प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.
अवनीच्या चित्रात प्रार्थना बेहेरेनी असे काही गहिरे रंग भरलेत कि, कदाचित दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीला ते जमलं नसत. Hats Off to her!! चित्रपट बघताना, ती या दोघांपुढे नवीन आहे, अस चुकून सुद्धा वाटत नाही.
स्वप्नील बद्दल काय बोलणार? तो तर माझा आवडता हिरो आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट पासूनचा ! आणि सोनाली कुलकर्णी सुद्धा चित्रपटात चांगला अभिनय करते.
या चित्रपटातील गाणी खूप आधीपासूनच आपल्या मोबाईलवर रिंगटोनच काम करतात. त्यामुळे गाण्यांची मेलोडी मस्त आहे, हे वेगळ सांगायला नको.
‘दूर – दूर’ नावच sad सॉंग सुद्धा मस्त जमलेलं आहे.
चित्रपट का आवडला:-
सोनाली आणि स्वप्नीलची केमिस्ट्री खूप मस्त जुळून आलीये.
प्रार्थना बेहेरे चा अभिनय, दिसण, चित्रपटातील संपूर्ण वावर.... सगळंच अप्रतिम आहे.
मराठी चित्रपट असूनही हिंदी चित्रपट पहिल्याचा फील यावा याची त्यांनी काळजी घेतलेली आहे.
का नाही आवडला:-
माझी आवडती स्वप्नील-मुक्ताची जोडी यात नाही.
@ मी अपर्णा, माझ्या नावाचे
@ मी अपर्णा,
माझ्या नावाचे लघुरुप करून संबोधन न केल्यास आभारी राहीन.
(No subject)
शोर्ट फोर्म का ??? सोर्री
शोर्ट फोर्म का ??? सोर्री चेतनजि.
सलमान खानाचे सध्याचे सारेच
सलमान खानाचे सध्याचे सारेच चित्रपट भंपक हून अधिक भंपकक्क्क्क्क्क्क्क्क्क्क आहेत तरीही त्यांनी विक्रमी कमाई केलीच ना, तसच विक्रमी कमाईचा चित्रपट दुनियादारी हाही भंपकच आहे.
>>>>>>>>>>>>>>
फरक आहे हिंदी चित्रपटाच्या कमाईत आणि मराठी चित्रपटाच्या कमाईत.
मराठी चित्रपट हिंदी ब्लॉकबस्टरसारखे एकाच आठवड्यात एकाच वेळी हजारो स्क्रीनवर लागून लोकांना तो सिनेमा बंडल आहे हे समजायच्या आधीच फक्त स्टारकास्टच्या नावावर शंभर करोड क्लब नाही गाठू शकत.
मराठी चित्रपटाला कमाई करायला काही आठवडे चालावा लागतो, त्यात तो कसा आहे हे माऊथ पब्लिसिटीने सर्वांनाच समजते. जर लोकांना आवडण्यासारखा असेल तरच तो चालतो आणि कमाई करतो.
दुनियादारी हा सिनेमा असाच लोकांना आवडला आणि कित्येक आठवडे चालला. कित्येकांनी पुन्हा पुन्हा पाहिला. त्याला भंपक बोलणे म्हणजे बहुतांश मराठी लोकांची अभिरुची भंपक आहे असा अर्थ होतो.
आणि असे नसावे, नाही...
दुनियादारीचे डाय हार्ड फॅन
दुनियादारीचे डाय हार्ड फॅन बहुतेक सॉफ्ट झालेत.. नैतर मज्जा आली असती आत्ता .
>>>>>>>>>>
एखाद्या मराठी चित्रपटाचे डाय हार्ड फॅन असणे..
आणि विरोधकांनाही मितवा धाग्यावर दुनियादारी आठवणे यातच सारे आले
बाकी इतर फॅन्सचे माहीत नाही, मी नेहमीच असेन.
