अश्रू

एक गांव रस्त्याच्या कडेला

Submitted by Meghvalli on 18 March, 2024 - 04:25

एक गांव रस्त्याच्या कडेला, नुसतेच वसले आहे
कुणी पाहुणा गावांत येत नाही म्हणून रुसले आहे
एक काळ होता जेव्हा त्या गावांत लोकांची वर्दळ होती
तारुण्य पळाळे शहरात आता ,वृद्धत्व तिष्ठत पडले आहे
एक वृद्ध आज्जी तिच्या झोपडीत अंथरुणाला खिळलेली
अंग फणफणले आहे तापाने डोळ्यांतून अश्रू झरत आहे
कावळा कुणाची पाही वाट विद्युत खांबा वर बसुन हताश
एखादी एसटी येते नि जाते ,अजून न कुणीच उतरले आहे
धुळीने माखलेल्या रस्त्यांना कसली आतुर ही अपेक्षा
रणरणत्या उन्हात इथे का कधी कोण फिरकले आहे
राखणदाराची जत्रा जवळ आली,वृद्ध डोळे लागले वेशिवर

विषय: 

अश्रू भरले डोळे

Submitted by आरुशी on 8 January, 2018 - 04:21

पाहिले जे स्वप्न ते,
आठवात हरवले,
तुझ्या भेटीचे सूर,
अंतराळात विरले...

गगनी रमला चंद्रमा,
अंधाराशी खेळ नवा,
रातराणीच्या फुलण्याचा,
आजही असे दुरावा...

उगवतीला प्रकाश पसरे,
नयनी रात्रीचा चांदवा,
क्षितिजावरती उरतो मग,
क्षणाक्षणांचा मेळावा...

सांगू कसे तुला सखे,
प्रणयरातीचे हे सोहळे,
तुझ्याविना मिटणार नाहीत,
अश्रू भरले हे डोळे...

-आरुशी दाते

विषय: 
शब्दखुणा: 

शेवटची प्रेमकथा

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 24 January, 2017 - 06:50

आलम दुनिया दिशाहीन पळत होती; पण पळूनही फायदा काय? कुठंही गेलं तरी ऑक्सिजन नव्हताच. एका रात्रीतला हा बदल. झाडांनी बंड पुकारलं होतं.सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर बंद केलं होतं त्यांनी प्राणवायु बनवणं. प्रकाशसंश्लेषणाची अशी पद्धत शोधली होती त्यांनी, ज्यात ऑक्सिजन बाहेर पडत नाही.

दोन-तिन तास पुरला कसाबसा प्राणवायु. नंतर सगळेजण गुदमरु लागले; मिळेल त्या वाहनात बसून धावू लागले अज्ञाताकडे. पण प्राण नव्हता कुठंच. माणसं तडफडून मरु लागली. हॉस्पिटल मध्ये होते काही ऑक्सिजन सिलेंडर्स. तेसुद्धा डॉक्टरांनीच पळवले, ज्यांच्यात दम होता त्यांनी डॉक्टरांचा खून करून ते मिळवले.

जणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका)

Submitted by गणेश पावले on 24 July, 2015 - 02:38

[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा. ]

*********************
balatkar-pidita1.jpgदुनियेचे जीवघेणे इशारे
आणि लचके तोडण्यास सरसावलेले हात
चौफेर वखवखलेली नजर
आणि अंग चोरून चालणारी ती…
दुनियेच्या खोचक कमेंट सहन करत
कानाडोळा करून, रस्ता कापणारी
थोडी घाबरलेली,
मनात असंख्य विचारांचं काहूर घेवून
एकटी घराबाहेर पडलेली ती….

विषय: 

अश्रू का गळतात.........?

Submitted by अनिकेत भांदककर on 10 December, 2014 - 13:52

दुखःच्या क्षणी
संवेदनशील होतात
वाट मोकळी करून
पटकन टपकतात
कुणास ठाऊक
अश्रू का गळतात...?

आनंदाच्या क्षणी
डोळे भरून येतात
इवलीशी जागा
स्वतः व्यापून घेतात
कुणास ठाऊक
अश्रू का गळतात...?

कुणी रागावल्यास
स्वतः रुसून बसतात
तडत- फडत
घरा (डोळ्या) बाहेर पडतात
कुणास ठाऊक
अश्रू का गळतात...?

कदाचित त्यांनाही
हसायला आवडत असेल
म्हणून दुखःच्या क्षणी
त्यांनाही रडू येत असेल

स्वतःला डोळ्यातून काढून
ते मनावरचं दुखः
स्वतः घेत असतील
माणुष्याचे दुखः हलके व्हावे
म्हणून स्वतः खपत असतील

त्यांनाही हसनं
आवडत असावं
म्हणून त्यांचही अवसान
गळत असावं

अश्रू

Submitted by राजेंद्र देवी on 14 October, 2012 - 10:13

अश्रू

झाल्यात जख्मा अनेक

उरली जागा फ़क्त एक

आठ्वण कोरलीस

हृ्दयावर तु एक

नाही देउ शकलो

तारका फुले मी

घेउनी ओजळित अश्रू

श्रावण बरसलो मी

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अश्रू