एक पॉप गायक आणि एक व्हायलीन-वादिका एका रात्री भेटतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्याच रात्री तिला दिवस जातात. तिच्या वडिलांना हे पसंत नसते ते तिला दूर नेतात, नायकाला अर्थात तिचा पत्ता माहित नसतोच. पुढे बाळंतपणात बाळ दगावले असे खोटेच सांगतात तिला आणि त्या बाळाची रवानगी अनाथाश्रमात होते. तो सिनेमाचा नायक! आई वडिलांचा कसलाच आगा पिछा नसलेला. खरं तर त्यांना तो अस्तित्वात आहे हे पण माहित नसते. पण निव्वळ संगिताच्या जोरावर तो आपल्या आई वडिलांना भेटतो. मनमोहन देसाईंच्या चित्रपटात शोभेल अशी अतर्क्य योगायोगांनी भरलेली कथा!
पण...
काल मी यूट्यूबवर राजवाडे अॅन्ड सन्स पाहिला. त्यातील तगमग गाणे पुन्हा त्याच्या शब्दांसाठी आवडले.
म्युजिकल बीट्स सोबत गाणे ऐकल्याशिवाय या शब्दांतील मजा नाही कळणार म्हणून लिंक देते - https://www.youtube.com/watch?v=gWJX1xnkgyQ
अंधारात डोळे उघडून केली मी पहाट
अन धूम धावत जाता जाता फुटली वाट
आभाळ भरून स्वप्न पाहिले मी आज
अन पंख लावून त्यात मी उडले सुसाट
उडता उडता केले हवे तसे हातवारे
निखळून पडताना झेलले मी चंद्र तारे
ठिणग्या उडवत एकमेकावर घासले
तेवत ठेवत माझ्या मनातील धग
तगमग तगमग
तगमग तगमग
अफाट
असे शब्द आणि कल्पना सुचणार्याला हॅटस ऑफ !
दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईत, ‘मरिन लाईन्स’ला ‘ग्रीन ओनियन’ ( Green Onion) नावाचे एक रेस्तरॉ आहे. त्या वेळेस मी एका ‘ऑनलाईन ट्रॅव्हल मार्केटप्लेस’ असलेल्या कंपनीत कामाला असल्यामुळे या रेस्तरॉशी संबंधित असलेल्या ‘हॉटेल सपना मारिन’शी माझा व्यावसायिक संबंध येत असे. तिथल्या भेटीच्या वेळी माझ्या लक्षात आलं की, या रेस्तरॉमध्ये नायजेरियन पद्धतीचं जेवण मिळतं. त्यामुळे बरेच नायजेरियन लोक इथे ‘घरचं’ जेवायला म्हणून येतात आणि हॉटेलमध्ये राहायला देखील! आपण ‘रिसेप्शन डेस्क’ला जाऊन उभं राहिलो की हमखास कुणीतरी नायजेरियन व्यक्ती दिसतेच दिसते.
१२ सप्टेंबर.उंचपुऱ्या देखण्या जेरेमी ब्रेट ला जगातून गेल्याला आज २१ वर्षं होतील.अजूनही जुने बी.आर.चोप्रा महाभारत पाहिलेल्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचं नाव काढलं की फक्त नितीश भारद्वाज येतो तसं शेरलॉक होम्स म्हटलं की जगातल्या बहुतांश लोकांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त जेरेमी ब्रेट येतो.
आजही दहा ऑलटाईम ग्रेट लावणीमध्ये 'तिचा' समावेश होतो, मात्र ती लावणी ज्या सिनेमात होती तो सिनेमा जेंव्हा प्रदर्शित केला गेला तो सिनेमा दणकून पडला होता. या लावणीवरून संगीतकार, निर्माता- दिग्दर्शक यांच्यात मतभेद झाले परिणामी चित्रीकरण लांबले होते. शिवाय बजेट वाढले होते. चित्रपट पडल्यावर त्याची लांबी करून परगावी रिळे पाठवताना चक्क ही लावणीच कापून टाकली गेली अन सिनेमा उर्वरित ठिकाणी प्रदर्शित झाला पण डाळ शिजलीच नाही. पण कालांतराने लावणीने मात्र इतिहास घडवला. त्या लावणीची अन सिनेमाची रंजक कथा वाचायची आहे ? तर मग चला माझ्या या पोस्टसोबत जुन्या मराठी सिनेप्रवासाला ....
खालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने इकडे आलो आहे.अाता सर्वजण गणेश आगमनाच्या तयारीत असतील.त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो.
1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल?
साल २००८ पासून सुरु झालेल्या ह्या कार्यक्रमाचा सध्या नववा सिझन चालू आहे. पाकिस्तानातील विविध पारंपरिक गानप्रकारांना नव्या वाद्यमेळासोबत आणि नव्या आवाजात पेश करणे ही ह्या कार्यक्रमाची प्रमुख ओळख. ह्या कार्यक्रमाची कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्याचे नाव रोहेल हयात. त्यानेच ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या सहा सिझन्सची निर्मिती केली आहे. २०१४ म्हणजे सिझन ७ पासून स्ट्रिंग्स ह्या प्रसिद्ध बँडने ह्या कार्यक्रमाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली आहे.
गेले २-३ वर्षे माझा मुलगा तबला शिकतो आहे. आता शाळेमधे ऐच्छिक पियानो क्लासेस आहेत. मधे एका मित्राकडे छोटा किबोर्ड वाजवण्यात बराच इंटरेस्ट दाखवला होता आणि याचेपण क्लासेस असतात का विचारत होता. तेव्हा शक्य झाले नाही. आता शाळेतच शिक्षक येतील आणि त्याच वेळेत होईल म्हणून विचार करतो आहोत.
माझा प्रश्न असा की, तबला आणि पियानो एकमेकाना पूरक आहेत का? तबला तर बंद नाही करायचा. पियानोपण चालू केला तर काही गोंधळ उडणार नाही ना?
What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence
Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and
Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen
What a contrast......
Adding a line to this joke ...
India reached Mars and
Pakistan still trying to enter India