झब्बू
कुलुपबंद (प्रकाशचित्रांचा झब्बू - ४) - समाप्त!
घराच्या आणि संगणकाच्या खिडक्यांना, मोटारीच्या आणि उद्वाहकाच्या दाराला, सामानाच्या बॅगेला आणि गोंधळ घातल्यावर धाग्याला काय लावतात? तर, कुलूप.
अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची प्रकाशचित्रे इथे एकत्र करूया.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुमच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या आणि विविध गोष्टींना लावल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांची प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
पाणी 'कपात' आहे. (प्रकाशचित्रांचा झब्बू - ३) - समाप्त!
टपरीवरचा चहा म्हणजे त्या छोट्याश्या पारदर्शक काचेच्या पेल्यातला, उडप्याकडचा चहा म्हणजे स्टीलच्या वाटीवर उपडा केलेला पेल्याताला. बीअरच्या ग्लासमध्ये वाईन नाही आणि वाफाळत्या कॉफीच्या कपात पाणी नाही. अर्थात काही विशिष्ट ठिकाणी चहा मुद्दाम पाण्याच्या ग्लासातून दिवसाच्या ठरावीक वेळी मिळतो, आणि तो प्यायला मिळावा म्हणून आपण गर्दीही करतो.
जगाच्या पाठीवर मायबोली (प्रकाशचित्रांचा झब्बू - २) - समाप्त!
जगाच्या पाठीवर मायबोली
मायबोलीकर जगात सगळीकडे आहेत आणि त्यांनी जगभरात विविध ठिकाणी प्रकाशचित्रंही काढलेली आहेत. पण या खेळात असे फोटो टाकायचे आहेत, ज्यात ते ठिकाण आणि मायबोलीचा लोगो दिसतो आहे. मग तो टीशर्ट, टोपी , बॅग किंवा इतर कुठल्याही वस्तूवरचा मायबोलीचा लोगो असू शकतो. प्रकाशचित्र देताना ते ठिकाण कुठलं ते लिहायला विसरू नका.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे तुमच्याकडे असलेली मायबोली लोगो आणि ते ठिकाण दिसणारी प्रकाशचित्रं टाकणं अपेक्षित आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
पहिले दान देवाला (प्रकाशचित्रांचा झब्बू - १) - समाप्त!
पहिले दान देवाला
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - खाद्ययात्रा "
गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - नाचे मयूरी" १५ सप्टेंबर
गणपती डान्स असो वा शिकून सवरून केलेल्या स्टेप्स ,पण नृत्य ही गोष्टच मुळी न टाळता येण्यासारखी.
जगातल्या प्रत्येक गोष्टीत एक ठेका सापडतो...मानव प्राण्यालाच कशाला निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला कधी ना कधी हा ठेका पकडण्याची इच्छा होतेच!
तुम्हाला तोच ठेका आपल्या कॅमेर्यात पकडायचा आहे.
निसर्गातील अशी कोणताही नृत्यातली एखादी स्टेप किंवा मुद्रा किंवा भाव दाखवणारा जीव/गोष्ट तुम्हाला तुमच्या कॅमेर्यात पकडायची आहे.
उदाहरणादाखल हे पहा -
प्रचि श्रेय - जिप्सी.
हे लक्षात ठेवा :
मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - रांगोळी" १७ सप्टेंबर
मोठ्ठी मोठ्ठी घरं, सारवलेलं अंगण आणि त्यावरची सुबकशी रांगोळी.. यथावकाश घरं आटोपशीर झाली, अंगणं हरवली, रांगोळीही काढण्या ऐवजी चिकटवता यायला लागली... पण रांगोळीची सुबकता कधीच कमी झाली नाही.
याच सुबकतेला माबोकरांसमोर मांडा आणि खेळा खेळ झब्बू रांगोळींचे.
नेमकं करायचंय काय? तर तुम्ही काढलेल्या, पाहिलेल्या,प्रसंगी बनवलेल्या देखील रांगोळींचे फोटोज इथे टाकायचेत आणि एकमेकांना झब्बू द्यायचेत.
हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - मलमली सौंदर्य माझे" १३ सप्टेंबर
पांढरा शुभ्र मोगरा असो वा लाल टपोरा गुलाब, फुलांकडे ना स्वतःचच एक सौंदर्य असतं...नुसत्या दर्शनाने मन सुखावाण्याची कला कोणाकडे असेल तर ती फुलांकडे...प्रत्यक्षात पहा किंवा प्रचिंमध्ये त्यांच सौंदर्य जराही कमी होतं नाही.
तुम्हाला हेच करायचय... फुलांच्या झब्बूंचे हार ओवायचेत...
हे लक्षात ठेवा :
१.प्रचि सोबत फुलाचं बोलीभाषेतील नाव आणि वैज्ञानिक नाव ही लिहायचय. माहीत नसल्यास माहीत नाही असा उल्लेख करावा, इतर खेळाडूही अशा फुलाचे बोलीभाषेतील आणि वैज्ञानिक नाव माहीत असेल तर सांगू शकतात
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - उलट सुलट" ११ सप्टेंबर
गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!
नेमकं करायचय काय?
१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -