संगीत
तडका - शुभेच्छा नव-वर्षाच्या
शुभेच्छा नव-वर्षाच्या
करा निर्धार नव-वर्षाचा
यशप्राप्तीसाठी झटण्याचा
सुख-शांती-यश देखील
खुशी-खुशीने वाटण्याचा
मिळत राहील यश सदैव
तुमच्या सार्या प्रयत्नांना
जीवनी तुमच्या तत्परतेने
डिस्चार्ज मिळो यातनांना
झाला प्रफूल्लित मन:पुर्वक
हा घ्या शब्दफूलांचा गुच्छा
देतो आपणास स्नेहबंधाच्या
नव वर्षाच्या नव शुभेच्छा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
तडका - आमचे संविधान
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
दिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई हैं !
शौ(चौ) र्यनिखारे
पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली
तेव्हां
काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर
गजला करत उभा होता
बाजी बोलला
जमवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली
आता मायबोली सर्चमधून
तेच तेच जुने मतले काढून
राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो.
...
मात्र उजवीकडून येणारा
याकुबचा जनाजा म्हणाला
भगविच्या , बघतोच तुला !
एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं
एका काफियासाठी प्राण डोळ्यात आले असताना
पन्नास हजार हिरवे कानात कुजबुजले
तुझ्या सम्मेलनात इतकी माणसं जमतात का?
मतले आणि काफिये फुकटात देइन
उर्दू साहित्यातून.
तडका - गीतकार "खरा जादूगर"
ये कैसी अजब दास्ता हो गयी है
सुरय्या जमाल शेख ने 'ये कैसी अजब दास्ता हो गयी है' हे गाणं गायलं आणि त्यावर अभिनय केला तेव्हा ती साधारण 34 वर्षांची होती. 'रुस्तुम आणि सोहराब' (रुस्तुम ऐ सोहराब - 1963) ही तिच्यासाठी आजच्या भाषेत कमबॅक फिल्म होती. नायक पृथ्वीराज कपूर आणि प्रेमनाथ असे बुलंद नट होते. अजून एक माहिती म्हणजे सिनेमाचे दिग्दर्शक 'विश्राम बेडेकर' होते.
"शांताबाई" च्या निमित्ताने.... मराठी "ध" गाणी
यावेळी गणेशोत्सवाच्या वेळी जगाच्या अशा कोपऱ्यात होतो जिथे सार्वजनिक गणपतीची स्थापना तर झाली पण अगदी आरतीचा आवाजदेखील त्या खोलीच्या बाहेर पोचत नव्हता. लाउड स्पिकर, गाणी वगैरे कसलाच गोंधळ नव्हता.
ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी "शांताबाई" चे २-३ विनोद व्हाटस-अप वर आले आणि मला ओ की ठो काहीच संदर्भ लागला नाही. नंतर अचानक माझी ट्यूब पेटली आणि मी यु-ट्यूब वर ते गाणं ऐकलं. मजा आली ऐकायला. मनात विचार आला की या गाण्यावर विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचायला किती मजा आली असेल.
तडका - ऐका जरा
ऐका जरा
तीच्या नुसत्या वर्णनाने
मनंच्या-मनं भरून येतात
अन् तीचं नाव ऐकुणंच
म्हातारेही तरूण होतात
दुर-दुरून दुर-दुरपर्यंत
तीचे वारेही पोचले आहेत
तीची आठवण काढू-काढू
मनं सुध्दा नाचले आहेत
तीचं नाव तर सांगणारच
एवढी पण काय घाई आहे
दुसरी-तीसरी कोणी नाही
ती आपली शांताबाई आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
काय ऐकताय?
काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!
अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.
मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.
तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!