दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईत, ‘मरिन लाईन्स’ला ‘ग्रीन ओनियन’ ( Green Onion) नावाचे एक रेस्तरॉ आहे. त्या वेळेस मी एका ‘ऑनलाईन ट्रॅव्हल मार्केटप्लेस’ असलेल्या कंपनीत कामाला असल्यामुळे या रेस्तरॉशी संबंधित असलेल्या ‘हॉटेल सपना मारिन’शी माझा व्यावसायिक संबंध येत असे. तिथल्या भेटीच्या वेळी माझ्या लक्षात आलं की, या रेस्तरॉमध्ये नायजेरियन पद्धतीचं जेवण मिळतं. त्यामुळे बरेच नायजेरियन लोक इथे ‘घरचं’ जेवायला म्हणून येतात आणि हॉटेलमध्ये राहायला देखील! आपण ‘रिसेप्शन डेस्क’ला जाऊन उभं राहिलो की हमखास कुणीतरी नायजेरियन व्यक्ती दिसतेच दिसते.
सेरेंगेटी नॅशनल पार्क म्हणजे एरवी मागास असणार्या आफ्रिकेच्या भूमीवरचं अमूल्य जंगलवैभवच. आपल्या नैसर्गिक अधिवासात स्वच्छंदीपणे वावरणारणार्या इथल्या जंगली प्राण्यांनी स्थानिकांचं आणि पर्यटकांचं सहअस्तित्व निर्धोकपणे स्वीकारलं आहे. त्यामुळे सेरेंगेटीची सफारी हा एक अस्सल, जातीवंत अनुभव ठरतो.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
सध्या कामानिमित्त आफ्रिकेतील लायबेरिया देशातील मोन्रोव्हीया पोर्ट येथून निघून स्कॉट्लंडला जात आहे. वाटेत हॉलंड येथे डेन हेल्डर पोर्ट मध्ये ३-४ दिवस थांबणार आहे. ह्या प्रवासाचे फोटो इथे देत जाईन..
१. आमची बोट मोन्रोव्हीया पोर्ट मध्ये येताना...
२. अखेर धक्याला लागली...
http://www.maayboli.com/node/22217#new पहिला भाग इथे आहे.
पनीर भूर्जी बरोबर चपात्या करायचा बेत होता. सगळ्यांना गरमागरम चपात्या मिळाल्या, तेवढ्यात तव्यावर चुर्र चुर्र असा आवाज ऐकू यायला लागला. पहिल्यांदा आम्हाला काही कळलेच नाही. सूर्यप्रकाश तर होताच त्यामूळे पावसाची शक्यता कुणाच्याच लक्षात आली नाही. बघता बघता सोसट्याचा वारा सुटला. वारा अडवायला खाली झाडे नसल्याने तो अंगाला बोचायला लागला.
आणि थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरु झाला. आमचे टेंट वार्याने फडफडू लागले.
आफ्रिका खंडात अनेक वैशिष्ठपूर्ण सरोवरे आहेत आणि त्यापैकी ३ केनयात आहेत.
जगातील दुसर्या क्रमांकाचे गोड्या पाण्याचे सरोवर (क्षेत्रफळ ६७००० चौ. कि.मी.) लेक व्हिक्टोरिया चा काही भाग केनयात आहे. युगांडा, केनया आणि टांझानिया या तिन्ही देशांच्या सीमा या सरोवरात मिळतात आणि नाईल नदीचा उगम या सरोवरात होतो. या सरोवराच्या काठी मी २ वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्य केले आहे.