

शब्दखुणा: 

माझी अमेरिका डायरी - Pike Place Market, Seattle!

Submitted by छन्दिफन्दि on 20 August, 2023 - 22:47

सिएटल आणि “Pike Place Market” हे नाव जोडीनं मी बऱ्याच वेळेला ऐकलं होत.
आमचं हॉटेल डाऊनटाऊन मध्ये, मार्केट पासून अक्षरश: सातेक मिनिटे चालत होत. त्यामुळे चेक इन केलं, बॅगा टाकल्या, आणि आम्ही बाहेर पडलो.
सिएटल सिटी म्हणजे सॅन फ्रान्सिस्को चा बाप आहे असच वाटलं. अरुंद आणि भयंकर चढ/उतार असलेले रस्ते. चौथ्या ऍव्हेन्यू वरून नजर टाकली की खाली उतरत जाणारा रस्ता, बऱ्यापैकी अरुंद, दुतर्फा उंचच्या उंच बिल्डींग्स, त्या उतरत्या रस्त्यांच्या टोकाला सुरू होणार समुद्र.
नियमित दिसणाऱ्या बसेस, बस स्टॉप वरची माणसं , रस्त्याने चाललेले माणसांचे घोळके, तशीच लगबग.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - #littlemoments