जगाच्या पाठीवर मायबोली (प्रकाशचित्रांचा झब्बू - २) - समाप्त!

Submitted by संयोजक on 4 September, 2016 - 00:40

जगाच्या पाठीवर मायबोली

मायबोलीकर जगात सगळीकडे आहेत आणि त्यांनी जगभरात विविध ठिकाणी प्रकाशचित्रंही काढलेली आहेत. पण या खेळात असे फोटो टाकायचे आहेत, ज्यात ते ठिकाण आणि मायबोलीचा लोगो दिसतो आहे. मग तो टीशर्ट, टोपी , बॅग किंवा इतर कुठल्याही वस्तूवरचा मायबोलीचा लोगो असू शकतो. प्रकाशचित्र देताना ते ठिकाण कुठलं ते लिहायला विसरू नका.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे तुमच्याकडे असलेली मायबोली लोगो आणि ते ठिकाण दिसणारी प्रकाशचित्रं टाकणं अपेक्षित आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नये.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

उदा. इंडिया गेटसमोर मायबोली

20150325_153112.jpg
सौजन्य: वेमा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

आपला पास इथे..... अवघड आहे!
ओ संयोजक.... जरा सहभागी होता येइल असे विषय द्या ना राव!
एकतर ते पिकासा पण चालत नाहीये!

स्वरूप, हा धागा मायबोलीला वीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आहे.
अजून काही सोपे झब्बूचे धागे येणार आहेत. लॅंडींग पेजवर लिंक देण्याचे काम सुरू आहे.

अजय तुमच्या टोपीची भटकंती बघून अप इन द एयर पिक्चर आठवला. देशभर फिरण्यासाठीचे पैसे नाहीत म्हणून देशभर फिरणार्‍या भावाला होऊ घातलेल्या जोडप्या चं फोटो कट आऊट घेऊन जिकडे तिकडे फोटो काढायला सांगितलेलं असतं. Happy

कॅनन बीच वरच्या फोटोत सूर्यकिरणांचा पडदा एकदम अचूक पकडला आहे. Lol

@सशल
म्हटलं तर हे तसंय पण म्हटलं तर नाही. जवळ जवळ या सगळ्याच ठिकाणी राहणारे मायबोलीकर भेटले आहेत पण त्यांचे फोटो टाकायची एकतर परवानगी वेळेत मिळाली नाही किंवा त्यावेळेस मायबोलीचा टीशर्ट अंगावर नसेल.

एकदम क्रिएटिव्ह झब्बू बीबी आहे आत्तापर्यंतचा. दुर्दैवाने माझ्याकडे एकही फोटो नाही इथे टाकता येण्याजोगा.

@सायो,
झब्बू अजून ८ दिवस चालेल. "बारा" त घराबाहेर पडायचं तुमच्या गावातल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळाबरोबर फोटो काढायचा. आपआपलं अंगणपण चालेल की. कुठेही असलं तरी, ते पण जगाच्या पाठीवरंच की.

हा विषय अजून व्यापक करण्यासाठी :

मुंबई, महाराष्ट्र सोडून इतर जगभर जर कुठे काही मराठीतून लिहिलेलं, मराठीचा संदर्भ असलेलं काही दिसलं आणि त्याचा फोटो असेल तरीही यात देता येइल असं करा ना. म्हणजे विषय साधारण तोच असला तरी 'मायबोली' चा अर्थ अधिक व्यापक होईल.

Pages