फिट राहूया!

Submitted by मार्गी on 23 October, 2019 - 06:17

नमस्कार. आपल्यासोबत माझा एक नवीन उपक्रम शेअर करत आहे.

तुम्हांला वाटते तुम्ही फिट आहात व आणखी फिट झाले पाहिजे?

तुम्हांला वाटते तुम्ही व्यायाम केला पाहिजे?

तुम्हांला आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करायचा आहे?

आणि हे करताना त्यात काही अडचणी येतात, शंका आहेत?

असं असेल तर तुमच्यासाठी एक सुंदर संकल्पना आणत आहे. अधिक फिट, अधिक निरोगी व सकारात्मक जीवनशैलीकडे वाटचाल करण्यासाठी एक वाटाड्या आहे. आपली जर मनापासून इच्छा असेल तर मी आपल्याला स्वत:ची मदत करण्यासाठी मदत करू शकतो. आपल्याला वाटत असेल की तुम्ही अधिक फिट, अधिक अॅक्टीव्ह राहायला हवे, तर ते तुम्हांला कसं जमेल, ह्याबाबतीत मी आपल्याला सोबत करू शकतो.

(पोस्टचा लेखक सायकलिस्ट, मॅरेथॉनर व योग ध्यान प्रेमी आहे. विविध सायकलिंग मोहीमा, ट्रेकिंग, योग, ध्यान ह्यावरील अनुभव ब्लॉगवर उपलब्ध- www.niranjan-vichar.blogspot.in)

कदाचित असं वाटत असेल की, स्वत:मध्ये असं रुपांतर घडवणं फार कठीण आहे; वेळ नाहीय; फुरसत नाहीय; अनेक बंधनं आहेत. पण मी आपल्याला सांगतो की अगदी तरीही हे शक्य आहे. त्यासाठी माझ्याकडे एक संकल्पना आहे. आपण आणि आपल्यासोबत असतील ते इतर जण ह्यांना स्वत:ची मदत करण्यासाठी मी मदत करेन. आपलं रूटीन, आपला रोजचा दिनक्रम, आपल्या शरीराच्या सवयी, आपल्या आवडी- निवडी, आपण आधी केलेले व्यायाम ह्या सर्वांच्या आधारे मी आपल्याला असा एक व्यायाम प्रकार सांगेन जो आपण आठवड्यातून पाच दिवस तरी नक्की करू शकाल. मी आपल्यासाठी त्या व्यायामाचं एक वेळापत्रक बनवेन आणि दर आठवड्यात आपण किती तास एक्टीव्ह आहात, ह्यावर लक्ष ठेवेन. आपण व आपल्यासोबत इतर काही जण असतील तर आपण असा एक ग्रूप बनवू. त्या ग्रूपमध्ये माझ्यासह प्रत्येक जण स्वत:च्या फिटनेसचे अपडेटस रोज देत राहील. तीन महिन्यांपर्यंत मी आपल्या दररोजच्या व दर आठवड्यांच्या फिटनेस तासांची नोंद ठेवेन. आपण कधी प्रवासात असाल, कधी व्यस्त असाल; तर त्याही वेळेस आपण कोणता व्यायाम करू शकाल, तेही आपल्याला सांगेन. आपल्याला एखादा वेगळा व्यायाम करायचा असेल तर तो कशा पद्धतीने चांगला करता येईल, हे आपल्याला सांगेन.

आपण पुढीलपैकी काही गोष्टी तरी कधी नक्कीच केलेल्या असतील किंवा आत्ता करत असाल-

1. सूर्य नमस्कार
2. दोरीवरच्या उड्या
3. चालणे
4. पळणे
5. पोहणे
6. मुक्तछंदी नृत्य (सैराट डान्स)
7. सायकलिंग
8. छोट्या व उंच उड्या मारणे
9. डंबेल्स किंवा इतर साधनांनी वेट लिफ्टिंग/ जिममधले काही व्यायाम प्रकार
10. हॉकी, बॅडमिंटन, फूटबॉल, क्रिकेट असे मैदानी खेळ
11. काही योगासने
12. स्ट्रेचिंगच्या हालचाली

ह्यापैकी एक जरी आपण कधी केलं असेल (आणि नक्कीच आपण त्यातले काही पूर्वी केले आहेत/ करत आहात), तर आपला तो व्यायाम प्रकार अधिक नियमित कसा करता येईल, ह्यासंदर्भात मी आपली मदत करेन. आणि आपण आपला रोजचा व्यायाम कसा रेकॉर्ड कराल; आणि आपली त्यातली प्रगती कशी मोजाल, हेही सांगेन. किंवा आपल्या अतिशय व्यस्त वेळापत्रकातही आपण सहज काही व्यायाम कसे करू शकतो हेही सांगेन. उदा., फोनवर बोलताना न बसता खोलीत येरझारा मारणे. दिवसातून जितका वेळ फोनवर बोलता तितका वेळ येरझारा मारल्या तर मस्त व्यायाम होतो ना! असा व्यायाम अनेक प्रकारे; अनेक सिच्युएशन्स मध्ये करता येतो.

