Submitted by -शाम on 2 February, 2013 - 09:59
जे जवळ होते न त्याचे मोल केंव्हा जाणले
दूरच्या नादात होती जिंदगीभर पावले
कोण जाणे ती निरागस माणसे गेली कुठे
वाढली गावात सार्या मुखवट्याची जंगले
चार असुनी लेक होते दूरदेशी नेमके
शेवटी शेजारच्यांनी प्रेत त्याचे उचलले
मी अजुनही जीवनाशी झुंजतो आहे तसा
सोबती असतीस तू तर कष्ट नसते वाटले
काल होते ठरविले की देव नाही या जगी
आज अडता श्वास थोडा कर पुन्हा मी जोडले
'शाम' उंची गाठताना भान मातीचे हवे
काय कुठल्या पाखराचे अंबरावर भागले?
.......................................................शाम
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोण जाणे ती निरागस माणसे गेली
कोण जाणे ती निरागस माणसे गेली कुठे
वाढली गावात सार्या मुखवट्याची जंगले... वा वा!
काल होते ठरविले की देव नाही या जगी
आज अडता श्वास थोडा कर पुन्हा मी जोडले...क्या बात !
शाम, सुन्दर गझल. खयाल मस्तच.
शाम, सुन्दर गझल. खयाल मस्तच.
काल होते ठरविले की देव नाही
काल होते ठरविले की देव नाही या जगी
आज अडता श्वास थोडा कर पुन्हा मी जोडले <<< खल्लास >>>
बढिया शेर...
.. धन्यवाद दोस्तांनो!
..
धन्यवाद दोस्तांनो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वात अचूक खयाली तरही.
सर्वात अचूक खयाली तरही. अभिनंदन शाम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद
क्या बात है........
क्या बात है........
शाम - चांगली जमलीय गझल
शाम - चांगली जमलीय गझल
काल होते ठरविले की देव नाही
काल होते ठरविले की देव नाही या जगी
आज अडता श्वास थोडा कर पुन्हा मी जोडले
'शाम' उंची गाठताना भान मातीचे हवे
काय कुठल्या पाखराचे अंबरावर भागले? >>> हे शेर विशेष आवडले. त्यातही 'उंची-माती' हा अधिक.
मस्त आहे, गझल आवडली.
मस्त आहे, गझल आवडली.
सुंदर गझल! निरागस माणसे आणि
सुंदर गझल!
निरागस माणसे आणि जंगले यांचा संबंध कळला नाही. (तो असण्याची आवश्यकता नाही, असे वाटत असल्यास गोष्ट वेगळी.)
निरागस माणसे आणि जंगले यांचा
निरागस माणसे आणि जंगले यांचा संबंध कळला नाही.>>>> माणसेच उरली नाहीत तर अशा ठिकाणी जंगलच माजणार ना आया? ओळींना पुरेसा सहसंबंधयुक्त अर्थ आहे असे मला वाटत आहे.
धन्यवाद खूप खूप!
बहुत बढीया.....
बहुत बढीया.....
(तो असण्याची आवश्यकता नाही,
(तो असण्याची आवश्यकता नाही, असे वाटत असल्यास गोष्ट वेगळी.)<<<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
लग्न झाल्यावर यात्री सुटलाच आहे
(No subject)