गझल

स्मृती

Submitted by pulasti on 7 February, 2013 - 15:49

किल्मिष, गोंधळ, शंका सगळी...निवळू दे
सुन्या नभावर शुभ्र निळाई पसरू दे

चित्रामध्ये निसर्गास रंगवताना
ऋतू आपल्या मनातलाही मिसळू दे

कुणी आखले? का मीही पळतो यावर?
रुळावरूनी गाडी थोडी घसरू दे

कधी वाटते, घट्ट स्मृतींना पकडावे
कधी वाटते...सगळे काही विसरू दे

तडफड होते त्याची अन आम्ही म्हणतो -
"गझलेमध्ये जरा सफाई येऊ दे"

शब्दखुणा: 

उंची

Submitted by समीर चव्हाण on 6 February, 2013 - 07:42

उदासीचेच गाणे हृदय गावे
सुखाच्या सावलीशीही चळावे

तुला जगण्यात मी झालो नकोसा
मला जगणे नकोसे का न व्हावे

तुझी उंची तुला ठाऊक नाही
किती माझ्या अपेक्षांनी झुकावे

मला झाले दिसेनासे तुझे जग
तुला मी सोडुनी सगळे दिसावे

कशाला आस ताणावी, उगाचच
कशासाठी पुन्हा वळुनी पहावे

(हौस संग्रहातून)

शब्दखुणा: 

दूरच्या नादात होती जिंदगीभर पावले (खयाली तरही)

Submitted by -शाम on 2 February, 2013 - 09:59

जे जवळ होते न त्याचे मोल केंव्हा जाणले
दूरच्या नादात होती जिंदगीभर पावले

कोण जाणे ती निरागस माणसे गेली कुठे
वाढली गावात सार्‍या मुखवट्याची जंगले

चार असुनी लेक होते दूरदेशी नेमके
शेवटी शेजारच्यांनी प्रेत त्याचे उचलले

मी अजुनही जीवनाशी झुंजतो आहे तसा
सोबती असतीस तू तर कष्ट नसते वाटले

काल होते ठरविले की देव नाही या जगी
आज अडता श्वास थोडा कर पुन्हा मी जोडले

'शाम' उंची गाठताना भान मातीचे हवे
काय कुठल्या पाखराचे अंबरावर भागले?

.......................................................शाम

शब्दखुणा: 

शेवटी मिसळेन पण मातीत मी (तरही)

Submitted by मिल्या on 1 February, 2013 - 01:38

तरही लेखनाचा माझाही एक प्रयत्न

डॉ. नी दिलेली ओळ बदलून घेतल्याबद्दल आधी त्यांची माफी मागतो

काल तर झालो मला माहीत मी
आज का आलो पुन्हा शुद्धीत मी?

शक्य नाही आपले जमणे कधी
आग तू आहेस अन् नवनीत मी

कुवत नसताना भरारी घेउनी
लोटले आहे मला खाईत मी

सावलीने साथ देणे सोडले
अन् उन्हाला टाकले वाळीत मी

आज रस्ता संपता संपेचना
आज आहे नेमका घाईत मी

सोडले आता स्वत:ला भ्यायचे
(तेच घडले ज्यास होतो भीत मी)

रोज क्षितिजे नवनवी ओलांडतो
शेवटी मिसळेन पण मातीत मी

दुरापास्त

Submitted by समीर चव्हाण on 29 January, 2013 - 03:45

मनासारखे होत नाही म्हणून
स्वतःवर असे का रहावे रुसून

दिवे लोचनांचे कुणी जाळलेत
कुणाचे न गेलेय मन काजळून

तसा एक मी पोर हेही खरेच
जरी धाकटी वागते ती जपून

बरे चालले दिवस एकेक मात्र
कुठे चाललो प्रश्न उरतो अजून

सये एवढा जीव लावू नकोस
दुरापास्त होईल जाणे निघून

शब्दखुणा: 

आपलाच पत्ता येर बनला...

Submitted by अ. अ. जोशी on 27 January, 2013 - 08:24

प्रेम ओतले, आहेर बनला
मागणी मिळेना, केर बनला

ठेवले मनाचे दार उघडे
शब्द येत गेले, शेर बनला

अपयशात कळली फोल नाती
आपलाच पत्ता येर बनला

आसरा दिला दुःखी मनाला
काळजात येता हेर बनला

ऊस वाचण्या तो देह जळला
आणण्यास गोडी पेर बनला

ते महत्व गुणवत्तेस नव्हते
वर्तुळासभोती घेर बनला

शब्दखुणा: 

तुझी स्पंदने आज लपवू नको...

Submitted by अ. अ. जोशी on 27 January, 2013 - 02:26

मुखी ओढणी फार ओढू नको
तुझी स्पंदने आज लपवू नको

तुझी स्वप्न पडतात जागेपणी
मला एवढे वेड लावू नको

मनाशी तुझ्या खेळलो फार मी
अता तू पुन्हा तेच खेळू नको

तुला सांगण्याचे किती ठरविले
तरी प्रश्न, सांगू कि सांगू नको ?

तुला वाटते काय माझ्याविना ?
मनातील सोडून ऐकू नको

जगाशी तुझे काय नाते असे...
असू दे, मला फार पटवू नको

किती चांगले चालते आपले..
जुने पान मध्येच चाळू नको

शिकविण्या धडा वासनेला 'बले'
कुणाचीच तू वाट पाहू नको

असे ठाण मांडून हृदयात तो
मनी मान ईश्वर कि मानू नको

शब्दखुणा: 

गँग्ज ऑफ गझलपूर : एपिसोड १

Submitted by भुंगा on 25 January, 2013 - 00:10

कथानकातील पात्र, संकल्पना आणि घटना याचे प्रत्यक्ष घटनांशी आणि पात्रांशी दुरान्वयाचाही संबंध नाही.
ओघात आलेली काही नावे ही त्या क्षेत्रातलं त्यांचं "दखलपात्र काँट्रिब्युशन" असल्याने आलेली आहेत. निर्मितीसंस्था, लेखक दिग्दर्शक यास जबाबदार नाही. जबाबदारी दिली गेल्यास पुन्हा पुढचे एपिसोड लिहिण्यात येतील Proud

विशेष आभारः बेफिकीर, रणजीत, कणखर, आणि प्रसादपंत.

मान्यवर गझलकारांच्या यादीत बरीच नावं राहून गेली आहेत ते लेखकाचे तोकडे ज्ञान समजून सोडून द्यावे.

***************************************************************************************************************

विषय: 

सहजतेने तू टाळते विषय हा जरी आपला

Submitted by मंदार खरे on 22 January, 2013 - 04:14

सहजतेने तू टाळते विषय हा जरी आपला
सुखासाठी तुझ्याच मजकुर बाकी नाही छापला

समजण्यात सौख्य सारे दु:ख विखारी जाळी मना
आपणच मानणे यातना देणाराही आपला

पतंग होते नभात कैक माझाही त्यात एकला
दुसर्‍यांचे काय सांगू आपल्यांनीच तो कापला

तुज सौंदर्याचा मोह मजलाही होता जाहला
म्हणू नकोस परत कधीच का नाही बोलला

होइल आठवण ग प्रीतीची गोष्ट कुणी बोलता
"मंदार" सम दिलदार तुजला होता कधी लाभला

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गझल