>>विरोधकांनाही आवरा
>>विरोधकांनाही
आवरा
चित्रपट बघितला नाही. सोनाली
चित्रपट बघितला नाही. सोनाली कुलकर्णी कधीच फारशी आवडली नाही. तिच्या बहुतेक चित्रपटांमधे ती केवळ शोभेची बाहुली असते. थोडे वेगळे काम करायचा प्रयत्न तिने 'गोष्ट लग्नानंतरची' मधे केला होता. पण हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला हेही समजलं नाही. त्यानंतर अभिनयापेक्षा तिची चित्रपटातली आणि स्टेज शो मधली (आयटेम) नृत्येच जास्त चर्चेत राहिली.
शाहिर, विरोधकांना आवरायची गरज
शाहिर, विरोधकांना आवरायची गरज नाही. ते प्रसिद्धीसाठी हवेतच. साक्षात शाहरूखच्या डिडीएलजेला आहेत तर स्वप्नीलच्या दुनियादारीलाही असणारच.
चेतन , णिशेध !!
चेतन , णिशेध !!
पण कशासाठी स्वस्ति?
पण कशासाठी स्वस्ति?
फक्त स्टारकास्टच्या नावावर
फक्त स्टारकास्टच्या नावावर शंभर करोड क्लब नाही गाठू शकत.>>> गुड, तर मराठी चित्रपटसृष्टीचा उगवता सुप्परस्टार - स्वप्निल जोशी नाही हे यावरून सिद्ध झाले.
दुनियादारी लोकांनी डोक्यावर घेतला(तुमच्यामते) याला अनेक कारणे आहेत. म्हणून हा चित्रपट उच्च कलाकृतीचा दर्जेदार नमुना वगैरे ठरत नाही. एक तर खूप वर्षात तरुणाई वर बेस्ड असा चित्रपट मराठी मध्ये आला नव्हता, की जो एकाचवेळी जीवनाच्या इतक्या पैलूंवर भाष्य करेल (माझ्या मते इथेच चित्रपटाच्या भंपक पणाला सुरुवात होते)
चार प्रेम कथा, तीन अयशस्वी तर एक अर्धी यशस्वी, अनरीलेटेबल संवाद, फसलेली पटकथा, 'आवरा आता ssssssss ' असे शब्द ओठातून बाहेर पडायला भाग पाडणारे असंख्य सीन, स्वप्नील जोशीचं न स्वीकारता येण्याजोगं विनोदी पात्रं, कृत्रिम अभिनयाची अनेक उत्तम उदाहरणे, शेवटच्या सीन मधील अत्यंत निकृष्ट दर्जाची वेशभूषा आणि केशभूषा (तसे पाहता या सीन पर्यंत चित्रपट खूपच भावनिक छळ करतो, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात आणि अचानक हा शेवटचा सीन अवतरतो की, ज्याची अवस्था पाहून....:फिदी: ), आणि अतिमतः प्रत्येक घडीला छडी घेऊन बसलेल्या मास्तरासारखे रडवणारे किंवा रड नाहीतर कुत्रं सोडतो (मला नाही, दुनियादारीचे डाय हार्ड फॅन असणाऱ्यांना) म्हणनारे अचाट सीन. तर अशा चित्रपटाने विक्रमी कमाई केली कारण फक्त आणि फक्त पब्लिक च्या 'भीक देतो पण ढोंग आवर' या वृत्तीमुळेच.
जर आपण अभिरुची हा शब्द वापरत असाल, तर तुम्ही मांडलेल्या मतानुसार विहीर, जोगवा, गाभ्रीचा पाउस, गंध, उत्तरायण, एव्हढेसे आभाळ यांसारख्या असंख्य चित्रपटांनी विक्रमी कमाई केली नाही म्हणजेच हे सारे चित्रपट दुनियादारी पेक्षा निकृष्ठ दर्जाचे होते असा अर्थ होतो. पण अर्थातच असे नाही.
