गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!
नेमकं करायचय काय?
१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -
एखादं उदाहरण घेऊयात - समजा कोणी मिरचीचा फोटो टाकला तर पुढचा त्याला झब्बू म्हणून जिलेबीचा फोटो टाकू शकतो (तिखट-गोड) कोणी जिलेबीला झब्बू म्हणून सरळसोट रस्ता टाकू शकतं (सरळ-वेटोळं) कोणी रस्ता काळा म्हणून बगळ्याचा फोटो टाकू शकतं.... अॅण्ड सो ऑन.....
नियम -
१. सलग एकाच टाईपचा झब्बू नको. म्हणजे तिखटला गोड झब्बू दिल्यावर गोड ला परत तिखट (भले पदार्थ काहीही असो) झब्बू देऊ शकत नाही.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
लोकहो, इंद्रधनुष्यी
लोकहो, इंद्रधनुष्यी सौंदर्यावरुन नजर हटवा.. कारण आता तुमच्यासाठी आलाय नवा झब्बूचा खेळ. "उलट सुलट"
संयोजक, खेळ सुरु करायला पहिला
संयोजक, खेळ सुरु करायला पहिला फोटो टाका की.
अल्पना, संयोजक म्हणून न
अल्पना, संयोजक म्हणून न टाकता, खेळात भाग घेणारी एक म्हणून टाकला तर चालेल ना?
ही घ्या बर्लिन शहरातली एक रात्र.. चला द्या बरं मला झब्बू! :)
सिक्कीममधला दिवस... आता
सिक्कीममधला दिवस...
आता माझ्या फोटोला झब्बु म्हणून परत रात्रीचा फोटो नाही ना चालणार? (फोटोतला दुसरा एखादा घटक पकडून त्याच्या विरुद्ध झब्बु द्यायचा. बरोबर? )
बरोबर अल्पना..
बरोबर अल्पना..
खालची जमीन म्हणून वरचं
खालची जमीन म्हणून वरचं आकाश.......(चालेल बहुतेक!)
मस्त आहे ही कल्पना ....
मस्त आहे ही कल्पना ....
चालेल ना मानुषी!
चालेल ना मानुषी!
पांढरे ढग विरुध्द काळे ढग...
पांढरे ढग विरुध्द काळे ढग...
स्कायस्क्रेपर्स विरुद्ध वाडा
स्कायस्क्रेपर्स विरुद्ध वाडा
बंदिस्त वाडा विरुद्ध खुला,
बंदिस्त वाडा विरुद्ध खुला, हिरवागार, मोकळा ब्लॅकफॉरेस्टमधला निसर्ग
बंद दरवाजा विरुद्ध उघडा
बंद दरवाजा विरुद्ध उघडा दरवाजा.
अरे, दोन्ही फोटो एकाच वेळी
अरे, दोन्ही फोटो एकाच वेळी आले.
संयोजक, अशावेळी काय करायचं ते लिवा की.
मस्त आहे ही कल्पना पण असे
मस्त आहे ही कल्पना पण असे पटापट फोटो कुठून मिळवायचे?
हो हो लिवा लिवा ...अल्पना
हो हो लिवा लिवा ...अल्पना +१०० :स्मितः
अर्र्र अल्पना, आधी मामींना
अर्र्र अल्पना, आधी मामींना झब्बू म्हणून सिमेंटचे जंगल विरुद्ध हिरवागार निसर्ग म्हणून ब्लॅकफॉरेस्टचा फोटो देणार होते, तोवर मानुषीचा स्कायस्कृअॅपर विरुद्ध वाडा आला म्हणून त्या वाड्याला बंदिस्त ठरवून ब्लॅकफॉरेस्टच्या जंगलाला खुला निसर्ग केले, तोवर तुझा उघडा दरवाजा आला.
नताशा...........शोधा म्हणजे
नताशा...........शोधा म्हणजे सापडेल!
हार्डडिस्क वर शोधायचे, मग
हार्डडिस्क वर शोधायचे, मग त्याचा साइझ कमी करून टाकायचे. तोपर्यंत कदाचीत पुढचा झब्बु पण आलेला असू शकतो.
आता दोन्हीपैकी एक फोटो फायनल करुन त्याला झब्बु देत खेळ पुढे सरकवा. खेळ मस्त आहे हा, पण यात गोंधळ-गडबड उडणारच.
अशावेळी पहिला फोटोच मान्य
अशावेळी पहिला फोटोच मान्य करुन दुसरा बाद करायचा. सॉरी अल्पना.
- संयोजक मंडळातर्फे.
लोकहो, फोटो शोधून, साईझ कमी
लोकहो, फोटो शोधून, साईझ कमी करुन अपलोड करेपर्यंत नवीन फोटो आलेला असू शकतो. तेंव्हा प्रकाशित करण्यापूर्वी एकदा पेज रिफ्रेश करुनही बघा, म्हणजे जास्त झब्बू बाद होणार नाहीत.
- संयोजक मंडळातर्फे.
हिरवाई विरुद्ध उजाड माळरान
हिरवाई विरुद्ध उजाड माळरान
हरिण विरुद्ध सिंह
हरिण विरुद्ध सिंह
आयाळ = केस विरुध्द टक्कल.
आयाळ = केस विरुध्द टक्कल.
नताशा...........शोधा म्हणजे
नताशा...........शोधा म्हणजे सापडेल!>>> म्हणजे नेटवर शोधला तर चालेल का? मला वाटले स्वतः काढलेला पाहीजे.
स्वतः काढलेला किंवा स्वत:च्या
स्वतः काढलेला किंवा स्वत:च्या संग्रहातला, थोडक्यात, प्रताधिकार मुक्त हवा.
नियम क्र. ५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
म्युझिक वाजवणारी आधुनिक
म्युझिक वाजवणारी आधुनिक काळातली लहान मुलं विरुद्ध मध्ययुगातली मोठी माणसं
वादक विरुद्ध नर्तकी. चालेल
वादक विरुद्ध नर्तकी.
चालेल का?
हो हो चालेल, अल्पना..
हो हो चालेल, अल्पना..
आधुनिक नर्तकी विरुद्ध
आधुनिक नर्तकी विरुद्ध पारंपारीक नृत्यप्रकारातील स्त्रीवेशातील नर्तक
भारतातील पारंपारीक
भारतातील पारंपारीक नृत्यप्रकारातील नर्तक विरुद्ध परदेशातील पारंपारीक नृत्यप्रकारातील नर्तकी
Pages