Submitted by मंदार खरे on 22 January, 2013 - 04:14
सहजतेने तू टाळते विषय हा जरी आपला
सुखासाठी तुझ्याच मजकुर बाकी नाही छापला
समजण्यात सौख्य सारे दु:ख विखारी जाळी मना
आपणच मानणे यातना देणाराही आपला
पतंग होते नभात कैक माझाही त्यात एकला
दुसर्यांचे काय सांगू आपल्यांनीच तो कापला
तुज सौंदर्याचा मोह मजलाही होता जाहला
म्हणू नकोस परत कधीच का नाही बोलला
होइल आठवण ग प्रीतीची गोष्ट कुणी बोलता
"मंदार" सम दिलदार तुजला होता कधी लाभला
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंदार http://www.maayboli.com
मंदार
http://www.maayboli.com/node/21889
हा धागा व्यवस्थित पहा...... जरा अभ्यास करा.लिहायची घाई करु नका.
तुमची ही रचना गझल नाही आहे.
धन्यवाद श्री डॉ.कैलास
धन्यवाद श्री डॉ.कैलास गायकवाड
मी तुम्ही दिलेला धागा काळजीपुर्वक वाचला
मात्रा पण तपासून बघितल्या
घाई कदाचित झाली असेल पण ती शिकण्याची फक्त
क्रुपया तुमच्या मते वरील रचना गझल नसण्याला काय कारण असावे सांगावे जेणे करुन सुधारणा करता
येइल
परत मनापासुन धन्यवाद
वरील रचना गझल नसण्याला काय
वरील रचना गझल नसण्याला काय कारण असावे>>>
वृत्त : आपण म्हणत आहात तर असतीलही बरोबर पण फक्त मात्रा मोजून चालत नाही लयही असयला हवी तुमच्या रचनेत लय नक्की समजली नाही (अक्षरगणवृत्तात आधी लिहा लयीचा अभ्यास करणे सोपे होईल )
काफिये :आपला, कापला, आपला (रिपीट), इथवर् बरोबर ...... बोलला , लाभला चालत नाही ...अलामत बद्दल नियम पुन्हा नीट वाचा
खयाल आकर्षक आहेत अजून कसदार व दर्जेदार नक्कीच लिहू शकाल तुम्ही
मराठी भाषा या विषयाचा अभ्यास अत्यावश्यक आहे तोही करा
_____________________________________________---
डॉ.साहेबांचे मार्गदर्शन लाभणे ही भाग्याची बाब आहे याची जाणीव ठेवावी
त्यांचे म्हणणे सदैव ध्यानात असू द्यावे
सुसंधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा
पुलेशु
श्री वैवकु/डॉ.कैलास
श्री वैवकु/डॉ.कैलास गायकवाड,
तुमचे सुध्द्दा मनापसुन धन्यवाद
चूक उमगली नक्कीच सुधारीन
मनपासुन धन्यवाद
लिहलेली रचना काढायची सोय सुध्द्दा माबो ने करावी
म्हणजे माझ्या सारख्यांना सोपे जाइल
धन्यवाद
रचना आधी कागदावर टिपून घ्यावी
रचना आधी कागदावर टिपून घ्यावी स्वतः अभ्यास करावा सर्व तांत्रिक बाबी तपासाव्यात
रचना खूप विचाराअंती पेश करावी
वेळ कितीका लागेना !
गा गा ल गा ल गा
गा गा ल गा ल गा गा..........गा गा ल गा ल गा गा
माझीच खोड वेडी..... शाब्दिक जाण नाही
गांडीव लांब ओढी भात्यात बाण नाही
मंदार, गझल वृत्तात असणे
मंदार,
गझल वृत्तात असणे आवश्यक आहे. मात्र, मराठी लोक काही गोष्टी मानत नाहीत. तुमची गझल वृत्तात एकवेळ नसती तरी चालली असती. पण, विचार सांगण्याची पद्धत सरळसोट वाटते. त्यात थोडे नाट्य जर आपसुकच आले असते तर चांगले वाटले असते. तरी तुम्ही केलेला प्रयत्न छान.
केवळ जालावरील लिखाणांवर अवलंबून न राहता, प्रत्यक्षही मिळाले तर ओरिजिनल वाचा, संभ्रम आपोआपच दूर होईल. विचारात तीव्रताही येईल.
तुम्ही वरील प्रतिसादात एक शेर दिला आहेत. तो बरोबरच आहे.
@मंदार - ह्या प्रतिक्रिया आणि
@मंदार - ह्या प्रतिक्रिया आणि सल्ले ऐकुन वाइट वाटुन घेउ नका आणि लक्ष ही देऊ नका.
तुम्ही तुमची गजल माबो वर टाकण्या आधी २ महिने प्रोफेसर, डॉक्टर, कु ह्यांच्या पाडलेल्या रचनेला प्रचंड दाद देत चला. एकदा त्यांनी त्यांच्या ग्रुप मधे तुम्हाला घेतले की तुमच्या गजलांना पण भरपुर दाद मिळेल.
हे तू माझी पाठ खाजव, मी तूझी खाजवतो असे आहे, त्यांच्यात सामिल व्हा नाहीतर ते असेच तुम्हाला टोची मारतील.