महाभारताचे जीवन सार: (भाग २)

Submitted by निमिष_सोनार on 26 August, 2015 - 02:16

अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण:

आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.

खरं तर अश्वत्थामा अमर आहे हे माहिती असूनही केवळ युधिष्ठिराच्या सत्यवादीपणावर विश्वास ठेवून द्रोणांनी ते खरे मानले.

हे झाले अर्धसत्य!

तर यावरून मला असे लक्षात येते की आपल्याला हवे तसे आभासी चित्र इतरांसमोर निर्माण करण्यासाठी आणि स्वार्थासाठी बोललेले अर्धसत्य हे असत्यापेक्षाही निर्दयी आणि भयंकर नुकसानकारक असते...

पण सर्वांचे मोठे नुकसान टाळण्यासाठी आणि सैतानी शक्तींपासून रक्षण करण्यासाठी सांगितलेले अर्धसत्य हे प्रत्यक्ष सत्यापेक्षाही श्रेष्ठ असते.

तसेच कधीही काही कारणास्तव तुम्ही सत्य सांगू शकत नसाल तर संपूर्णपणे असत्य बोलण्यापेक्षा केव्हाही अर्धसत्य बोलणे श्रेयस्कर असते!!

वेळ आली की सत्य समोर येतेच येते. पण ती वेळ साधणे महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या वेळेला प्रकट झालेल्या सत्याचा त्या त्या वेळेनुसार व परिस्थितीनुसार वेगवेगळा परिणाम होत असतो.

(सुचना: महाभारत हे आजपर्यंत अनेक पुस्तके आणि सिरियल्स मधून माझ्यासमोर आले आहे. त्या आधारे मी हे लिहितो आहे. एकाच प्रसंगाबाबतचा दृष्टीकोन अनेक पुस्तकात आणि लोककथेत आणि सिरियल्स मध्ये वेगवेगळा आढळला आहे. तेव्हा मला जे प्रसंग वाचून, ऐकून किंवा मालिकेतून पाहून माहित झाले आहेत त्याच्या आधारे मी काही प्रसंग मांडत आहे. त्याबद्दल मतभेद असू शकतात.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतांशी असहमत.

मुळात जे काही महाभारत घडले असे लिहीले आहे नि त्यात जे म्हंटले आहे की पण <<<सर्वांचे मोठे नुकसान टाळण्यासाठी आणि सैतानी शक्तींपासून रक्षण करण्यासाठी सांगितलेले अर्धसत्य>>>
किंवा त्यासाठी कृष्णाने जे केले त्यामुळे सर्वांचे मोठे नुकसान तर टळले नाहीच, उलट सर्व जनता युद्धात मेली, त्यात पांडवांच्या बाजूचे, ज्यांना चांगले समजायचे, असे त्यांचे नातेवाईक इ. सर्व मेले. आणि कौरवांच्या बाजूने जे लढले ते भीष्म द्रोण तर आधी वंदनीयच होते ना?, तेहि मेले!
मग राज्य कुणावर केले, बायका पोरांवर? कुणि शत्रू नसताना?

तर कृष्णाने पांडवांचा जय व्हावा म्हणून जे काही केले ते सगळेच चांगले असे म्हणणे योग्य नाही. आपण कृष्णाला देव मानतो, त्याने बर्‍याच चांगल्या गोष्टी केल्या असे म्हणतो नि त्यातल्या आपल्या स्वार्थासाठी ज्या गोष्टी उपयोगी पडतील त्या, कृष्णाचे नाव सांगून, वाईट असल्या तरी, करायच्या असे झाले. (सगळ्यांनीच केले)

मुळात महाभारतामधून बोध घेण्यासारख काही आहे अस वाटतच नाही मला

सत्तेसाठी भांडण , कारस्थान , नात्यांमध्ये असणारा द्वेष

आणि कृष्णाने जे केल ते सगळच बरोबर होत अस अजिबातच नाही

जर कृष्णाने केलेलं सगळच बरोबर
तर मग वाईट कृत्यांना 'कृष्णकृत्य ' म्हणतात

हत्ती उगाच मेला, या सत्य अर्धसत्याच्या नादात >> त्याकाळी पेटा नावाची संस्था आणि मेनका गांधी सारखे नेते नव्हते

मुळात महाभारत खरच घडल होत का ?
प्रश्न बरोबर आहे.
पण महा कादंबरी असे जरी म्हंटले तरी त्याची पकड कोट्यवधी लोकांवर पडते म्हणून लोक चर्चा करतात. त्यातल्या लोकांना देव म्हणतात, धार्मिक ग्रंथ म्हणतात नि मग शिवाय स्वार्थी लोकांना त्यातले वाईट काय ते घेऊन, आपल्या धार्मिक ग्रंथात अस्सेच आहे असे खुश्शाल म्हणायची सोय आहे. तो एक उपयोग आहे.
भारतातच काय जगात सुद्धा भोळसट लोकांची नि स्वार्थी लोकांची काही कमी नाही!

प्रश्न बरोबर आहे.
पण महा कादंबरी असे जरी म्हंटले तरी त्याची पकड कोट्यवधी लोकांवर पडते म्हणून लोक चर्चा करतात. त्यातल्या लोकांना देव म्हणतात, धार्मिक ग्रंथ म्हणतात नि मग शिवाय स्वार्थी लोकांना त्यातले वाईट काय ते घेऊन, आपल्या धार्मिक ग्रंथात अस्सेच आहे असे खुश्शाल म्हणायची सोय आहे. तो एक उपयोग आहे.
भारतातच काय जगात सुद्धा भोळसट लोकांची नि स्वार्थी लोकांची काही कमी नाही! +१११११

मला नाही वाटत महाभारत घडल असेल
कारण मंत्रामुळे 'अपत्यप्राप्ती '
शापामुळे मूल न होणे ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टी अशक्यच आहेत

त्याकाळी पेटा नावाची संस्था आणि मेनका गांधी सारखे नेते नव्हते
>>>
नसेना का.
नेहमी कायद्याचा धाक हवाच का आपल्याला?
जनाची लाज बाळगण्यापेक्षा प्रत्येकाने मनाची लाज बाळगली तरी पुरेसे आहे.

मला नाही वाटत महाभारत घडल असेल
कारण मंत्रामुळे 'अपत्यप्राप्ती '
शापामुळे मूल न होणे ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टी अशक्यच आहेत
>>>

जे आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेर असते ते अशक्य वाटते.
एकेकाळी पृथ्वी गोल असू शकते आणि ती फिरतेय हे देखील कमालीचे अशक्यच वाटायचे लोकांना Happy

त्यासाठी असायला हवे. Wink
महाभारत मधील कृष्ण सोडल्यास बाकी कुणालाही "देवाचा" दर्जा प्राप्त नाही यावरून समजुन जावे.

हत्ती उगाचच मेला !

Proud

हत्तीच नव्हे तर लढलेले सैनिकही फुक्कट मेले. हस्तिनापुरचा वारस कोण हा त्या वारसांचा खाजगी प्रश्न होता.

म्हणुन्च मोघल श्रेष्ठ होते... याने त्याला सुरा खुपसून किंव त्याने याला तुरुंगात ढकलून विष्ञ संपवायच. बाकीच्याना त्रास नाही.