व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

Submitted by Narsikar Vedant on 17 November, 2019 - 01:40

साहेब ,
2012 ला जगाचा अंत होणार असे का म्हणत होते याचे उत्तर आज कळले .
तुम्ही गेलात आणि महाराष्ट्रासह अवघा हिंदुस्थान पोरका झाला.

आमच्या काकू

Submitted by विद्या भुतकर on 10 November, 2019 - 18:38

एका खांद्यावरुन दुसऱ्या बाजूला कमरेवर लटकणारी छोटी पर्स घेऊन, साडीचा पदर खोचूनच किंवा पिनेने नीट लावून, पायांत काळ्या थोडीशी उंची असलेल्या चपला घालून, डोळ्यांवर गोल आकाराच्या भिंगाचा आणि सोनेरी काड्यांचा चष्मा लावून काकू नेहमी कुठे ना कुठेतरी जाण्याच्या घाईत असतात. वेळ, काळ यांचा त्यांच्या गतीशी काहीही संबंध नसतो. त्यांचा जोश तितकाच. संध्याकाळी बिल्डिंगच्या खाली पार्किंगमध्ये टाकलेल्या बेंचवर शक्यतो बाकी काकूंसोबत बसलेल्या दिसतील. आता 'काकू' सारखा बहुप्रचारी शब्द सापडणार नाही.

फिट राहूया!

Submitted by मार्गी on 23 October, 2019 - 06:17

नमस्कार. आपल्यासोबत माझा एक नवीन उपक्रम शेअर करत आहे.

तुम्हांला वाटते तुम्ही फिट आहात व आणखी फिट झाले पाहिजे?

तुम्हांला वाटते तुम्ही व्यायाम केला पाहिजे?

तुम्हांला आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करायचा आहे?

आणि हे करताना त्यात काही अडचणी येतात, शंका आहेत?

शब्दखुणा: 

श्रीकृष्ण आणि संकर्षण

Submitted by सतीश कुमार on 23 October, 2019 - 03:18

बलराम -

चराचर सृष्टीला भगवान कृष्ण माहीत आहे. भगवदगीता तर आपल्याला माहित असतेच. आपण कृष्णाबद्दल शेकडो पुस्तके वाचलेली असतात. इस्कॉन नी तर श्रीकृष्ण याला जगद्विख्यात केलेलं आहे. किती ऐकतो व वाचतो अापण कृष्णाबद्दल पण याचा भाऊ बलराम मात्र बराच अज्ञात आहे.

बलराम हा वसुदेव व रोहिणी या दांपत्याचा मुलगा आणि कृष्णाचा मोठा सावत्र भाऊ होता. सुभद्रा त्याची सख्खी बहीण. त्याचा अर्थ सुभद्रा ही कृष्णाची सावत्र बहीण झाली. शिशुपाल याचा वध झाल्यानंतर कृष्णाच्या करंगळीला जखम झाली तेंव्हा सुभद्रेला
चिंधी मिळाली नाही म्हणून तिने नवा शालू फाडला होता हे आपण ऐकले आहे.

Happy birthday महानायक....!

Submitted by Narsikar Vedant on 10 October, 2019 - 14:40

१९४२ साल हे 'चले जाव' या ऐतिहासिक आंदोलनासाठी इतिहासात नोंदवलं गेलं, पण ह्यावर्षी अजून एक ऐतिहासिक घटना घडली आणि ती घटना होती महानायक अमिताभ बच्चन यांचा जन्म!

त्यानं काय केलं नाही पडद्यावर? ऍक्शन केली, रोमान्स केला, गाणं म्हटलं, डान्स केला, हसवलं, रडवलंही आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा दिली. आपल्याला जे आवडतं ते सगळं त्याने केलं आणि एक काळ असा आला की तो जे काही करतोय तेच आवडतंय.

