
कित्येक वर्षानी या एरियात आलोच आहोत तर सहज नजर टाकू या, म्हणून ती कॉलेजशी डोकावली.
पूर्ण एरिया सारखीच कॉलेजनेही कात टाकली होती. दोन मजल्यांची साधीशी बैठी इमारत जावून कित्येक मजली उंच चकाचक टोलेजंग लिफ्टवांली इमारत झाली होती, आण्टीचा चहाचा stall, वडापावची गाडी काहीच ओळखीचं दिसत नव्हतं.. अपवाद फक्त ..
एकमेव तो बहरलेला गुलमोहोर आणि त्याखाली तसाच, तिथेच असलेला तो बाक.
हळूच हसत त्या बाकावर हलकेच टेकेपर्यंत मन विजेच्या वेगाने गेलं होत पार २५ वर्ष मागे..
इकडेच काढायचो सारी डे चे फोटो, हो आणि बऱ्याचदा assignment पूर्ण करणे, व्हायवा ची तयारी, तर कधी ताटकळत बसण, परीक्षे आधीचा शेवटच्या दहा मिनिटाला घाईघाई चा अभ्यास, तासनतास केलेली भंकस.. पर्स मध्ये सगळा संसार कोंबावा आणि तिची चेन तुटल्यावर सगळं बाहेर पडावं... तस एक एक करून सगळ्या आठवणी बाहेर पडत होत्या इतके वर्ष मनात खोलवर कुठेतरी दडपलेल्या..
आणि मग तो हसरा, तरतरीत चेहरा नाही आठवला तरच नवल..
इकडेच ती त्याच्या सगळ्या मित्रांना घायकुतीला येऊन विचारत होती, "कुठे गायब झालाय? आज तरी आलाय का? पाहील का कुठे त्याला?? "
वाक्यागणिक तिचा स्वर अधिक अधिरा होऊ लागलेला. तर इकडे ही मुलं मजेने हसतायत. असा राग आला होती एकेकाचा. कारणही तसच होत. तिच्याकडे एक इंटरव्ह्यू prep च पुस्तक होत ते सहज म्हणून त्याने तिच्याकडे मागितलं.. तिनेही लगेच दिलं. त्याला आता बरेच दिवस होऊन गेले होते.
आणि तीन दिवसांपूर्वीच त्यांच्या counselor ने campus interview ची नोटीस लावली होती.
पण तेव्हापासून ह्याचा पत्ताच नाही.
दोन दिवसांवर इंटरव्ह्यू येऊन ठेपला तरी ह्याचा पत्ता नाही.. त्यामुळे पुस्तकही नाही..
कुठून बुध्दी झाली त्याला पुस्तक दयायला, तिची चीड चीड सुरू झालेली.
पुढचे दोन दिवसही ह्याचा ठिकाणा नाही. बरं त्याचे मित्रही काही सांगेनात.. इकडे तिची घालमेल.. चडफड.
शेवटी इंटरव्ह्यूच्या एक दिवस आधी हा उगवला. झाडाखाली गप्पा टाकत बसलेला. लांबून त्याला बघताच ही पळत सुटली.. " काय पत्ता तुझा?पुस्तक कुठे ? इथे interview ची डेट लागलीय आणि तू गायब .. ते सुद्धा माझं पुस्तक घेऊन .. तुझ्या सगळ्या मित्रांना विचारलं.l... तरी.."
तिला तोडत तो म्हणाला, " रुक रुक् अभी भी टाईम है.. मैने कूछ sums मार्क किये है! तू वो कर लेना सब ठीक हो जायेगा.. टेन्शन मत ले..हो जायेगा तेरा..”
“ एक दिन मे हो जयेगा? क्या बात कर रहा है..??
खर तर वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता, अजून वेळ वाया गेला असता..
तिने फणकाऱ्याने पुस्तक घेतलं आणि चालू पडली.
दुसऱ्या दिवशी पाहिली राऊंड मस्तच गेली. त्याने सांगितली होती ती sums तिने केलीच त्या बरोबर अजूनही काही केली.
आणि काय आश्चर्य त्याने सांगितलेल्या टाईपचे प्रश्न होतेच.
पहिली राऊंड तरी बाहेर पडणार ह्याची खात्रीच पटली होती..
हर्ष वायू होऊन ती बाहेर पडतेय तोच, तो दिसला गुलमोहराखाली.. पटापट जाऊन त्याला गाठलं..
“ अरे तुने बताया वैसे ही problems थे, कैसे मिले? जो भी हो .. मुझे पहिले गुस्सा आया था ..लेकीन thanks रे..”
“कोई बात नहीं…”
“एक बात तो भुल ही गयी बताना… मुझे एक पेपर मिला बुक मे. तूने लिखा है क्या? तुझे शेर शायरी भी आती हैं?? और एकदम चांद - वांद .. सही है!!”
एव्हाना मित्राची नेत्र पल्लवी चालू झालेली त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत त्याने विचारले
“तु ने पढा पुरा?? समझा??””
“हो मग काय? बहुत ही अच्छा लगा… आणि तू ते कंसात काही शब्दांचे अर्थ लिहिलेलेस ना हिंदीत.त्यामुळे मग समजल… सही हैं.. कीपइट अप”
“Thank you,” गालातल्या गालात हसत तो म्हणाला.