त्याबरोबर अगदी साध्या गोष्टींचा आपल्या फिटनेसशी संबंध असतो. बसण्याच्या जागी फोन ठेवण्यापेक्षा लांब ठेवला तर प्रत्येक मॅसेज- कॉलच्या वेळेस आपण चार पावलं चालतो. अनेक वेळेस आपण नुसते उभे किंवा बसून असतो. पण तिथेही आपण चार पावले चालू शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टींतूनच फिटनेस वाढत जातो. शिवाय अशी प्रत्येक छोटी कृती आपल्याला फिट राहण्याची आठवण करून देईल. त्यातूनच आपलं एक एक पाऊल फिटनेसकडे वळेल व फिटनेसबद्दल जागरूकता वाढेल.

तेव्हा आपली मनातून इच्छा असेल तर आपण सुरू करू शकतो. शिवाय सोबतीला आपले मित्र असतील. आपले रोजचे फिटनेस अपडेटस बघून त्यांनाही प्रेरणा मिळेल व त्यांच्यामुळे आपल्यालाही. शिवाय मी माझे रोजचे फिटनेसचे अपडेटस- रनिंग, सायकलिंग, योगासन इ. आपल्याला रोज कळवेनच. शिवाय काही दिवस आपल्याला आळस वाटला किंवा आपण आजारी असाल; तेव्हाही आपण फिटनेससाठी काय करू शकता, हे आपल्याला सांगेन. काही दिवस आपले खाडे पडत असतील तर मी निर्लज्जपणे आपल्याला आठवण करून देईन किंवा आपला स्कोअर किती डाऊन आहे, हे आपल्याला कळवत राहीन. तीन महिने म्हणजे सुमारे चौदा आठवडे मी आपल्या फिटनेसवर लक्ष ठेवेन; त्याच्या नोंदी आपल्यापुढे ठेवेन. शिवाय ग्रूपमध्ये कोणाच्या अॅक्टीव्ह तासांचा स्कोअर किती आहे; हे आपल्याला कळवत राहीन. वेळोवेळी येणा-या अडचणींमध्ये पर्यायी व्यायाम सांगेन.

आपली इच्छा असेल तर आपण हे तीन महिन्यांसाठी करून बघू शकता. तीन महिने ह्यासाठी की कोणत्याही नवीन सवयीचा अंगीकार व्हायला काही काळ लागतो. एखादी गोष्ट कशी आहे हे समजून तिचा अनुभव घ्यायला थोडा वेळ लागतो. आणि तीन महिन्यांमध्ये आपल्या वेळापत्रकामध्ये पुरेशा अडचणी/ बाधाही येतील; सो त्यातून कसा मार्ग काढायचा हेही आपल्याला सांगू शकेन. मी रोज मॅसेजवर, फिटनेसच्या अॅक्टिव्हिटी नोंदवण्याच्या अॅपवर आपल्या संपर्कात राहीन. अधून मधून फोनवर बोलणं होईल. आणि गरजेनुसार भेटून आपली अडचण सॉल्व्ह करेन. ग्रूपवर प्रत्येकाच्या फिटनेसचा स्कोअर मी अपडेट करत राहीन. परिस्थितीनुसार वेगवेगळे पर्याय सुचवेन. आणि आपल्याला स्वत:ची मदत करण्यासाठी मदत करेन. तीन महिन्यांमध्ये आपल्याला एक्टीव्ह राहण्याचे सोपे फॉर्म्युले कळतील. चालतो आपण नेहमीच; अनेक जण मॉर्निंग वॉकही करतात. पण त्यामुळे फरक पडत नाही. पण जर आपण थोडं सजग राहून चाललो, गप्पा मारत किंवा रमत गमत चालण्याऐवजी फास्ट चाललो; दिवसभरात अर्धा तास तरी घाम येणारी अॅक्टिव्हिटी केली (म्हणजे महिन्यातून किमान १५ एक्टीव्ह तास, महिन्यातून फक्त एक दिवस नाही) तर हळु हळु आपला फिटनेस वाढतो. तुमची इच्छा असेल तर तीन महिन्यांमध्ये तुम्ही हे करून बघू शकता. पण तीन महिन्यांची तयारी हवी. मनातून इच्छा हवी.

आणि मला त्यातून काय मिळणार? पहिली गोष्ट म्हणजे आळसाची सर्व आक्रमणं, चुकीच्या सवयी, साध्यासुध्या चुका ह्यांमधून मी पुढे जाऊन जे शिकतोय ते तुमच्यासोबत शेअर करता येईल. आपल्याला ज्यातून आनंद मिळतो; ते दुस-यांना सांगून त्यांना तो आनंद मिळवताना बघण्यामध्ये वेगळं समाधान मिळतं. पण त्याबरोबर मी आपल्याकडून फीसही घेईन. मोबदला म्हणून नाही, तर आपला सहभाग अधिक भक्कम करण्याचं साधन म्हणून. एखादी गोष्ट फुकट असेल तर आपण ती खूप लाईटली घेतो. पण जर आपले पैसे कुठे खर्च होत असतील, तर आपण त्याबाबतीत सिरियस होतो, म्हणून. स्वत:ला मदत करण्यामध्ये मी तुमची मदत करणार आहे, म्हणून ही फीस असेल. तीन महिन्यांसाठी ही फीस असेल. फीस असेल, हे मी ठरवलं आहे. पण ती किती असेल, हे आपण ठरवायचं आहे. आपल्या इच्छेनुसार आपण फीस देऊ शकता.

हे आबालवृद्ध सर्वांना करता येणारं आहे. अगदी लठ्ठपणा असलेल्या लहान मुलापासून शुगर असलेल्या वयोवृद्धांपर्यंत (तरुण वृद्धांसह) सर्व जण हे करू शकतात. तुम्हांला व्यायामामध्ये किंवा खेळाच्या एखाद्या प्रकारात विशेष आवड असेल; तर त्याबद्दलही मी आपल्याला सांगू शकतो. चला तर मग, तीन महिन्यांसाठी फिट राहूया! आपल्यासोबत आणखीही काही जण असतील तर आपण एकत्र हा प्रवास करू शकता. आणि ह्या पद्धतीचा वापर आपण विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड वाढवण्यासाठी, त्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या अभ्यासाचं स्कोअरकार्ड सांगून प्रोत्साहन देण्यासाठीसुद्धा करू शकतो, एकमेकांमध्ये अभ्यासाची स्पर्धाही त्यातून वाढू शकते. विद्यार्थ्यांचे काही पालक एकत्र आले तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा अभ्यासही फिट राहू शकतो.

अधिक माहितीसाठी आणि आपल्या फ्रेंडससोबत फिट होण्यासाठी संपर्क:

निरंजन वेलणकर 09422108376
niranjanwelankar@gmail.com
www.niranjan-vichar.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नमस्कार. ह्या उपक्रमाचं अपडेट देतो- हा उपक्रम सुरू करून एक महिना झाला. २ ग्रूप्स सुरू आहेत आणि १ डिसेंबरपासून आणखीन सुरू होत आहेत. आपल्या संस्थळावरील सदस्यांचाही त्यात समावेश झाला आहे! आपल्या माहितीत फिटनेससंदर्भात कोणी उत्सुक/ इंटरेस्टेड/ फिटनेस गरजू असल्यास त्यांच्यासोबत हे शेअर करू शकता. आणि ही प्रक्रिया सगळ्यांना उपयोगी पडताना दिसते आहे! Happy

नमस्कार. ह्या उपक्रमाचं अपडेट देतो- हा उपक्रम सुरू करून आता तीन महिने झाले. ४ ग्रूप्स सुरू आहेत, दोन ग्रूप्सचे तीन महिने पूर्ण झाले. आणि आणखी ग्रूप्स सुरू होत आहेत. आपल्या संस्थळावरील सदस्यांचाही त्यात समावेश झाला आहे! आपल्या माहितीत फिटनेससंदर्भात कोणी उत्सुक/ इंटरेस्टेड/ फिटनेस गरजू असल्यास त्यांच्यासोबत हे शेअर करू शकता. आणि ही प्रक्रिया सगळ्यांना उपयोगी पडताना दिसते आहे! एकमेकांचे रोजचे व्यायामाचे अपडेटस बघून अनियमित असणारे, एक्स्क्युजेस देणारे नियमित होत आहेत. Happy

खूप छान व फायदेशीर उपक्रम __/\__

मी एका ग्रुपमधे आहे. ह्या ग्रुपमुळे व्यायाम नियमित झालाय. माझा फायदा झालाय. धन्यवाद मार्गी / निरंजनजी __/\__