उत्कृष्ट चित्रपटाच्या निकषांमध्ये दुनियादारी, (मितवा) कुठेच बसत नाही, तरीही त्याने (विक्रमी) कमाई केली, माझ्यामते तरी हा निव्वळ योगायोग होता.
(पुण्यातील एका थिएटरमध्ये मितवा तब्बल तीन आठवडे चालू होता)
त्यामुळे विक्रमी कमाईचा आणि चित्रपट चांगला असण्याचा काहीच संबंध नाही.
दुनियादारी अर्धवट पहाण्याचा
दुनियादारी अर्धवट पहाण्याचा योग नशिबी आला होता मध्यंतरी. त्यात स्वजो दिवसरात्र तिन्ही त्रिकाळ स्वेटर घालून का फिरतो ते कळले नाही. बरं तो ज्या शहरात राहताना दाखवलाय ते युरोप वगैरे नक्कीच नाही.
एक मिनिट, इथे दुनियादारीचा
एक मिनिट,
इथे दुनियादारीचा काय संबंध???
इथे दुनियादारीचा काय संबंध???
इथे दुनियादारीचा काय संबंध??? >>>>>> धागा उघडून कलटी मारली की हे असे होत,
घागाकर्ते कृपया या आधीचे प्रतिसाद वाचण्याची तसदी घ्याल का?
ऋन्मेषा, दुनियादारी पहायला
ऋन्मेषा, दुनियादारी पहायला कारण फक्त आणि फक्त 'सु.शि' असणारे माझ्या सारखे अनेक होते.
आणि वी आर अल्सो पार्ट ऑफ क्राऊड ज्याने दुनियादारीला कोटी मधे रुपये मिळवून दिले.
आमचे पैसे देऊनही आम्ही त्या सिनेमाला फ्लॉपच म्हणतो!
ही मा शे पो
सलमान खानाचे सध्याचे सारेच
सलमान खानाचे सध्याचे सारेच चित्रपट भंपक हून अधिक भंपकक्क्क्क्क्क्क्क्क्क्क आहेत +१००
सध्याचे तर सिनेमाग्रूहातच पहायच्या लायकीचे अजिबात नाही, टीपीकल फालतू स्टोरी घ्यायची, एन दोन आयटम साँग कोंबायचे आणि कवायतीसारखा डांन्स मारायचा , यांचे चित्रपट आवरायला हवे
दुनियादारी तसा बरा होता अगदीच हुकला नव्हता, पण ज्यांनी दुनियादारी आधी वाचली आहे त्यांचा फार मोठा भ्रमनिरास होता , कदाचित चित्रपटचे नाव बदलले असते तरी चालले असते.
'स्वजोदारी' चाललं असतं नाव
'स्वजोदारी' चाललं असतं नाव
लंबोदरी जास्त शोभला असता
लंबोदरी जास्त शोभला असता
बाकी ते मित्र तत्व.. आणि वाटाड्या
फारच इरिटेटींग होता
एक प्रश्नः एखाद्याचा
एक प्रश्नः एखाद्याचा दिवसातल्या दोन तासांपूरता स्मॄतीभ्रंश होऊ शकतो का?>>>>>
सध्या ज्यांच्या नंबरवर नाईट कॉलिंग प्याक चालू आहे आणि ज्यांना गफ्रे आहेत ते नक्कीच याच उत्तर देऊ शकतील…।
लंबोदरी वेल सेड शाहीर
लंबोदरी वेल सेड शाहीर
कै च्या कै....
कै च्या कै....
बरोबर, कैच्याकैच सिनेमा होता
बरोबर, कैच्याकैच सिनेमा होता
मिटवा (ज्यायला एकदाचं) हे पण
मिटवा (ज्यायला एकदाचं) हे पण चाललं असतं.
(No subject)
ऋन्मेषा, दुनियादारी पहायला
ऋन्मेषा, दुनियादारी पहायला कारण फक्त आणि फक्त 'सु.शि' असणारे माझ्या सारखे अनेक होते.
