मोन्रोव्हिया, लायबेरिया ते अबर्डीन, स्कॉट्लंड व्हाय डेन हेल्डर...

Submitted by सेनापती... on 2 April, 2012 - 14:41

सध्या कामानिमित्त आफ्रिकेतील लायबेरिया देशातील मोन्रोव्हीया पोर्ट येथून निघून स्कॉट्लंडला जात आहे. वाटेत हॉलंड येथे डेन हेल्डर पोर्ट मध्ये ३-४ दिवस थांबणार आहे. ह्या प्रवासाचे फोटो इथे देत जाईन.. Happy

१. आमची बोट मोन्रोव्हीया पोर्ट मध्ये येताना...

२. अखेर धक्याला लागली... Happy

३. चला पटापट जागा पकडून घ्या बसायला नाहीतर नंतर जागा मिळायची नाही.. Lol

४. तासाभरात बोटीने किनारा सोडला. हॉलंडच्या दिशेने प्रयाण... Happy

५. डेन हेल्डर पोर्टमध्ये आपले स्वागत आहे... Happy

६. चला जरा भटकुया..

७. फार लांब नाही आलोय.. ती काय बोट दिसतेय अजून..

८. डेन हेल्डर हा डचांचा आजही उत्तरेकडचा सर्वात मोठा नाविक तळ आहे. हे तोफ इतिहासात इंग्रजांविरुद्ध कधीतरी नक्की वापरली गेली असणार. Happy

९. 'दे जटर' - हा कोण होता ते मी अजून गुगल करून शोधलेले नाही. Happy

१०. बोटीला उपग्रहाशी जोडणारा डोम.. ह्याच्यामुळे तुमच्याशी संपर्कात राहतो.. Happy

११. बाय बाय डेन हेल्डर..

काही दिवसात अबर्डीन मार्गे जमिनीवर टेकीन आणि घरी पोचलो की पुढचे फोटो देईन इथे... तोपर्यंत.......
.
.

अपूर्ण...

गुलमोहर: 

काय राव.... मला वाटलं तुमची बोट लै भली मोठी असेल. पण ही तर फोटोत लै छोटी
दिसतेय Happy
(अरेच्चा, फोटो छान आहेत हे लिहायच राहुन गेलय का? असु दे असु दे. सगळे फोटो आले की मग लिहु एकदाच Wink )

काय राव.... मला वाटलं तुमची बोट लै भली मोठी असेल. पण ही तर फोटोत लै छोटी
दिसतेय
>>> ज्याप्रकाराच्या बोटीवर मी काम करतो त्यामानाने ही मोठीच आहे. माल वाहतूक करणारी ही बोट नव्हे.. Happy त्या खूप मोठ्या असतात.. Happy

लाजो.. मलापण जायचं एकदा क्रुझ वरून फिरायला.. Happy म्हणजे पाण्यात जाऊन आराम करायचा, काम नाही हे पण अनुभवता येईल... ::D

दिनेशदा... त्यादिवशी काढले ते टाकले.. आता जसे जसे काढीन ते इथे देत जाणार आहे.. Happy घागा अपडेट करत राहीन.. Happy

धन्यवाद कंसराज ..

वर्षू नील.. होय होय.. ते फोटो काढतोच अधून मधून. ढगांचे खास करून मस्त फोटो मिळतात कधी कधी.. Happy

लले... फोटो बघुन मळमळतय का?>>> Proud
मला वविमधली पाण्याच्या हौदापासून चार हात लांब उभी असलेली लली आठवली Wink
सेनापती, मस्तच फोटो, पुढील फोटोच्या प्रतीक्षेत Happy

सेन्या, पहिला फोटो तू बोटीतून आधी उडी मारून पोहत किनार्‍यावर येऊन बोट धक्क्याला लागायच्या आधी काढलायस का? Proud

मस्त आहेत Happy

मस्त फोटो! Happy

समुद्री प्रवास करायल हवा एकदा तरी! सिंदबाद, कोलंबस, वास्को-द-गामा इत्यादी दर्यावर्दींच्या आयुष्यातले काही क्षण तरी अनुभवायला मिळावे!

वर अथांग अवकाश तर खाली नितळ अथांग सागर... दूर वर कोठेही जमिनाचा लवलेश नाही मग जाणिव होते आपण किती यःकश्चित आहोत ह्याची जाणिव होते!

< सेन्या, पहिला फोटो तू बोटीतून आधी उडी मारून पोहत किनार्‍यावर येऊन बोट धक्क्याला लागायच्या आधी काढलायस का? > + १ Proud + १

मस्त मला पण एक छोटी बोट घेऊन हिंडायचे आहे. वॉटरवर्ल्ड सिनेमातल्यावाणी. आम्ही पण तुमच्या बरोबर सफरीस येणार.

मस्त मला पण एक छोटी बोट घेऊन हिंडायचे आहे.
>> कदाचीत जरा खर्चिक पडेल पण गेट-वे जवळ करता येईल.. Happy एखादे बोट गटग... Wink

वा मस्त आहेत प्रचि. Happy
'दे जटर' - हा कोण होता > एक हात डोळ्यावर , आणि खांद्यावर दोरीच गुंडाळ दिसतय,
प्रथमदर्शनीतर हा एखादा गिर्यारोहक वाट्तोय, Wink