Submitted by रघू आचार्य on 7 June, 2023 - 11:32
समाज माध्यमात आयुष्याचा मोलाचा काळ व्यतीत केल्यावर तो वाया गेला नाही. काही न काही शिकवण मिळाली.
जर कुणी कुणाचाही अंधभक्त असेल तर त्याच्याशी वाद घालू नये. ही शिकवण तर इथल्या लोकांना बालपणापासूनच आहे. माझ्यासारख्या मंद व्यक्तीस ती अलिकडेच प्राप्त झाली आहे. त्यानुसार आता वादात कुणी म्हणाले कि बोवा हत्ती उडतो.
तर त्यास ओलांडे प्रश्न ( Cross questioning) करू नये.
आपण त्यास सांगावे कि "हे महान पुरूष / भद्र महिला, आपण जे सांगत आहात ते अगदीच योग्य आहे. मी ही हत्ती उडताना पाहिला आहे. सकाळीच आमच्या घराच्या गच्चीच्या कठड्यावर उडत येऊन बसला. आणि उडून गेला. हा पहा त्याचा फोटो.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा