संशोधन/अभ्यास

Research/Studies

तडका - ग्रुप काढताना

Submitted by vishal maske on 8 October, 2015 - 12:09

ग्रुप काढताना

स्वातंत्र्य आहे म्हणून तर
हल्ली ग्रुप काढले जातात
एका-एका सदस्याचेही
ग्रुप वरवर वाढले जातात

ग्रुप काढण्याला बंधन नाही
उपद्रवी लक्षण टळलं पाहिजे
ग्रुपमध्ये कोण असावं,नसावं
ग्रुप अॅडमीनला कळलं पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - गणपती

Submitted by vishal maske on 26 September, 2015 - 21:17

गणपती

गणपती ऊत्सवाचा क्षण
सालाबादाने घडून येतो
अन् दहा दिवसांचा पाहूणा
पुन्हा-पुन्हा सोडून जातो

पुढच्या वर्षीचं निमंत्रणही
त्याला आठवणीनं दिलं जातं
अन् गणपती जाण्याचं दु:ख
आनंदाने साजरं केलं जातं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - स्रीया

Submitted by vishal maske on 22 September, 2015 - 11:59

स्रीया

महिलाही जाणू लागल्या
सामाजिक जबाबदार्‍या
चांगल्या समाज निर्मितीच्या
घेऊ लागल्या खबरदार्‍या

झपाट्याने होणार्‍या प्रगतीच्या
स्रीयाही कारण झाल्या आहेत
सत्कार्य करता-करता मात्र
कुकर्मातही पुढे आल्या आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - शिकताना

Submitted by vishal maske on 10 September, 2015 - 20:13

शिकताना

शिकण्यासाठी खुप आहे
शिकणाराने जाणले पाहिजे
सदैव शिकण्याचे ध्येय
नसा-नसात भिनले पाहिजे

कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी
कधीच कुठलेही भय नसते
कधीही काहीही शिकू शकतो
शिकण्याला ठराविक वय नसते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सत्य

Submitted by vishal maske on 7 September, 2015 - 20:27

सत्य

नैतिकतेचा आजकाल
का राहिला नाही धाक
सत्य जरी दिसलं तरी
का असते डोळेझाक,.?

सत्य बघतात लोक
सत्य जगतात लोक
सत्य बघता-जगता का
सत्य झाकतात लोक,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

महाभारताचे जीवन सार: (भाग २)

Submitted by निमिष_सोनार on 26 August, 2015 - 02:16

अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण:

आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.

शब्दखुणा: 

महाभारताचे जीवन सार: (भाग १)

Submitted by निमिष_सोनार on 24 August, 2015 - 02:38

महाभारतात संपूर्ण जीवनाचे सार सामावले आहे. महाभारत कथा जीवनाच्या प्रत्येक विषय आणि अंगाला स्पर्श करते. मी एकेक करून ते आपल्यापुढे मांडत आहे, अर्थात जसे मला ते जाणवले किंवा समजले तसे! - निमिष सोनार - पुणे (sonar.nimish@gmail.com)

तडका - घडणार्‍या गोष्टींत

Submitted by vishal maske on 17 August, 2015 - 22:24

घडणार्‍या गोष्टींत

हव्या असलेल्या गोष्टींसह
नको त्याही गोष्टी असतात
हव्या,नको त्या गोष्टींसाठी
पुन्हा-पुन्हा पुष्टी असतात

कुणी नटलेले असतात तर
कुणी मात्र तटलेले असतात
कित्येक घडणार्‍या गोष्टींमध्ये
दोन्ही नाट्य थाटलेले असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - मुलाच्या हट्टात

Submitted by vishal maske on 11 August, 2015 - 11:24

मुलाच्या हट्टात

स्री-पुरूषांतील विषमतेचा
अनुभव सदैव आला जातो
मुलगा नाही होत म्हणूनही
इथे स्रीचा छळ केला जातो

पारंपारिकतेचा टच घेऊन
अर्वाचिनतेवरती गदा आहे
मुलाचा हट्ट धरता-धरता
असंबध्द कुटूंब मर्यादा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - संशोधन/अभ्यास