तू आणि पाऊस

Submitted by @गजानन बाठे on 25 September, 2019 - 11:33

तू आणि पाऊस

गच्च भरलेलं आकाश जणू,
तसच काहिसं निखरतं रूप,
तू आणि श्रावण सरी,
दोघांत आहे साम्य खूप.

बहरल्या हिरव्या डोंगर कडा,
गाभारी घुमला शंखनाद,
कौलावरती टीपटीप पाणी,
शब्द तुझे मज देती साद.

दुथडी भरून वाहे सरिता,
रोज तुझा वर्षाव नवा,
लपून बसला दिनकर कोठे?
स्पर्श गार ना उबदार हवा.

धो धो पडतो नुसता पाऊस,
तू श्रावण मी शब्द ओले,
ओलावल्या त्या भिंती काही,
असेच काही मन ही झाले...

गजानन बाठे

Group content visibility: 
Use group defaults

आवडली.
शेवाळलेल्या ऐवजी ओलावलेल्या हा शब्द मला अधिक आवडला असता.

Thank you sam0