देवेन वर्मा यांच्या निधनाने अभिनयाच्या वेलीवरचे एक टपोरे द्राक्ष (अंगूर) गळून पडले.
कधीही स्टारडमचे वलय नसलेल्या आणि अतिशय निवडून अभिजात विनोदी भुमिका केलेल्या देवेन यांना सलाम.
लोकमत मधे त्यांच्यावर आलेल्या लेखातला खालील परिच्छेद वाचला आणि या कलाकाराबद्दल आधीच मनात असलेला आदर आणखीनच दुणावला.
चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच देवेननं अगोदरच मनात पक्कं केलं होतं, की विनोदासाठी कधीही अचकट विचकट चाळे करायचे नाहीत. लुळा, पांगळा, आंधळा, बहिरा अशा व्यंगांवर कधीही विनोद करायचे नाहीत. व्यंगांची चेष्टा करायची नाही. अशा अभागी व्यक्तींच्या व्यंगांची क्रूर चेष्टा करून आपण पैसे कमवायचे नाहीत. याशिवाय साडी नेसून तृतीयपंथी विनोद तर बापजन्मात करावयाचा नाही, अशी तर त्यांनी भीष्मप्रतिज्ञाच केली होती.
देवेन यांच्या भुमिका आणि त्यांच्याबद्दल माहिती असलेल्या गोष्टी येथे लिहून त्यांना श्रद्धांजली वाहू.
लोकमत मधे आलेल्या लेखाची
लोकमत मधे आलेल्या लेखाची लिन्क,
http://www.lokmat.com/storypage.php?catid=29&newsid=1125
दर्जेदार विनोदी अभिनेता. खरंच
दर्जेदार विनोदी अभिनेता. खरंच त्याने हे व्रत कायम पाळले. गंभीर भुमिकाही चांगल्या केल्या असत्या पण तशा भुमिकेत बघितल्याचे आठवत नाही.
मला वाटलं तु माझा विषय पळवलास
मला वाटलं तु माझा विषय पळवलास की काय लेखाचा, पण लांबी पाहून हायसं वाटलं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त माणूस. मस्त अभिनेता. आवडायचे ते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@कोकम : येथेच लांबलचक
@कोकम : येथेच लांबलचक प्रतिसाद लिही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यांच्या "अंदाज अपना अपना" मधल्या भुमिकेचा उल्लेख फारसा कुठे आलेला दिसला नाही बातम्यांमधे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाबूलाल मेरे वफादार
महेश, धन्यवाद. पण मोठा
महेश, धन्यवाद. पण मोठा प्रतिसाद लिहायला वेळ नाही रे.
त्यांच्या निधनानंतर बघितलेल्या आणि वाचलेल्या बातम्यां त्यांच्या दोन भूमिकांविषयी कुठेच उल्लेख नसल्याचं पाहून अंमळ आश्चर्य वाटलं. एक काही मिनिटांची गंभीर भूमिका आणि एक पूर्ण लांबीची विनोदी भूमिका.
(१) मेरे अपने मधला निरंजन. मीनाकुमारीच्या नवर्याची भूमिका. अगदी इवलीशी भूमिका आहे पण इतर नटांबरोबरच तीही लक्षात राहते.
(२) चोरी मेरा काम मधला प्रवीण चंद्र शहा. त्यात त्याची एका शेटजीची भूमिका होती. त्याला नाद असा होता की कुठलीही रक्कम तो राउंड फिगर मधे घेत / देत नसे. एक लाख देतो म्हटलं तर म्हणायचा नहीं, निन्न्यान्वे हजार नौ सो निन्न्यान्वे ही लूंगा" असे काहीसे संवाद असायचे. नुसतं आठवलं की अजून हसू येतं.
विनोदी भुमिकांबरोबरच त्यांनी
विनोदी भुमिकांबरोबरच त्यांनी देवर मध्ये निगेटीव भुमिकाही साकारली होती....
हो देवर मधली गंभीर भूमिकाही
हो देवर मधली गंभीर भूमिकाही संस्मरणीय आहे.
