नवी मुंबईतील झाडांचे प्रदर्शन
नवी मुंबई महानगर पालीकेने दिनांक १९ ते २१ फेब्रुवारी २०१६ पर्यंत नवी मुंबईतील सिबीडी, वंडर्स पार्क येथे फळ, फुल, भाज्यांचे प्रदर्शन होते. प्रदर्शन अतिशय सुंदर होते. नुसती झाडे नाहीत तर पुरातन वस्तू, शेती लागवड वगैरेचे नमुनेही प्रदर्शनात लावलेले जे लहान पिढीला माहीती करून देण्यासाठी उपयुक्त होते. प्रदर्शनातील दुकानांमध्ये बी-बियाणे, खते, जंतुनाषके, उपकरणे, कुंड्या, रोपे, खत बनवायचे कल्चर सकट बास्केट अशा अनेक उपयोगी वस्तू होत्या. विविध झाडे, त्यांचे प्रकार तर एकाहून एक सरस होते.