प्रकाशचित्रे
मोबाईलवरून लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करायचा?
१) प्रतिसाद लिहिण्याच्या खिडकीच्या खाली लागूनच एक ओळ लिहिलीय. 'मजकुरात image किंवा link द्या.'
२) त्यातील image वर टिचकी मारा.
३) एक नवीन स्क्रीन उघडेल. ज्यात सर्वात वरच्या पट्टीवर 'Upload' 'Thumbnail' 'Delete' 'Insert file' लिहिलेलं दिसेल. त्यातील पहिल्या 'Upload' वर टिचकी मारा.
४) त्याच ठिकाणी एक नवीन खिडकी उघडेल. ज्यात लिहिलेलं असेल. 'Choose file' आणि खाली 'Upload'. तुम्ही 'Choose file' वर टिचकी मारा.
५) लगेच तुमच्या मोबाईलमधील फोटोंची गॅलरी उघडेल. तुम्हाला आवडेल तो फोटो सिलेक्ट करा.
कुलुपबंद (प्रकाशचित्रांचा झब्बू - ४) - समाप्त!
घराच्या आणि संगणकाच्या खिडक्यांना, मोटारीच्या आणि उद्वाहकाच्या दाराला, सामानाच्या बॅगेला आणि गोंधळ घातल्यावर धाग्याला काय लावतात? तर, कुलूप.
अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची प्रकाशचित्रे इथे एकत्र करूया.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुमच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या आणि विविध गोष्टींना लावल्या जाणाऱ्या सुरक्षा साधनांची प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
पाणी 'कपात' आहे. (प्रकाशचित्रांचा झब्बू - ३) - समाप्त!
टपरीवरचा चहा म्हणजे त्या छोट्याश्या पारदर्शक काचेच्या पेल्यातला, उडप्याकडचा चहा म्हणजे स्टीलच्या वाटीवर उपडा केलेला पेल्याताला. बीअरच्या ग्लासमध्ये वाईन नाही आणि वाफाळत्या कॉफीच्या कपात पाणी नाही. अर्थात काही विशिष्ट ठिकाणी चहा मुद्दाम पाण्याच्या ग्लासातून दिवसाच्या ठरावीक वेळी मिळतो, आणि तो प्यायला मिळावा म्हणून आपण गर्दीही करतो.
जगाच्या पाठीवर मायबोली (प्रकाशचित्रांचा झब्बू - २) - समाप्त!
जगाच्या पाठीवर मायबोली
मायबोलीकर जगात सगळीकडे आहेत आणि त्यांनी जगभरात विविध ठिकाणी प्रकाशचित्रंही काढलेली आहेत. पण या खेळात असे फोटो टाकायचे आहेत, ज्यात ते ठिकाण आणि मायबोलीचा लोगो दिसतो आहे. मग तो टीशर्ट, टोपी , बॅग किंवा इतर कुठल्याही वस्तूवरचा मायबोलीचा लोगो असू शकतो. प्रकाशचित्र देताना ते ठिकाण कुठलं ते लिहायला विसरू नका.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे तुमच्याकडे असलेली मायबोली लोगो आणि ते ठिकाण दिसणारी प्रकाशचित्रं टाकणं अपेक्षित आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
पहिले दान देवाला (प्रकाशचित्रांचा झब्बू - १) - समाप्त!
पहिले दान देवाला
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
घन ओथंबून आले, पिकात केसर ओले...
मुंबईत आज पाऊस सुरु झालाय. सकाळीच सरी आल्या. वातावरणही ढगाळच दिसतंय. खरं सांगायचं तर वेगळं व्यक्तीमत्व असलेला हा मुंबईतला एकमेव मोसम. थंडी आपली नावालाच आणि उन्हाळाही. मुंबईचा पाऊस म्हणजे धम्माल. मला अतिशय आवडणारा. काही चित्रे टिपली होती फुलांची ती आता टाकाविशी वाटताहेत. फुलांवरच्या जलबिंदुंची सर ओलेत्या रमणीच्या गालावरुन ओघळणार्या पाण्याच्या थेंबांशीच करता येईल.
'पितृऋण' - पुण्यातील प्रथमखेळ पुर्वसमयी काढलेली प्रकाशचित्रे
पितृऋण या चित्रपटाचा पुण्यातील प्रथमखेळ, काल संध्याकाळी, कोथरूडच्या सिटीप्राईड सिनेमागृहात आयोजीत करण्यात आला होता.
या खेळास सौ. सुधा मुर्ती येणार असल्याची पुर्वसुचना मिळाली असल्याकारणाने, 'सिटीप्राईड' येथे जरा आधीच 'उत्सुकतेने मी पोहोचलो'
अकु, स्निग्धा, इन्ना, मुग्धमानसी, मंगेश देशपांडे, साजीरा हे मायबोलीकर आलेले होते. एकमेकांशी ओळख-पाळख करून घेतली. अजूनही चित्रपटाशी संबंधित प्रसिद्ध चेहरा (आम्हाला माहीत असलेला) काही दिसेना, म्हणून मग आम्ही माबोकरांनी आपला(च) आपण(च) एक फोटो काढूया असे ठरवले.
१. तोच हा सुरुवातीचा फोटो
स्वागत २०१३ - सुधागडच्या माथ्यावरून...
२०१३ चा पहिला सूर्योदय सुधागडवरून पाहिला. हवामान ढगाळ असल्यामुळे सूर्यरावांनी पहिल्याच दिवशी 'लेटमार्क' नोंदवला. घनगड डोंगररांगेच्या पाठीमागून या सूर्योदयाची काही प्रकाशचित्रे -
१
२
३