!!रम्य ते बालपण!!
'रम्य ते बालपण' बर्याच जणांकडून ऐकल आहे आणि खुपदा वाचलं आहे...
सणासुदीला घरी आलो कि विचारचक्र भिरभिरत अन् मनाचं कालचक्र उलट फिरायला लागतं, नकळत तुलना चालू होते, लहानपणीची लगबग, उत्साह, हुरूप आठवतो सण- समारंभातला.
मग तो सण गौरी-गणपतीचा असो वा पोळा, नागपंचमी, दिवाळी, संक्रांतीचा.
त्यावेळी दुर्वा-आघाडा निवडताना, तोरणं-माळा बनवताना केलीली कुचराई आठवते अन हसु येतं.
देवाची आरती चालू असताना हमखास येणारा कंटाळा, पोटातल्या भुकेवर मनातल्या बाल-श्रध्देने मात करताना उडालेली तारांबळ;
त्यावेळी सकाळी लवकर उठून आईला केलेली 'मदत' (खरंतर उठलो तीच फार मोठी मदत व्हायची);
टि.व्ही., कॉम्प्युटरच्या या जगात
बाहेर खेळण्याची गरज आम्हाला भासत नाही
जरासा वेगळा शब्द सुद्धा
word-web शिवाय कळत नाही
भुक भागवायला सुद्धा आम्हाला
मोबाईलची गरज भासते
आई पुर्वी स्वतःच ओरडायची
हल्ली ती सुद्धा recording ऐकवते
बातमी पेपर मध्ये आली की
सहा महिन्यात तिच्यावर पिक्चर येतो
विषय कितीही गंभिर असला तरी
आम्हाला तो funny वाटतो
लहान लहान मुलंसुध्दा
आजकाल philosopher बनले
याचं मुख्य कारण
मुलांमधलं मुलपण हरवले
पकडा-पकडी, लपा-छपी
हे खेळ आता फक्त गोष्टीतच असतात
क्योंकी video games का जमाना है भाई
हे असले खेळ जाम old fashioned असतात
तरी आता आमच्यातले
मार्च महिना लागला कि सगळ्यांना वेध लागायचे ते सुट्ट्या कधी सुरू होतात त्याचे. सगळी भावंडे मग एकत्र जमायचो. बाहेरगावी असलेली चुलत भावंडे देखील यायची. रोज दुपारी वेगवेगळे खेळ रंगायचे. जोडीला आम्हा सगळ्याची स्थानिक मित्र-मंडळी देखील असायचीच. मोठी भावंडे क्रिकेट खेळायची तर छोट्यांना बैठे खेळ आवडायचे.
मी एकत्र कुटुंबपद्धती असलेल्या घरात वाढले. सख्खी-चुलत मिळून आम्ही पाच भावंडे (दोन मुली, तीन मुले) एकत्र राहत होतो. प्रत्येकाचा स्वभाव निराळा. त्यातून भांडणे, वाद आणि खोड्या या उद्भवणारच! लहान भावंडांना आजीकडून full protection मिळायचे. त्यांनी कितीही खोड्या केल्या तरी आजी पाठीशी घालणार हे गृहीतच धरलेले असायचे. मग अश्या वेळेस निरनिराळे मार्ग शोधले जायचे कि जेणे करून आजीचा ओरडा हि खावा लागू नये आणि खोड्या काढणाऱ्या भावंडाला अद्दल देखील घडली पाहिजे.
दि. १० ऑक्टो. २०११- Rough Draft.