मित्रहो ह्यांनी लिहिलेला मी पाऊस आणि कविता हा लेख वाचला.
पूर्वी मंगेश पाडगावकर लिज्जत पापडची जाहिरात म्हणून पावसाळ्यात एक. कविता करायचे ( ऐकून आहे, मी स्वतः कधी पाहिली / वाचली नाही ये, चुकीचं असेल तर कृपया सांगा)
पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तद्वतच पावसाळी हवेत कवी नवकविना ही धुमारे फुटतात. आता त्याच्या साहित्यिक दर्जा वगैरे विषयी टीका न करता त्यांना त्या मोकळे पणाने इतरांबरोबर शेअर करता याव्या यासाठी हा धागा.
आम्ही कॉलेज मध्ये असताना चंगो ( चंद्रशेखर गोखले) ह्यांच्या चारोळ्या फार लोकप्रिय झाल्या होत्या, मग नंतर बऱ्याच लोकांनी केल्या असाव्यात. त्या वयात त्या फारच भारी वाटलेल्या. मग नंतर परत कधी त्याकडे विशेष लक्ष गेलं नाही.
पावसाळी चारोळी, पाचोळी, आठोळी... छोट्या हलक्या फुलक्या कविता तुमच्या किंवा तुम्हाला इतरांच्या आवडलेल्या इथे लिहा आणि धागा वाहता ठेवा.
ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत
ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत,
सौमित्रच्या आवाजातल कानात घुमत. मधे ह्याच्या खूप पोस्ट्स बघितल्या होत्या आणि सगळ्यांतून प्रेरणा घेत ट ला ट लावत एक शब्दचित्र रेखाटण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय...
ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं,
Ac पायी वीज मीटर आकाशाला भिडत
मन मात्र गावच्या बालपणात रमत
नाही AC नाही फॅन
एक झुला त्या आंब्याला बांध
वारा तो अवखळ कधी आंबे पाड,
तर कधी चिंचा चटक
चोखत चोखत झाडाला लटक
ऊन बिन काही नाही
गावाकडची आमची मस्त आमराई!
खूप गोड ग छन्दिफन्दि .
खूप गोड ग छन्दिफन्दि .
धागाही आवडला.
खूप गोड ग छन्दिफन्दि>>>
खूप गोड ग छन्दिफन्दि>>> धन्यवाद सामो!
धागाही आवडला.>> मग एखादी कविता/ चारोळी डकव
असा एक धागा होता माझा माबोवर
असा एक धागा होता माझा माबोवर
हा ही राहू द्या. तो ही बघा
पावसाळी कविता (एक धागा हौशी कवींसाठी)
https://www.maayboli.com/node/50396
हा ही राहू द्या. तो ही बघा
हा ही राहू द्या. तो ही बघा Happy
पावसाळी कविता (एक धागा हौशी कवींसाठी)
https://www.maayboli.com/node/50>>>
Okay त्याच्यावर टाकते. मी बघितलं नव्हता आधी.
हा बंद करते
पावसानं घरकुल कोसळल्याचं
पावसानं घरकुल कोसळल्याचं
लोकं बोललेत..
पण ते आधीच ढासळतांना पाहिलंय मी....
एकाच ठिकाणी काय ते पावसाळी
एकाच ठिकाणी काय ते पावसाळी भुछत्र्या उगवण्यासाठी जागा दिल्यास बरे असते संकलन आणि इतर बाबीसाठी
>>>>मग एखादी कविता/ चारोळी
>>>>मग एखादी कविता/ चारोळी डकव Bw
सध्या प्रतिभा आटली आहे. अजिबात काही सुचत नाही. शिळ्या कढीस ऊत आणते आहे.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/50396
शर्मिला ह्या धाग्यावर पण टाकू शकता. बराच जुना आहे.छान आहेत कविता..
धन्यवाद छन्दिफन्दि.
धन्यवाद छन्दिफन्दि.