<< याशिवाय साडी नेसून
<< याशिवाय साडी नेसून तृतीयपंथी विनोद तर बापजन्मात करावयाचा नाही, अशी तर त्यांनी भीष्मप्रतिज्ञाच केली होती. >>
तर मग खेदाने म्हणावे लागेल की ही स्वतः केलेली स्वतःची प्रतिज्ञा त्यांनी पाळली नाही. १९७८ सालच्या बेशरम या चित्रपटात त्यांनी लक्ष्मण, त्याचे वडील आणि त्याची आई अशी तिहेरी भुमिका केली होती. बरं असं करायला त्यांचा काही नाईलाज वगैरे नव्हता कारण १९७८ साली त्यांची कारकीर्द अगदी ऐन बहरात होती. १९७७ व १९७८ या दोन वर्षांमध्ये मिळून त्यांनी एकूण १४ चित्रपट केले आणि या बेशरम चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक ते स्वतःच होते. चित्रपट अतिशय वाह्यात होता. नायक अमिताभ बच्चन चे वडील ए.के. हंगल याचे कपडे उतरवले जातात असे एक वाईट दृश्य त्यात होते. नायकाच्या आंधळ्या बहिणीवरील बलात्कार व खुनाचे दृश्यदेखील असेच अंगावर येणारे. तसेच पुढे खलनायकाच्या अड्ड्यावर अमिताभ बच्चन वेगळे नाव व व्यक्तिमत्व घेऊन पोचतो तेव्हा खलनायक अमजद खान नायकाला ओळखतो आणि तो त्याला मुद्दामच नायकाच्या खर्या आईसोबत गैरवर्तन करण्याची आज्ञा देतो हे अजून एक ओशाळवाणे दृश्य. नायक तसे करत नाही आणि स्वतःचे खरे स्वरुप मान्य करतो तेव्हा नायक व त्याच्या आईला खलनायक वाघाच्या पिंजर्यात सोडायचे ठरवतो. तेव्हा "मा अपने बेटेके मौत का नजारा देखेगी, या बेटा अपनी मांको मरते हुए देखना चाहेगा?" असा एक तद्दन भंपक संवाद देखील आहे. एकूणच चित्रपट अतिशय वाईट होता. १९७८ मध्ये एक वेळ अशी आली की संपूर्ण मुंबईत सर्व चित्रपटगृहांत मिळून मुख्य खेळाला फक्त अमिताभ बच्चन यांचेच चित्रपट चालू होते. ७ चित्रपट हिट होते आणि ८ वा फ्लॉप होता तो हा बेशरम. विनोदी अभिनेता म्हणून नावाजलेल्या वर्मांनी इतका हिंसा व गलिच्छपणाने ओतप्रोत भरलेला चित्रपट का निर्मिला व दिग्दर्शिला? यात विनोदी काहीच नव्हते. स्वतः वर्मांनी सादर केलेली तिहेरी भूमिका हे एक समांतर उपकथानक होते व त्याचा मूळ कथानकाशी संबंध नव्हता. त्यातही साडी घालून देवेन वर्मांनी गेंगाण्या आवाजात म्हंटलेले बायकी संवाद सोडून इतर काहीच विनोदी (?) नव्हते.
असो.
देवेन वर्मांच्या कारकीर्दीचा विचार करता खालील चित्रपट नक्कीच विचारात घ्यावे लागतात.
एकूणच वर्मा हे दिग्दर्शकाचे अभिनेते होते असे म्हणता येईल. गुलजार व हृषिकेष मुखर्जींच्या दिग्दर्शनात त्यांनी अप्रतिम अभिनय केला.
टीव्हीवर माझ्या मित्राच्या
टीव्हीवर
माझ्या मित्राच्या 'चंदन की चिता' या कथेत त्यानी पूर्ण तासभर मृतव्यक्तीचा 'अभिनय' केला होता....
( गुब्बारे.. दि. मुकूल अभ्यंकर.. )
एक मराठी चित्रपट रमेश देव
एक मराठी चित्रपट रमेश देव यांच्या बरोबरचा 'दोस्त असावा तर असा' पाहीला होता. अंगुर मस्त होता आणि कधीही पाहण्यासारखा आहे यात शंकाच नाही. धमाल काम केले आहे देवेन वर्मा आणि संजीव कुमार दोघांनीही.
