टपरीवरचा चहा म्हणजे त्या छोट्याश्या पारदर्शक काचेच्या पेल्यातला, उडप्याकडचा चहा म्हणजे स्टीलच्या वाटीवर उपडा केलेला पेल्याताला. बीअरच्या ग्लासमध्ये वाईन नाही आणि वाफाळत्या कॉफीच्या कपात पाणी नाही. अर्थात काही विशिष्ट ठिकाणी चहा मुद्दाम पाण्याच्या ग्लासातून दिवसाच्या ठरावीक वेळी मिळतो, आणि तो प्यायला मिळावा म्हणून आपण गर्दीही करतो.
आपण विविध द्रव पदार्थांचे सेवन करतो आणि ते करण्यासाठी अनेकविध पदार्थांपासून (मटेरिअल) बनवलेल्या विविध आकाराच्या वस्तू वापरतो. या झब्बूमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या खास वस्तूंचा संग्रह करणार आहोत. प्रकाशाचित्रांबरोबर काही खास गोष्ट, टिपा असतील तर त्यासुद्धा वाचायला आम्हाला आवडतील. ज्या भांड्याचं प्रकाशचित्र तुम्ही टाकाल, त्यात मुख्यत्वे काय प्यायलं जातं, हे लिहायला विसरू नका.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुमच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या भांड्यांची (ज्यांतून द्रव पदार्थांचे सेवन केले जाते) प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदा.
हँड बीटन कॉफीचा 'हत्तीवाला'
हँड बीटन कॉफीचा 'हत्तीवाला' मग
मस्तच!! प्रकाशचित्र हे
मस्तच!!
प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे >>>>संयोजक, यापूर्वी काही प्रचि हे वॉटरमार्क टाकुन प्रदर्शित केले आहेत, त्यातलीच काही प्रचि वॉटरमार्क काढुन झब्बुसाठी टाकु शकतो का?
जिप्सी, इथे स्वतः काढलेल्या
जिप्सी, इथे स्वतः काढलेल्या फोटोना प्रताधिकाराची अट नाही, वॉटरमार्क असला तरी चालेल. फक्त पहिल्या झब्बूसाठी ती अट होती कारण ते दान होते.
जिप्सी, इथे स्वतः काढलेल्या
जिप्सी, इथे स्वतः काढलेल्या फोटोना प्रताधिकाराची अट नाही, वॉटरमार्क असला तरी चालेल. फक्त पहिल्या झब्बूसाठी ती अट होती कारण ते दान होते.>>>>>>धन्यवाद मॅगी. पहिल्या झब्बुसाठी वॉमा काढुन (पूर्वप्रकाशित) फोटो टाकले तर चालेल का?
हो चालेल
हो चालेल
आमचा "चहा" कपात आहे.
आमचा "चहा" कपात आहे.
हो चालेल>>>>>धन्यवाद मॅगी
हो चालेल>>>>>धन्यवाद मॅगी
चहा कपात!
चहा कपात!
वाइन आणो मार्गारिटा चे
वाइन आणो मार्गारिटा चे ग्लासेस
हालापिनो मार्गारिटा
हालापिनो मार्गारिटा
पावसाळी चहा
पावसाळी चहा
आला आला.... नवीन झब्बू
आला आला.... नवीन झब्बू आला!
धन्यवाद संयोजक
ताक आणि सोलकढी विथ मसाला
ताक आणि सोलकढी विथ मसाला पापड..... थोडक्यात मेन कोर्स येइपर्यंतचा टाईमपास!
पिना कोलाडा @ पूलसाइड.. पण
पिना कोलाडा @ पूलसाइड.. पण तो ग्लास फारसा स्पेशल नाही.
सांग्रिया
सांग्रिया
आजकाल हा बरणीसारखा ग्लास
आजकाल हा बरणीसारखा ग्लास बऱ्याच ठिकाणी असतो!
(No subject)
Use & Throw
Use & Throw
(No subject)
शुद्ध पाण्याची शुद्ध बाटली!
शुद्ध पाण्याची शुद्ध बाटली!
पणती कपात
पणती कपात
ऑफीसातला लेमन टी
ऑफीसातला लेमन टी
(No subject)
या कपातून मी 'आशा' प्राशन
या कपातून मी 'आशा' प्राशन करतो असं म्हटलं तर !
२०१४ साली आम्ही लडाख मॅरॅथॉन करता पुण्याहून निघालो होतो. आम्ही विरळ हवेचा / वातावरणाचा सराव व्हावा म्हणून मुद्दामच लेहचे तिकीट न काढता श्रीनगर पर्यंतचेच तिकिट काढले होते. जेणेकरून रस्त्याने कारगिल वगैरे करून आम्ही ४-५ दिवस आधीच लडाख मधे डेरेदाखल होऊ. परतीचे तिकिट मात्र 'लेह'हूनच होते. पण आम्ही श्रीनगरला पोहोचल्यावर दुसर्याच दिवशी माझ्या आईला इस्पितळात दाखल करावे लागल्यामुळे मला तिकडूनच परत यावे लागले. मी परत येण्यासाठी एअरपोर्ट वर पोहोचत असतानाच श्रीनगर मधे पुराचे पाणी भरू लागले होते. त्या वर्षी आलेल्या महाभयानक पुरामुळे माझे मित्र ही श्रीनगर मधेच जे अडकून पडले ते कसेबसे स्पर्धेच्या आदल्या रात्री १२ वाजता 'लेह' ला पोहोचू शकले. परतीची तिकिटे लेह पासून होती आणि श्रीनगर एअरपोर्ट ही अजून चालू झाला नव्हता. ते श्रीनगर मधून कसे बाहेर पडले ही खरे तर एक मोठी कहाणीच आहे पण सांगायचा मुद्दा हा की तशाही परिस्थितीत आमच्यातले काही बहाद्दर ती स्पर्धा धावले. राम यादवने पुर्ण मॅरॅथॉन तर अजून दोघांनी अर्ध मॅरॅथॉन... त्यांच्या सोबत मी असतो तर मी पण ही स्पर्धा पुर्ण केली असती असे म्हणून रामने मोठ्या प्रेमाने दिलेला हा कप आहे.
मागच्या वर्षी 'कैलास मानसरोवर' यात्रेमुळे मला लडाखला जाता आले नाही. पण हा कप बघीतला की माझी आशा पल्लवित होते की मी देखिल जगातील सर्वात उंचावरची मॅरॅथॉन (५३७० मी.) एक ना एक दिवस जरूर पुर्ण करेन.
(No subject)
मस्त आहेत सगळे फोटोज . पण जरा
मस्त आहेत सगळे फोटोज .
पण जरा रीसाईज करून टाका ना .
फोनवरून टाकताना साइझची गडबड
फोनवरून टाकताना साइझची गडबड झाली. थोड्या वेळात करते नीट.
पाहुणचाराचे प्रतीक!
पाहुणचाराचे प्रतीक!
एक रिकामा जाम कारण खरंच पाणी
एक रिकामा जाम कारण खरंच पाणी कपात आहे
पाहुणचाराचे प्रतीक!>>>
पाहुणचाराचे प्रतीक!>>> खरंय!!! तांब्या आणि वाटी!!!
Pages