Submitted by अ. अ. जोशी on 27 January, 2013 - 08:24
प्रेम ओतले, आहेर बनला
मागणी मिळेना, केर बनला
ठेवले मनाचे दार उघडे
शब्द येत गेले, शेर बनला
अपयशात कळली फोल नाती
आपलाच पत्ता येर बनला
आसरा दिला दुःखी मनाला
काळजात येता हेर बनला
ऊस वाचण्या तो देह जळला
आणण्यास गोडी पेर बनला
ते महत्व गुणवत्तेस नव्हते
वर्तुळासभोती घेर बनला
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वृत्तामुळे असेल ....खूप वेगळी
वृत्तामुळे असेल ....खूप वेगळी वाटली
कवाफी आवडली
मतला व मक्ता फारसे समजले नाहीत
एकंदर ; गझल आवडली , छान आहे
एक्दम वेगळी गझल. येर म्हण्जे
एक्दम वेगळी गझल. येर म्हण्जे काय?
आवडली
आवडली
प्राजु, येर हे परके अशा
प्राजु,
येर हे परके अशा अर्थाने आहे.
वैभव,
शेवटच्या शेरात (याला मक्ता म्हणू नका. कारण मी नाव घातले नाही शेरात.) माणसांचा "घेर" अशा अर्थाने घेतले आहे. पहिला शेर सोपा आहे, आपण प्रेमाने आहेर म्हणून काही द्यावे बघतो, पण कुणीच घेत नाही, मग त्याचा केर होतो.
अरविंद,
धन्यवाद..!
याला मक्ता म्हणू नका. कारण मी
याला मक्ता म्हणू नका. कारण मी नाव घातले नाही शेरात.>>>
तखल्लुस नसेल तर शेवटच्या शेरास मक्ता म्हणू नये असा काही नियम महीत नव्हता आपण दिलेली माहिती बरोबर असेल तर त्यासाठी धन्स (नसेल तर धन्स नाही असे मानावे :))
बर मग जोशी साहेब जर शायराने तखल्लुस वापरून केलेला शेर गझलेत अधे मधेच माण्ड्ला तर तो शेर मक्ता होवू शकतो का या बद्दल आपणास काही माहीती आहे का जरूर कळवणे
धन्यवाद
वैभव, ****** मक्ता अरबी भाषा
वैभव,
****** मक्ता अरबी भाषा का शब्द है. जिसका अर्थ है-कटा हुआ, विच्छिन्न यह ग़़ज़ल का अखिरी शेर होता है. अरबी, फारसी व उर्दू परम्परा के अधिकांश शायरों ने इस तथ्य की पहचान कराने के लिये, कि यहां ग़ज़ल पूर्ण होती है और इसके पश्चात अन्य कोई शेर नहीं है. मक्ते में अपने उपनाम (तखल्लुस) का प्रयोग किया है. यों आज भी कुछ-शायर इस परम्परा का औपचारिक निर्वाह कर रहे हैं. अर्थाथतः यदि मक्ते में तखल्लुस का प्रयोग न किया जाये तो मक्ते की पहचान कर पाना बेहद कठिन होगा क्योंकि शेरों को उत्कृष्ता की दृष्टि से बढते हुए क्रम में रखा जाता है, इस कारण मक्ते को ग़़ज़ल का सर्वश्रेष्ठ शेर बनाने का हर संभव प्रयास ग़़ज़लकारों ने किया है. किन्तु ग़़ज़ल में बाद का कोई भी अच्छा शेर मक्ता होने का सूचक नहीं है क्योंकि उसके बाद और अच्छा शेर हो सकता है. तखल्लुस के प्रयोग का महत्व इसी कारण है कि वह ग़ज़ल की अंतिम कड़ी होने की सूचना देता है. - "शाद" *******
असाही एक विचार आहे.