लेक नैवाशा भाग २
http://www.maayboli.com/node/22217#new पहिला भाग इथे आहे.
पनीर भूर्जी बरोबर चपात्या करायचा बेत होता. सगळ्यांना गरमागरम चपात्या मिळाल्या, तेवढ्यात तव्यावर चुर्र चुर्र असा आवाज ऐकू यायला लागला. पहिल्यांदा आम्हाला काही कळलेच नाही. सूर्यप्रकाश तर होताच त्यामूळे पावसाची शक्यता कुणाच्याच लक्षात आली नाही. बघता बघता सोसट्याचा वारा सुटला. वारा अडवायला खाली झाडे नसल्याने तो अंगाला बोचायला लागला.
आणि थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरु झाला. आमचे टेंट वार्याने फडफडू लागले.