शब्दखुणा: 

शहा साहेब

Submitted by सोमा वाटाणे on 5 October, 2019 - 06:16

सरकारी नोकरी करत असताना अनेक सहकारी लाभले. वेगवेगळे अधिकारी अनुभवायला मिळाले. कधी मी नवीन ठिकाणी बदलून गेलो तर कधी नवीन अधिकारी, सहकारी बदलून आले.
आमची कार्यालयं म्हणजे सिमेंट किंवा लोखंडी पत्र्याच्या खोल्या, त्यात मोठ मोठी सागवानी टेबलं, लाकडी खुर्च्या आणि लाकडी लोखंडी कपाटं. फायलींचे गठ्ठे कपाटात आणि कपाटांवर रचून ठेवलेली. कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या खेडवळ लोकांचा राबता. आम्हीच आमच्या जागेत कसंतरी बसून कामं उरकित असायचो. गर्दीमुळे आणखीनच कोंदट वातावरण निर्माण होत असे.

जिभेचे चोचले

Submitted by Yogita Maayboli on 3 October, 2019 - 08:48

जिभेचे चोचले तर सर्वच पुरवतात. पण काही लोकांना विचित्र गोष्टी खाण्याची सवय असते . हा धागा त्यांच्यासाठी

विचित्र गोष्टी यासाठी कि त्यातील सर्वच गोष्टी खाण्याजोगी नसतात. पण त्यांना खाण्याचे जणूकाही डोहाळे लागले असतात.

अशा काही गोष्टी खालीलप्रमाणे
१) पाटीवरची पेन्सिल
२) खडू
३) तांदूळ
४) धान्यातले मातीचे खडे
५) गुलाबी मिसरी
६) धना डाळ
७) काळी माती
८) मुलतानी माती

हे लिहीत असताना नकळतच तोंडाला पाणी आले

जी नाईन

Submitted by अभ्या... on 1 October, 2019 - 13:32

रस्त्यात कालवा इतका झाला की शंकर्‍या उठलाच. खाटेवर टेकलेल्या बूडाचा आधार घेउनच अशी गिरकी फिरली की पाय खाटेखालच्या बुटावर आले. स्लीव्हलेस टीशर्टाचे खांद्यावरचे दोन कोपरे बोटाच्या चिमटीत पकडले गेले. एक हिसका देऊन दोन्ही हात सवयीने कानावरच्या केसातून फिरले. हात फिरले म्हणण्यापेक्षा हात जागेवर राह्यले, मान पुढे मागे झाली. बुटाची चेन ओढली गेली. मोरीतल्या पाण्याचा हबका तोंडावर बसला तसे ते ओले हात परत एकदा केसावर फिरवून शंकर्‍या खोलीबाहेर पडला.

शास्त्रीजी....

Submitted by Narsikar Vedant on 30 September, 2019 - 13:10

कुठल्याही पदावरील दुसऱ्या मानकऱ्याला पहिल्या इतकी ओळख आणि प्रसिद्धी मिळत नाही. लाल बहादूर शास्त्री यांच्या बाबतीतही नेमके तेच झाले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे दुसरे पंतप्रधान. मात्र त्यांच्या नशिबी प्रसिद्धी कमीच आली.

तू आणि पाऊस

Submitted by @गजानन बाठे on 25 September, 2019 - 11:33

तू आणि पाऊस

गच्च भरलेलं आकाश जणू,
तसच काहिसं निखरतं रूप,
तू आणि श्रावण सरी,
दोघांत आहे साम्य खूप.

बहरल्या हिरव्या डोंगर कडा,
गाभारी घुमला शंखनाद,
कौलावरती टीपटीप पाणी,
शब्द तुझे मज देती साद.

दुथडी भरून वाहे सरिता,
रोज तुझा वर्षाव नवा,
लपून बसला दिनकर कोठे?
स्पर्श गार ना उबदार हवा.

धो धो पडतो नुसता पाऊस,
तू श्रावण मी शब्द ओले,
ओलावल्या त्या भिंती काही,
असेच काही मन ही झाले...

गजानन बाठे

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व