घाव सोसूनच एखादी कलाकृती जन्माला येते, घाव बसत असताना, चटके खात असतानाच ती सुबक होत असते. घडवणाराही योग्य असला की कलाकृती कशी सुबक सुंदर बनते व कलाकृती तयार झाली की ती जनमानसांत डोळ्यांत भरते, सुंदर दिसू लागते असेच काहीसे घडले गेलेले श्री वसंत लडग्या गावंड ह्या उरण - कुंभारवाडा येथील चित्रशिल्पकारा विषयी माहिती करून घेऊया.
गाढ झोपेत असलेल्या त्याच्या चेहऱ्यावर मानवी भावनांची जणू जत्राच भरली होती. मध्येच त्यावर एखादी स्मित लकेर उमटून जाई, मधेच त्याचा चेहरा पूर्ण जगाचे दुःख पचवल्यासारखा करुण होऊन पिचून निघे. स्वप्न बघत होता हो तो. हास्याचा भाग म्हणजे त्याचे पितृतुल्य गुरुजी, घरून पळून आलेल्या बासरीवेड्या पोराला त्यांनी दिलेला थारा. त्याच्या चेहऱ्यावर अगोदर आलेलं स्मित त्याला आठवण देत होतं, पहिल्या दिवशी गुरुजींनी जेव्हा त्याला पोकळ वेळूच्या भोके पाडलेल्या काठीत भावना रित्या करणे शिकवणे सुरू केले होते तेव्हा तो जागेपणी असाच स्मित करत होता.
देवेन वर्मा यांच्या निधनाने अभिनयाच्या वेलीवरचे एक टपोरे द्राक्ष (अंगूर) गळून पडले.
कधीही स्टारडमचे वलय नसलेल्या आणि अतिशय निवडून अभिजात विनोदी भुमिका केलेल्या देवेन यांना सलाम.
लोकमत मधे त्यांच्यावर आलेल्या लेखातला खालील परिच्छेद वाचला आणि या कलाकाराबद्दल आधीच मनात असलेला आदर आणखीनच दुणावला.
माणसाचे आयुष्य अमर नाही हे अमान्य कुणीच करणार नाही. मृत्यू अटळ असतोच. तो कधी कुणाला गाठेल याचे निश्चित असे कुठले सूत्र नसते आणि आजारी पडलेल्या माणसाला देवदूत बनून आलेले डॉक्टर वाचविण्यात यशस्वी तर होतात पण तेच डॉक्टर त्या माणसाचा ज्यावेळी देवाघरी जायचा समय येतो त्यावेळी त्याला रोखू शकत नाही. हे झाले नैसर्गिकरित्या मरणक्रियेबाबत; पण असेही काही दुर्दैवी वा हताश जीव असतात या जगात जे स्वतः नैराश्येपोटी आपली जीवनयात्रा संपवितात. त्याचे कारण मग शोधले जाते.
माझे mother & child सीरीज मधले पहिले पेंटिंग आहे.
हे चित्र एका वीरपत्नीचे आहे. मागे वापरलेला लाल रंग तिच्या पतीचे बलिदान सुचित करतो. ती आई दु:खी आहे पण अजुनही संकटाशी सामना करन्याची तिची तयारी आहे. हेच मला या चित्रातून सांगायचे
आहे. हे पेंटिंग Canvas वर acrylic color ने केले आहे.
२४ इंच बाय १८ इंचाचे हे पेंटिंग आहे.
# १ #
येह जमीन ही आसमान, येह जमीन ही आसमान, हमारा कल हमारा आज, बुलंद भारत कि बुलंद तस्वीर, हमारा बजाज..