पुण्यातल्या कच-याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. गेले काही महीने कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी साठलेले कच-याचे ओंगळवाणे ढीग पाहून आपण एका सांस्कृतिक राजधानीच्या शहरात राहतो हे खरे आहे का असे वाटू लागलेले आहे. ठिकठिकाणी रस्ते कच-याच्या ढिगाने अडले आहेत. पाश्चात्य देशातले नागरीक आश्चर्याने कचरा व्यवस्थापनाकडे पाहतात. काही ठिकाणी कच-याला रात्री आग लावून दिली जाते. नागरी वस्तीत कचरा जाळायला मनाई आहे, कारण त्यामुळे घातक वायूंची निर्मिती होते. पण असा साठवून ठेवण्याने आरोग्याला धोका होतोच आहे.
हे पुस्तक माणसातल्या मेंदुवरच नाही तर मेंदुतल्या माणसावरच आहे. म्हणजे पुस्तकाच स्वरुप हे रोजच्या व्यवहारातल मेंदुविज्ञान अस आहे. रंजकता व सुलभीकरण हे वैज्ञानिक आशयाला बाधा आणणारे असते असा गैरसमज जो असतो तो या पुस्तकाने नक्की दूर होतो. पुस्तकाची शैली ही वाचकाभिमुख आहे. चांगले नातेसंबंध जपण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी विज्ञान हे एक साधन आहे अशी लेखकद्वयांची धारणा आहे. को॓हम् हा प्रश्न अध्यात्मात जेव्हढा गहन आहे तेवढाच विज्ञानात. माझ्या जगण्याचे प्रयोजन काय? जाणीव म्हणजे काय? आकलन म्हणजे काय? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपापल्या परीने वैज्ञानिक व तत्वज्ञ करीत आलेले आहेत.
मी भारत सोडला आणि सर्वप्रथम एक वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये राहिले. त्यानंतर स्कॉटलंडला आले आणि येथलीच झाले. ह्या दोन्ही देशांत विद्यापीठांमध्ये संशोधन सहाय्यक म्हणून काम केले आणि मोठा अलिबाबाचा खजिना असल्यासारखे संशोधनाचे विश्व माझ्यापुढे खुले झाले. आयुष्यात करण्यासारखे आणि शिकण्यासारखे कितीतरी आहे हे कळले. आपले ज्ञान किती खुजे आहे आणि नवीन ज्ञान मिळविण्यात आणि संशोधन करण्यामध्ये कितीतरी आत्मिक आनंद आहे हे जाणवले . हा आत्मिक आनंद अधिकाधिक मिळविता यावा म्हणून संशोधनात पदवी (डॉक्टरेट) घेण्याचे ठरविले. शिष्यवृत्तीसकट मला पीएच. डी. ला प्रवेश मिळाला आणि माझा एक सुंदर प्रवास सुरु झाला. पीएच.
आजच्या चतुरंग मध्ये प्रा रोहिणी गोडबोले ह्यांनी एक लेख लिहिला आहे.
लेखाची लिंक : http://www.loksatta.com/chaturang-news/women-scientist-need-of-time-1076...
त्या WiS ( Women in Science ) तर्फे आयोजित केलेल्या सेमिनार / चर्चा सत्रान्माध्येही ही आकडेवारी , मते नेहेमीच मांडत असतात . मलाही भेटल्या की सतत उत्तेजन देतात .
रोहिणीताई indian academy of sciences च्या WiS उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.
काही कारणाने अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या बेनवडी इथे जाणं झालं. आणि वाटलं आपल्या आसपास आपल्या संस्कृतीचे पुरातन अवशेष विखुरलेले आहेत आणि आपण त्याबद्दल अनभिज्ञ आहोत.
अगदी तशीच जाणीव बेनवडीला या पुरातन मंदिराला भेट दिल्यावर झाली.
या परिसरात गेल्याबरोबर मन अगदी कुठे तरीच पुरातन काळात ओढ घेऊ लागलं आणि मनात एक अनामिक हुरहुर ठाण मांडून बसली.
कर्जत तालुक्यात शिरल्यावर मेन रोड सोडून जेव्हा एका छोट्या रस्त्याला लागलो तेव्हा काही मिनिटांनी अचानकच समोर एक कळस दिसायला लागला.
निवडणुकीचे निकाल आल्या आल्या केजरीवाल व त्यांच्या टिम ने केंद्र सरकारला भेटून दिल्लीला पुर्ण राज्य देण्यासंबंधी मागणी केली.
आता पर्यंत दिल्ली ही केंद्रशासित प्रदेश म्हणुन माहीती होती. मध्ये मध्ये दिल्लीला राज्य व्हावी अशी मागणी होत होती. पण त्याला पुर्णत: मान्यता मिळालेली नव्हती. गेले बरीच वर्षे दिल्लीत आणी केंद्रात काँग्रेसचे सरकार असुनही हा महत्वाचा निर्णय त्यावेळच्या संपुर्णपणे जनसेवेला वाहीलेल्या, सतर्क अश्या सरकार ने कधीही घेतला नाही. याचा अर्थ हा प्रश्न जनतेच्या प्रगतीशी पर्यायाने देश्याच्या भविष्याशी जोडलेला नसावा !!
स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती.
आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत.
पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.
काही वेळा कितीही छान प्लॅनिंग केलेलं असलं तरी आपल्या हातात नसलेल्या घटकांमुळे ट्रिपमधला एखादा दिवस गंडतो. भीमबेटकाचं तसंच झालं!
मला आणि लेकीला बरं नसल्यानं त्या दिवशी हॉटेलमधून निघायलाच उशीर झाला. त्यातून अचानक आदल्या रात्रीपासून पाऊस सुरू झालेला. हवा चांगलीच गारठलेली आणि पावसाची पिरपिर सुरूच होती. आणि त्यादिवशी आमच्या अजेंड्यावर दोन ठिकाणं होती - सांची आणि भीमबेटका. भोपाळ पासून दोन्ही ठिकाणं दोन वेगवेगळ्या दिशेला.
मी तुझा चंद्र झालो....
केव्हा काय विचारतेस?
तोंड धुता धुता...
हळू हळू मागे सरकणार्या कपाळरूपी किनारपट्टीकडे पाहून
कुठपर्यंत पाणी मारावं समजलं नाही....
...तेव्हाच.
काही काळापूर्वी एका आस्थापनेत प्रशिक्षण देण्याकरिता गेलो होतो. प्रशिक्षणाचा विषय होता - समस्या सोडविण्याची तंत्रे (Problem Solving Techniques). समोर बसलेल्या प्रशिक्षणार्थींना मी समस्या सोडविण्याचं माझं नेहमीचं तंत्र सांगत होतो. गुंतागुंतीची क्लिष्ट अशी काही समस्या नसतेच मुळी. असा काही असतो तो आपला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. जगाच्या दृष्टीने अतिशय गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या समस्या केवळ काही सोप्या कल्पना वापरून सोडविल्या जाऊ शकतात (Complex Problems can be solved using simple ideas). खरे तर व्यवहारातील अनेक समस्या या आपण कुठलेही उपाय वापरण्याआधीच सुटलेल्या असतात.