धक्का !
Submitted by छन्दिफन्दि on 8 June, 2023 - 21:15
सकाळी बरोबर ११च्या ठोक्याला आम्ही दरवाज्यात पोहोचलो. ती आमची वाटच बघत होती. दार उघडून तिने आम्हाला आत घेतले. खूप मोठी खोली, खोली कसली मोठा हॉलच म्हणा ना आणि त्यात आम्ही तिघंच!
तिने अदबीने आम्हाला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले.
भरयला एक फॉर्म दिला.
आम्ही फॉर्म भरून दिला.
तिने आधीच सांगून ठेवलेली कागदपत्रे तिला दाखवली.
दोन मिनिटात तिने त्यांच्या कॉपीज केल्या. परत एक दोन सह्या करायला सांगितल्या.
गोड हसून म्हणाली, “ तुमचं काम झालं. एक दोन दिवसात घरी पत्र येईल. ”