वाचनवेळा
Submitted by संप्रति१ on 8 June, 2023 - 14:23
सकाळी अर्धा-एक तास हाताशी सापडतो. कामावर जातानाच्या रस्त्याकडेला एखादा बेंच/कठडा असतो. समोर तुरळक ट्रॅफिक असते. हळहळत जॉगिंग करणारे, आपण टुणटुणीत असल्याचा भास उत्पन्न करणारे काका-लोक असतात. स्वतःस मेंटेन करण्याची प्रतिज्ञा केलेल्या मुली असतात. त्यांचा हेडफोन्समधून कुणाशीतरी चिवचिवाट चाललेला असतो. असेल बॉयफ्रेंड वगैरे. मला त्यातलं काही कळत नाही. आणि मी त्यात लक्षही घालत नाही, कारण अप्सरा वगैरे तशा फारशा कुणी नसतात. जॉगिंग वगैरेतला फोलपणा कळल्यामुळे त्या घरीच मस्त झोपा काढत असतील. एक आपला अंदाज.
शब्दखुणा: