व्यक्तिमत्व
व्यक्तिमत्व
जपानी वामन
" मॅन, वॉन्ट तवू काम फो फीशींग?" आपल्या जपानी हेल असलेल्या इंग्रजीत हिराकू मला आग्रह करत होता. माझ्या दुबईतल्या सुरुवातीच्या ' स्ट्रगल ' च्या दिवसात एका खोलीत तीन डोकी अशा पद्धतीने राहत असल्यामुळे अनेकदा तऱ्हेतऱ्हेचे लोक माझे रूममेट म्हणून माझ्याबरोबर राहिले आहेत, त्यातला हिराकू हा एक विक्षिप्त प्राणी. समुद्र, मासे, वाळू, जहाज आणि भटकंती या विश्वात सतत रममाण असणारा आणि दुबईला दर शनिवारी विशेष परवाना घेऊन खोल समुद्रात मासेमारी करायला जाणारा हा माझा 'रूममेट' लाघवी स्वभावाचा असला, तरी पंचेचाळीस डिग्रीच्या उष्णतेत मासेमारीला जायच्या जीवघेण्या साहसाची मला तरी भीती वाटत होती.
बाबा बंगाली
काही माणसांशी आपली मैत्री का होते, कशी होते आणि अचानक ती का तुटते, याचं उत्तर ' योगायोग ' याशिवाय वेगळं काही मिळणं कठीण असतं. मुळात ती मैत्री होणंच एक मोठं आश्चर्य असू शकतं. कोणाशीही चटकन संवाद साधू शकणाऱ्या आणि चित्रविचित्र माणसांची सोबत आवडणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीवर मुद्दाम एखाद्या व्यक्तीपासून लांब राहायचा प्रयत्न करायची वेळ तशी अभावानेच आलेली आहे.
मीनाकुमारी की बेटी?
मीनाकुमारी की बेटी?
एकदा लाहोरच्या गल्लीतील एका फुटपाथवर एक चोपडे एकाच्या नजरेस पडले. घरी आल्यावर ते फाटके पुस्तक चाळून 'काहीच्या बाही लोक लिहितात' असे मनात म्हणत ते पुस्तक रद्दीत टाकून दिले. रद्दी विकताना ते पुस्तक वाचायची इच्छा झाली म्हणून तो वाचायला लागला. खरे कि खोटे याची शहानिशा करण्यासाठी त्याने शोध घ्यायला सुरवात केली. नंतर जे समोर आले ते तो सादर करत आहे.
पूर्ण झालेला अपूर्णांक
एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये चहा घेत असताना अचानक समोर एक मिठाईचा भला मोठा डबा घेऊन आमचा 'ऑफिस बॉय' आला. इतका मोठा डबा, त्यात तऱ्हेतऱ्हेची वर्ख लावलेली मिठाई आणि वर अजून एका छोट्या डब्यात प्रत्येकाला वेगळी चॉकलेट्स हे सगळं नक्की कशासाठी चाललंय याचा मला उलगडा होईना. शेवटी त्याने " वो हाला है ना, उसको बेटा हुआ...उसकी मिठाई है..." अशी माहिती पुरवली.
प्रश्न फक्त एवढाच आहे
प्रश्न फक्त एवढाच आहे...
आजच सगळे जगावं...
की उद्यासाठी थोडे ठेवावं...
आधी झोपेत स्वप्न बघावं...
की झोप उडवून ते पूर्ण करावं...
प्रश्न फक्त एवढाच आहे...
सुखाच्या मागे लागावं....
की मागे असण्यातच सुख मानावं....
आपलं दुःख सांगावं...
की दुसऱ्याचं दुःख ऐकावं...
प्रश्न फक्त एवढाच आहे...
मनाला वाटेल ते करावं...
की वाट्याला येईल त्यात मन रमवावं...
आयुष्याच्या वळणानुसार वळावं....
की आयुष्याला नवीन वळण द्यावं...
जुळ्यांचं दुखणं
काही सेकंदांच्या अंतराने एकाच आईच्या पोटी एकाच प्रसूतिगृहात एकाच दिवशी जन्माला आलेल्या दोन जुळ्या भावंडांची कुंडली अगदी तंतोतंत एकसारखीच असायला हवी , अशी शंका मला कुंडलीशास्त्राबद्दल वाचत असताना नेहेमी येत असे. अधून मधून त्या विषयातल्या काही तज्ज्ञ मंडळींना मी त्यासंबंधी प्रश्न सुद्धा करत असे आणि माझ्या मनाचं त्यांच्यापैकी कोणाच्याही उत्तराने समाधान होतं नसे. पूर्वजन्मीच्या संचिताचे परिणाम प्रत्येक आत्म्यावर वेगवेगळे होतं असतात, असं साधारण उत्तर प्रत्येकाकडून मला मिळत असे.
भगीरथ
" शुभ संध्याकाळ, मन्सूर बोलतोय.उद्या किती वाजता आणि कुठे भेटायचंय?" दिवसभराचं काम संपवून घरी निघालेलो असताना गाडीत बसणार तोच मोबाईल खणखणला आणि पलीकडून अपरिचित माणसाचा परवलीचा प्रश्न आला. दर वेळी नवा प्रोजेक्ट हातात आलं, की सुरुवातीची 'किक-ऑफ' मीटिंग होते आणि मग त्या प्रोजेक्टशी जोडलेले कोण कोण कुठून कुठून असेच फोन करत असतात. ' साईट व्हिसिट' च्या वेळी सगळे जण एकत्र आले, की संभाषणातून काही वेळातच त्यातले 'सुपीक मेंदू' आणि 'नुसत्याच कवट्या' कोण आहेत हे सरावाने आता मला ओळखता येत असल्यामुळे मी माझ्या प्रोजेक्ट ची पहिली मीटिंग 'साईट'वर घेणं पसंत करतो.
मानसीचा चित्रकार तो
काही व्यक्तींना जन्मजात कलाकार होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची देणगी मिळालेली असते। अशा व्यक्तींना कला शिकवावी लागत नाही. दूध पित्या वयातल्या आणि बोबडे शब्द बोलायला लागलेल्या लहानशा मुलाला गाणं ऐकून तंद्री कशी लागते, याचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोध घेणं मला तरी अशक्य वाटतं. कुठल्याशा पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधातून जन्मजात बरोबर आलेली ही शिदोरी ज्याच्याजवळ असते, ती व्यक्ती माझ्या मते विधात्याने केवळ सर्वसामान्य मनुष्यप्राण्यांच्या आयुष्यात चार आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठीच गंधर्वलोकातून खास या पृथ्वीतलावर पाठवलेली असते.
सूर निरागस हो
संगीताची आवड असलेला माणूस बरेच वेळा स्वतःला गाता गळा नसला तरी संगीताचा 'कान' असल्यामुळे सतत चांगल्या गायकांच्या आणि गाण्यांच्या संगतीत असतो. माझ्यासारख्या संगीत वेड्याला कुठेही गेलं तरी चांगलं संगीत कानावर पडल्यावरच खऱ्या अर्थाने त्या जागेशी नाळ जुळल्यासारखी वाटते. त्या संगीताला भौगोलिक अथवा व्याकरणात्मक बंधन नसतं. अरबी संगीतकारांच्या रबाबात अथवा मिझमारमध्ये उमटणारे सूर खरे असले, तर त्याची अनुभूती घ्यायला आपल्याला आपण अरबी नसल्याची अडचण भासत नाही. सिंगापूरमध्ये कोलिनटॉन्ग ऐकताना किंवा चीनमध्ये डिझीवर वाजवले जाणारे संथ सूर ऐकताना तंद्री लागतेच लागते.