महाभारतात संपूर्ण जीवनाचे सार सामावले आहे. महाभारत कथा जीवनाच्या प्रत्येक विषय आणि अंगाला स्पर्श करते. मी एकेक करून ते आपल्यापुढे मांडत आहे, अर्थात जसे मला ते जाणवले किंवा समजले तसे! - निमिष सोनार - पुणे (sonar.nimish@gmail.com)
#महाभारताचे_जीवन_सार: (भाग १) सतत एखाद्या व्यक्तीचा पक्ष घेणे किंवा त्यांची बाजू (चूक असली तरी) आयुष्यभर घेत राहणे याचे दुष्परिणाम चांगलेच आपल्या लक्षात येतात. अधर्म दिसत असूनही भीष्माने आयुष्यभर कौरवांची बाजू घेतली किंबहुना त्याला घ्यावी लागली, भलेही मनातून त्याला पांडव चांगले वाटत होते. आपल्याच नातवांमध्ये सत्याने वागणारे पांडव दिसत असूनही धृतराष्ट्र आणि दुर्योधनाच्या दबावाखाली आणि त्यांनी घेतलेल्या काही शपथेपायी त्यांनी चुकीच्या व्यक्तींचा म्हणजे कौरवांचा पक्ष घेतला आणि पांडवांना त्याचे नुकसान सोसावे लागले. म्हणजे मनात वेगळे करायचे पण करावे लागते वेगळेच असे मानसिक द्वंद्व भीष्म सोसत राहिले. पण शेवटी देव (कृष्ण) सत्याचा वाली असतो.
मग देवाने पांडवांची बाजू घेतली आणि विजय सत्याचा झाला आणि होतोच. कुणाच्या बाजू घेण्याने अथवा न घेण्याने सत्य बदलत नाही. आजच्या जीवनात सुद्धा आपल्याला तेच दिसते. नि:पक्षपातीपणा आजकाल क्वचितच आढळतो. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात कुणीतरी प्रभावशाली माणूस नियम लावताना "बाजू" कुणाची आहे हे पाहून निर्णय देत असतो. म्हणजे बाजू पाहून नियम वाकवले जातात. नियमांचा उपयोग स्वत:च्या फायद्यानुसार वाकवून केला जातो. नावडतीचे मीठ अळणी असा काहीसा हा प्रकार आहे. राजकारणात याहून वेगळे चित्र नाही. सत्ताधारी कोणत्याही राजकीय पक्षाचे असो, पण सत्ताधारी चांगले निर्णय घेत असले तरी फक्त विरोधाला म्हणून विरोधी पक्षाकडून नावाला शब्दशः: जागून विरोध केलाच जातो आणि चांगल्या गोष्टी अमलात आणल्या जात नाहीत आणि सत्याचा विजय व्हावा अशी वाट बघणारा सामान्य माणूस त्याची आशा गमावून बसतो. "विरोधी पक्ष" असे नाव बदलले आणि "देखरेख पक्ष" असे नाव ठेवले तर? मानसिकतेत बदल होईल का?
महाभारताचे जीवन सार: (भाग १)
Submitted by निमिष_सोनार on 24 August, 2015 - 02:38
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसल जीवनाच सार सत्ता आणि
कसल जीवनाच सार
सत्ता आणि पैशासाठी नाती विसरून एकमेकांचे जीव घ्या , मग समोर तुमचा आजोबा असो किंवा गुरु
मला पांडव प्रकर्षाने धर्मराज युधिष्ठिराचा तर भयंकर राग येतो …
स्वतःच्या बायकोला पणाला लावले आणि हा म्हणे धर्मराज
आणि बायको म्हणजे काय खेळण वाटल काय ५ जणात वाटून घ्यायला
मनरंग +१
मनरंग +१
१ल्याच प्रतिसादात 'मनरंग' ने
१ल्याच प्रतिसादात 'मनरंग' ने हवाच काढून टाकली जीवनसारातली.
२०-२० मध्ये पहिल्या बॉलपासून ठोकायला सुरुवात करतात तस वाटलं.
पहिल्या चेंडूला सिक्सर मारला
पहिल्या चेंडूला सिक्सर मारला तरी पुढल्या चेंडूला आउट पण होऊ शकतो नाही का?
सहज गम्मत केली बर का!)
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
निमिष, मी हल्ली बघतो.. इथे
निमिष,
मी हल्ली बघतो.. इथे सगळेच तलवारी घेऊन फिरत असतात. मिळाला चान्स की हाण..
'मी किती उत्तम भांडू शकतो' हे दाखवण्याची चढाओढ लागल्यासारखं वाटतं.
बाकी मी आपलं सहज गमतीने माझं मत नोंदवलं इथे. आम्ही भांडण्यात अगदीच कुचकामी आहोत.
सगळे भाग वाचल्या नंतर सार
सगळे भाग वाचल्या नंतर सार लक्षात येईल.
पण कुठल्याही कारणा साठी हिंसा न्यायसंगत वाटत नाही तेही भावा भावात.
भीष्माने प्रतिज्ञा राज्याचे
भीष्माने प्रतिज्ञा राज्याचे रक्षण करण्याबद्दल घेतली होत, हस्तिनापूर च्या गादीशी एकनिष्ठ रहाण्याची घेतली होती.
पण तो स्वतः अत्यंत कर्तबगार, शूरवीर होता. अश्या वेळी जर चक्क दिसत आहे की जे घडते आहे ते राज्याच्या दृष्टीने बरे नाही, तर "मी प्रतिज्ञा शब्दशः पाळीन", बाकी जगाचे काहिहि होवो, ते चालेल. पण मी प्रतिज्ञेचा शब्द मोडला तर माझी अपकिर्ती होईल याबद्दल त्याला जास्त काळजी होती!
समजा त्याने राज्य बळकावले असते नि शौर्याच्या जोरावर धृतराष्ट्र नि दुर्योधन नि शकुनि यांना वठणीवर आणले असते नि त्याला योग्य वाटेल त्यालाच राजा बनवले असते तर हस्तिनापूर च्या गादीची जास्त चांगली सेवा झाली असती. मग स्वतःची प्रतिज्ञा मोडली तरी आपले चांगलेच नाव होईल याची काळजी प्रचार करून घेता आली असती.
ज्या कठोरतेने त्याने मनाविरुद्ध दुर्योधनाच्या कारवायांना विरोध केला नाही, तीच कठोरता स्वतःच्या प्रतिज्ञेचा, वैयक्तिक प्रतिष्ठेचा विचार न करता राज्याच्या भल्याचा विचार केला असता तर?
आजकाल जगातले लोक पैशाच्या मागे, सत्तेच्या मागे लागून स्वार्थी पणे वागतात, काही काही तर केवळ स्वतःच्या प्रतिष्ठेच्या खर्या खोट्या कल्पना बाळगून देशाचे, आजूबाजूच्या लोकांचे वाईट करतात,याचे आपल्याला वाईट वाटते.
पण हा प्रश्न आजकालचा नसून जगाच्या सुरुवाती पसूनच आहे असे दिसते.
कुठे तरी मर्यादा काय याचा विचार होईल का?
आणि बायको म्हणजे काय खेळण
आणि बायको म्हणजे काय खेळण वाटल काय ५ जणात वाटून घ्यायला
>>
असा का विचार करता?
पुराणकाळात कित्येक राजांना एकापेक्षा जास्त बायका असायच्या, तेव्हा पुरुष म्हणजे खेळणे म्हणणार का?
शेवटी सारे आपल्या बघण्याच्या द्रुष्टीकोणावर अवलंबून असते.
हे म्हणजे आपणच आधीच ठरवायचे की स्त्री म्हणजे दुर्बल घटक - मग एका पुरुषाने पाच बायका केल्या तरी तो बायकांवर अन्याय किंवा एका बाईचे पाच नवरे असले तरी तो बाईवरच अन्याय.
अर्थात, इथे द्रौपदीच्या मनाविरुद्ध हे झाले असा युक्तीवाद करता येऊ शकतो. पण जर महाभारतात हे द्रौपदीच्या राजीखुशीने झाले असे दाखवले असते तरीही द्रौपदीचेच चारीत्र्यच डागाळले असते. पण तेच एकापेक्षा अनेक राण्या असणार्या राजांचे चारीत्र्य कधीच डागाळत नाही.
लहानपणी मी जेव्हा महाभारत पहिल्यांदा ऐकले, वाचले वा बघितले होते. जेव्हा पहिल्यांदा मला हा द्रौपदीचा पाच नवर्यांचा किस्सा समजला होता तेव्हा तो मला महाभारतातील ईतर कुठल्याही किस्स्यासारखाच तो रंजक वाटला होता. कारण तेव्हा माझे वय नादान आणि मन निरागस होते. पुढे अक्कल येऊल लागली, अन स्त्रीपुरुष संबंधांबद्दल खोलात समजू लागले तेव्हा डोके चुकीच्या ट्रॅकवर धावू लागले. थोडक्यात काय तर आपले मन साफ तर जगातील सारी नाती साफ.
रामायण महाभारताचे सार एकच
रामायण महाभारताचे सार एकच आहे.
१. एक पक्ष्याचे जोडपे संभोग करत होते. एका पारध्याने बाण मारला. त्याला शाप मिळाला.
२. एक हरणाचे जोडपे संभोग करत होते. पांडूने बाण मारला. त्याला शाप मिळाला.
तात्पर्य : दुसर्याच्या संभोगात अडथळे आणू नयेत.
.
.
कोल्हया साराची पूर्ण आंब-टी
कोल्हया
साराची पूर्ण आंब-टी करून टाकली राव तुम्ही :-).
कृपया "एपिक" चॅनल वर
कृपया "एपिक" चॅनल वर "धर्मक्षेत्र" नामक कार्यक्रम बघावा त्यात बर्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे. जे प्रश्न जनसामान्यांच्या मनात शतकानुशतके उभे राहत आहे त्यांची उत्तरे महाभारतातूनच देण्याचा स्तुत्य प्रयत्न त्या मालिकेच्या लेखकांनी केला आहे. बरीच उत्तरे मनाला पटतात.
हो.
हो.