>>>>>
असे तुम्हाला वाटते हो, आमच्यासारख्यांना "सु.शि." या नावाची ओळख दुनियादारीनंतर झाली. आणि हा पिक्चर बघितलेल्यांमध्ये कित्येक जण असेही असतील ज्यांना आजही कोन सुशि हे माहीत नसेल. किंबहुना मी नमूद केलेल्या या दोन कॅटेगरीतील लोकांची संख्याच जवळपास ९० टक्क्यांवर असेल. आणि यात वाईट वाटण्यासारखे काही नाही. चित्रपट तरुणवर्गाने डोक्यावर उचलून घेतलाय ज्यांना वाचनाची आवड अभावानेच.
..
फक्त स्टारकास्टच्या नावावर शंभर करोड क्लब नाही गाठू शकत.>>> गुड, तर मराठी चित्रपटसृष्टीचा उगवता सुप्परस्टार - स्वप्निल जोशी नाही हे यावरून सिद्ध झाले.
>>>>>>
खरेच नाही समजले हे लॉजिक.
विश्वनाथ आनंदला सचिनसारखे भारतरत्न नाही मिळाले म्हणून तो बुद्धीबळाचा सर्वश्रेष्ठ खेळाडू नाही हे सिद्ध झाले अश्यातला भाग झाला.
...
दुनियादारी लोकांनी डोक्यावर घेतला(तुमच्यामते) याला अनेक कारणे आहेत. म्हणून हा चित्रपट उच्च कलाकृतीचा दर्जेदार नमुना वगैरे ठरत नाही. एक तर खूप वर्षात तरुणाई वर बेस्ड असा चित्रपट मराठी मध्ये आला नव्हता, की जो एकाचवेळी जीवनाच्या इतक्या पैलूंवर भाष्य करेल (माझ्या मते इथेच चित्रपटाच्या भंपक पणाला सुरुवात होते)
>>>>>
या उतार्यात प्रशंसा आहे की टिका हेच समझत नाहीये.
Arere Sushi mahit nahit? Mag
Arere
Sushi mahit nahit? Mag tumachyakadun darjedar goshti avadanyabaddal kahi apekshach nahi....
Chalu dya mag
सहज आठवले म्हणूनः दुनियादारी
सहज आठवले म्हणूनः
दुनियादारी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी कादंबरीवर तो बेतलेला आहे हे समजल्यावर तो प्रत्यक्ष बघण्याआधी कादंबरी मिळवून वाचली आणि नंतर सिनेमा जाऊन बघितला. ते सगळे वाचनप्रेमी नव्हते.
टीपः वरचे वाक्य एक अनुभव म्हणून टाकलेले आहे. कुठलीही टिप्पणी खोडून काढायला नव्हे. (हुश्श)
अवांतरः
सुहास शिरवळकर माहीत नसतील तर चमचाभर पाण्यात जीव द्यावा.
वाईट वाटून घ्यायचे कारण नाही.
वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. पण जे सत्य आहे त्याला सामोरे जा. मायबोली म्हणजे जग नाही, मायबोलीकर म्हणजे समाजाचा आरसा नाही.
तुर्तास ऑफिस सुटले, पण यावर गरज पडल्यास नवीन धागा काढून सविस्तर बोलू
आम्ही कशाला घेऊ वाईट वाटून.
आम्ही कशाला घेऊ वाईट वाटून. ज्यांना सुहास शिरवळकर माहित नाहीत त्यांनी वाईट वाटून घ्यावं
>>सुहास शिरवळकर माहीत नसतील
>>सुहास शिरवळकर माहीत नसतील तर चमचाभर पाण्यात जीव द्यावा.
हे खटकले. नव्या पिढीतील मुलांना, विशेषतः इंग्रजी माध्यमातून शिकलेल्यांना सु शी माहित नसतील हे सहज शक्य आहे. या चित्रपटाने त्यांना हे नाव कळले आणी पुस्तके वाचायची उत्सुकता निर्माण झाली तर ते चित्रपटाचे यशच की.
Pages