अखेरच्या farewell party ला त्याने तिचा एकटीचाच फोटो काढू का विचारल्यावर मात्र येवढे फोटो तर काढतोय, अजून कशाला वेगळा हवा म्हणून तिने हसतच ते टाळलं.
लवकरच कॉलेज संपलं.. सुट्ट्या लागल्या.
अचानक एका संध्याकाळी फोन वाजला, “तू कल मिल सकती है? “
“क्यू??”
“ गाव निकल रहा हू. एक बार मिलना था…’
“कल नाही रे वो एक काम है..” अचानक भेटायच वगैरे म्हणतो, काय झालं एकदम?
थोड घुटमळत म्हणाला
“ वो क्या है ना. . I like you…”
“ कायय??”
अनपेक्षितपणे अस काही ऐकल्यावर ती खो खी हसायला लागली.
त्याने बावचळून “ तो फिर मिल सकती है क्या.. हस मत..”
त्याची टेप अडकली आणि इकडे हिला हसू आवरेना..
तेव्हढ्यात त्याचा कॉल ड्रॉप झाला. बहुदा त्याची coins संपली असावीत.
फोन ठेवल्यावर ती विचारात पडली आणि सगळे dits connects झाले,
त्याच तिच्याकडे पुस्तक मागणं, कठीण उर्दू शब्दांचा अर्थ कंसात हिंदी मध्ये लिहण, तो कागद पुस्तकात ठेवणं, आणि हो त्याच्या विषयी आठवडाभर विचारत असताना सगळ्यांचं (गालातल्या गालात) हसणं … ओ हो आणि त्या खाणा खुणा… अरे आपण आपल्याच दुनियेत होतो.. हे येवढे clues कसे नाही कळले..हसू की रडू कळेना तिची ट्युब पेटली की ती सोडून बाकी सगळ्यांना कल्पना होती त्याची..
तेव्हा land लाईन सोडले तर फोन नव्हते, सोशल मीडिया नव्हतं त्यामुळे त्यानंतर त्याच परत कधी संपर्क झालं नाही
***
झरकन सगळा चित्रपट डोळ्यासमोरून तरळला. नाही म्हणायला fb वर तिने त्याच नाव टाकून बघितलेल २-३ वेळेला उगाच आपलं “ तो सध्या काय करतो ते बघायला…” पण कासच काय आडनाव नीटसं आठवत नव्हतं, कॉलेज मध्ये सगळे पहिल्या नावाने तर हाक मारायचे..तिची तंद्री लागली.
एक माणूस गाडीतून उतरला आणि गुलमोहराखाली तिच्या दिशेने आला… तोच होता ती . दोघं एकमेकांकडे बघतच बसले. तो, “ मैं मेरे बच्चे की यहा ऍडमिशन करवाने आया हु.. तू यहा कैसे..?”
ती काही बोलणार तेव्हढ्यात,
वाऱ्याच्या झुळके सरशी गुलमोहराच्या पाकळ्या अलगद तिच्या हातावर पडल्या..आणि ती भानावर आली.
“असे योगायोग फक्त मूव्ही मध्येच घडते प्रत्यक्षात नाही, कस विसरले..” म्हणत हलकेच स्वतःशी हसत ती उठली..
****
ता. क
एका उपक्रमा अंतर्गत एक चित्रं देतात आणि त्यावर लिखाण करायचं.. यावेळचा हा एक फोटो.
चित्रकार: रिया ठोसर
ह्म्म्म योगायोग फारच
ह्म्म्म योगायोग फारच अविश्वसनिय आहे की.
चित्रावरुन कथा - कल्पना छान आहे.
योगायोग फारच अविश्वसनिय आहे
योगायोग फारच अविश्वसनिय आहे की.>>>> तिच्या डोक्यात त्याचा भास झाला/ किंवा तो आला असं वाटलं तिला...
अह्ह्ह ओके.
अह्ह्ह ओके.
छान!!!
छान!!!
छान कथा आहे
छान कथा आहे
चित्राला साजेशी
मायबोली गणेशोत्सव स्पर्धात असे चित्रावरून कथा स्पर्धा किंवा उपक्रम ठेवायला हवा..
मस्त कथा..!
मस्त कथा..!
चित्रावरून कथा हि कल्पना आवडली.
शर्मिला, ऋन्मेश, रुपाली
शर्मिला, ऋन्मेश, रुपाली प्रतिक्रियां साठी धन्यवाद!
हो चित्रकारांच्या परवानगीने चित्रावरून गोष्ट हा उपक्रम ठेवू शकतो .
शर्मिला, ऋन्मेश, रुपाली
शर्मिला, ऋन्मेश, रुपाली प्रतिक्रियां साठी धन्यवाद!
हो चित्रकारांच्या परवानगीने चित्रावरून गोष्ट हा उपक्रम ठेवू शकतो .
मस्तच.
मस्तच.
धन्यवाद अन्जु!
धन्यवाद अन्जु!
#valentine2025
#valentine2025
छान आहे कथा.
छान आहे कथा.
धन्यवाद कुमार१ !
धन्यवाद कुमार१ !