मुख्य पदार्थ :पनीर +मका
१) पेस्ट्री शीट
२) पनीर
३) टिन मधला मका
४) आवडीचे मसाले - चाट मसाला, जिरे पावडर, तिखट, मीठ
५) कोथिबीर
६) तेल
१) प्रथम पेस्ट्री शीट thraw करायला ठेवली.
२) टिन मधला मका मिक्सर मध्ये एकदाच फिरवला. थोडे दाणे राहिले पाहिजेत.
३) पनीर मधे चाट मसाला, जिरे पावडर, तिखट, मीठ मिसळून घेतले.
४) थोड्या तेलावर प्रथम मका परतला, नंतर पनीर मसाला घालून मिनीट भर परतले.
५) हे मिश्रण गार झाल्यावर पेस्ट्री शीट वर १ सेमीची जागा सोडून पसरले.
६) आता शीटची घट्ट गुंडाळी करुन टोके पाण्याने बंद केली.
७) गुंडाळी धारदार सुरीने कापून चकत्या केल्या.
८) ओव्ह्न मधे २०० डिग्रीला १५-२० मिनीटे बेक केले.
कमी कटकटीचे क्विक party अॅपेटायझर तयार आहे. फिंगर फूड सारखे serve करता येते. पिनव्हिल format मूळे आकषक दिसते. लहान-थोरांना आवडते. केचप/ चटणी बरोबर किंवा नुसतेही छान लागतात.
आयडिया चांगली आहे. फोटो ?
आयडिया चांगली आहे. फोटो ?
हा दिसतोय का?
हा दिसतोय का?
दिसतो आहे. छान आहेत
दिसतो आहे. छान आहेत पिनव्हिल्स
मस्त दिसतायत पिनव्हील्स.
मस्त दिसतायत पिनव्हील्स.
येस दिसतोय फोटो. एकदम कातील
येस दिसतोय फोटो. एकदम कातील आहे फोटो. आणि हे पटकन होणारे आहे. पार्टीला अपेटायझर म्हणून करता येईल.
मस्त !
मस्त !
सही! बाकरवड्यांसारखे
सही! बाकरवड्यांसारखे दिस्ताहेत.
छान आहे कल्पना .. खरोखर एकदम
छान आहे कल्पना ..
खरोखर एकदम कमी कटकटीची ..
(throw चं thaw करा ना .. :))
झटपट मस्त पाकृ
झटपट मस्त पाकृ
छान. सशलने सांगितली आणि अजून
छान. सशलने सांगितली आणि अजून एक दोन जागी शुद्धलेखन तपासले पाहिजे. प्रमाण हवे. अंदाजे एक पेस्ट्री शिट पाकिटात किती होतात? आणि त्यासाठी किती मका आणि पनीर? तसेच केचअप दिसतय त्याबद्दल टिपा द्या (चटणी चालेल इ इ ).
मका, पनीर, मैदा हे सगळ काय फार हेल्दी नाहीये (संयोजक वाचताय न?). पण तुम्ही बेक केलत त्यामुळे मला फार आवडल.
मस्त दिसतायतं!
मस्त दिसतायतं!
सही! बाकरवड्यांसारखे
सही! बाकरवड्यांसारखे दिस्ताहेत. >> +१
सही! बाकरवड्यांसारखे
सही! बाकरवड्यांसारखे दिस्ताहेत.>>++११
पेस्टी शीट की पेस्ट्री शीट
पेस्टी शीट की पेस्ट्री शीट ???/
आणि म्हणजे काय ? नवि मुंबई त कुठे मिळेल?
चारूता,
चारूता,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.
सिंडरेला, शूम्पी,
सिंडरेला, शूम्पी, स्वाती_आंबोळे, रूनी पॉटर, दीपांजली , मृण्मयी, सशल, तोषवी, चनस, मवा, सृष्टी धन्यवाद !
_आनंदी_ - Typo सुधारला आहे. मराठी टायपिंगची सवय नसल्याने आणि गडबडीत पाककृती टंकल्याने चूक राहून गेली. नवि मुंबई त पेस्ट्री शीट कुठे मिळेल या बद्द्ल कल्पना नाही. पण बेकरी सामानाच्या दुकानात अवश्य मिळेल.
सिमन्तिनी - अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद. केचपची टीप टाकली आहे. साधारण २८*२२ सेमीच्या शीटसाठी १ कप मका + १ कप पनीर लागले (मध्यम१२-१४ पीनव्हिल झाले). मका, पनीर, मैदा हे सगळ काय फार हेल्दी नाहीये, पण हे केवळ अॅपेटायझर सारखेच खायचे आहे
पिकनीक, पॉटलकसाठी सोयीचा आहे.
एकदम वेगळी पाककॄती. खूप
एकदम वेगळी पाककॄती. खूप आवडली.
छान आहे. डब्यात पण देता येइल.
छान आहे. डब्यात पण देता येइल. पेस्ट्री शीट किंवा आपल्या कडे समोसा पट्टी मिळते ती शॉपराइट मध्ये व्हेज फ्रोजन फूड सेक्षन मध्ये भेटेल.
हा पदार्थ कल्पक आहे. >>मैदा,
हा पदार्थ कल्पक आहे.
>>मैदा, पनीर,..<<
हे हेल्दी नसला तरी भाजीसारखा नाही खायचा आहे. व रोज रोज कोण खातो असे.
छान आहे ह प्रकार. मैदा अगदीच
छान आहे ह प्रकार.
मैदा अगदीच अपायकारक आहे असे नाही. त्या सोबत भरपूर फायबर घेतले तर चांगले. इथे मका आणि कोथिंबीर आहेच.
पण हे केवळ अॅपेटायझर सारखेच
पण हे केवळ अॅपेटायझर सारखेच खायचे आहे स्मित >>> चारुता, सिरीयसली कोण थांबेल बर एक दोन खाऊन?
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383