नमस्कार मायबोलीकर,
दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही मायबोलीवर गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा झाला. यंदा आयोजित केल्या गेलेल्या सर्व उपक्रमांमध्ये आणि स्पर्धांमध्ये उत्साहाने आणि मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल सर्वांचे संयोजन मंडळातर्फे मनःपूर्वक आभार!
आपण आयोजित केलेल्या या वर्षीच्या दोन स्पर्धा:
१. पूर्णब्रह्म - पाककला स्पर्धा
१. तिखट पदार्थ
२. गोड पदार्थ
२. पत्र सांगते गूज मनीचे - पत्रलेखन स्पर्धा
दोन्ही स्पर्धांचे निकाल जनमत चाचणीने लावण्यात आले आहेत.
या स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे:-
नाव - आरोही कुलकर्णी
वय - ३ वर्षे ९ महिने
पत्र क्रमांक एक
प्रिय,
अशी बिचकू नकोस. आहेस तू मला प्रिय. कितीही तुझ्या विरोधी वागत असले तरीसुद्धा!! तू नेहमीच बरोबर वागतेस आणि मी नेहमीच चुकिच. ही एकमेकींची वृत्ती आपण चांगलीच ओळखून आहोत ना. पण ह्यापूर्वी अशी कधी गायब नव्हती झालीस तू.
असतेस कुठे हल्ली?? बर्याच दिवसात गाठभेट नाही आपली. शेवटची भेटलीस तेव्हा फार अस्वस्थ होतीस. मला ते समजून सुद्धा मी तुला त्याच कारण नाही विचारल. सवय नाही गं मला. नाठाळ आहे ना मी.
पत्र क्रमांक एक
प्रिय अभ्यास,
खुप दिवसापासून तुला पत्र लिहायच मनात होत. तशी तुझी आणि माझी ओळ्ख पाच सहा वर्षापासूनचीच आहे. पहिल्यांदा आपण भेटलो ते मी पहिलीत गेल्यावर. घरातले सगळेजण आई, बाबा, आजी, आजोबा तू येणार येणार असे म्हणत होते. मलाही बरच कुतुहल होत तुझ्याबद्द्ल. खुप अभ्यास करायचा म्हणजे नेमक काय करायच ?? किती कराय़चा तो ?? गेम आणि कार्टून का नाही खेळायचे मग ?? ताई करते तिच्याएवढा करायचा की तिच्यापे़क्षा जास्त ??
पत्र क्र. १
प्रिय बोंबिल
मेहेंदी रंग लाती है सुख जाने के बाद ह्या ओळींप्रमाणे श्रावणांत झालेल्या तुझ्या विरहामुळे तुझ्याबद्दल दाटून आलेल्या भावना आज पत्राद्वारे व्यक्त करत आहे.
तसा तू आणि तुझे इतर फ्रेंडसर्कल म्हणजे कोलंबी, पापलेट, बांगडा, रावस, मांदेली आणि इतर बरेच बालपणापासूनचेच सोबती. सोबती म्हणण्यापेक्षा फॅमिली मेंबरच. बुधवार, शुक्रवार, रविवार ह्या दिवशी तर तुमचे येणे हक्काचेच असते. तुम्ही घरच्यांचे सगळ्यांचेच लाडके असल्याने जेव्हा जेव्हा तुम्ही घरी असता तेंव्हा घरी गोकुळ नांदत. म्हणजे सगळे खुप खुष असतात. लहान मुलांपासुन वृद्धांपर्यंत सगळ्यांना जरा दोन घास जास्त जातात.
माझ्या प्रिय प्रिय लिखाणा,
आता काढत बस चुका वरच्या मायन्यातल्या. "प्रिय प्रिय ह्या सर्वात वरच्या स्थानावर तर तुझी लेक आहे मग त्या स्थानावर आज लिखाण कसं? असा मार टोमणा
बर आता मुद्याच बोलू? फार पटकन कंटाळा येतो रे आजकाल लिखाणाचा. बाकिच्यांना वाचायचा कंटाळा येईपर्यंत लिहूच नये असा शा.जो. मारायचा मोह होतोय तुला माहितेय मला तरीही सांगायचा वेडेपणा करतेय मी.