येस, दोस्त असावा तर असा हा
येस, दोस्त असावा तर असा हा चित्रपट ज्यात रमेश देव, श्रीकांत मोघे आणि धाकटा भाऊ (ज्याने खट्टामिठा मधे पण काम केले आहे) आणि देवेन असे लोक होते. यामधे देवेनचा एक डायलॉग सारखा येतो "घ्या करा हिशोब"![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हिंदी चित्रपट "दोस्त हो तो ऐसा" (शत्रुघ्न सिन्हा) चा हा रिमेक होता.
देवेन वर्मा यांची साफसुधरी
देवेन वर्मा यांची साफसुधरी आणि फारूख शेख यांची अदबशीर कॉमेडी नेहमीच आवडली,
पण वर चेतन गुगाळे यांनी म्हटल्यानुसार बेशरम सारखा तद्दन फालतू चित्रपट देवेन वर्मांचाच होता हे मला माहीत नव्हते, त्यांनी मांडलेल्या भावनेशी सहमत.
पण काही का असेना, अंगूरमध्ये संजीव कुमार आणि देवेन वर्मा हि भट्टी त्या चित्रपटाचा पोत पाहता छानच जमून आली होती.
अंगूरवरून आठवले, मध्यंतरी शाहरूखला घेऊन या चित्रपटाचा कोणीतरी रीमेक करणार होते असे कानावर होते, त्यानंतर शाहरूखच्या जागी आणखी कोणीतरी त्यात काम करणार असे ऐकलेले, याबद्दल कोणाला काही माहीत आहे का?
नाही अंगूर रिमेक बद्दल ऐकिवात
नाही अंगूर रिमेक बद्दल ऐकिवात नाही.
मला आवडलेला एक चित्रपट "झूठी", यामधे देवेनची एक साधीच भुमिका आहे.
पण त्यातही त्यांनी छान काम केले होते.
अन्य कलाकार : राज बब्बर, रेखा, अमोल पालेकर, सुप्रिया पाठक
त्यातल्या एका गीताची लिन्क,
https://www.youtube.com/watch?v=e2P7RIdd9Yc
गूगाळून हे मिळाले.. SRK, Bebo
गूगाळून हे मिळाले..
SRK, Bebo in Angoor remake
http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/SR...
Shahrukh Khan Chose CHENNAI EXPRESS Over ANGOOR Remake
http://www.boxofficecapsule.com/news/Shahrukh-Khan-Chose-CHENNAI-EXPRESS...
अंगूरचा रिमेक आणि त्यात
अंगूरचा रिमेक आणि त्यात शाहरूख खान??
प्लीज! डॉनचा सत्यनाश केला तेवढा पुरे झाला!
सत्यवचन स्पार्टाकस !
When Vaijayantimala was asked
When Vaijayantimala was asked about both Devdas movies, her answer meant a lot.
She said, "Dilip Saab played Devdas, and Shahrukh Khan played Shahrukh Khan".
Khallas
अंगूरचा रिमेक आणि त्यात
अंगूरचा रिमेक आणि त्यात शाहरूख खान??
प्लीज! डॉनचा सत्यनाश केला तेवढा पुरे झाला!
>>>>>>
डॉनचा त्याने खरेच सत्यानाश केला, पण बहुतेक ते त्याने स्वताच्या आनंदासाठी तो चित्रपट केला असावा.. फरहान अख्तरलाही डॉन-२ बनवण्यासाठी मानायला हवे.. तो मी पाहिलाही नाही.. बाकी डॉन-१ मधील गाणी सही होती.. आज की रातमध्ये शाहरूख वाटलाही सही.. वगैरे वगैरे..
पण अंगूरचा रिमेक शाहरूखला घेऊन झाला तर धमाल होऊ शकते..
त्याचे बादशाह आणि डुप्लिकेट चित्रपटातील विनोदी भुमिका मला आवडलेल्या..
पण अंगूरचा रिमेक शाहरूखला
पण अंगूरचा रिमेक शाहरूखला घेऊन झाला तर धमाल होऊ शकते.. >>>>> भिंत प्लीज!
चेतन... दुर्दैवी चित्रपट
चेतन... दुर्दैवी चित्रपट म्हणावा लागेल तो !
_____
मध्यंतरी धर्मेंद्र आणि आफताब शिवदासानी चा असा एक चित्रपट आला होता ना ? प्रोमो वरून अंगूरचेच कथानक वाटत होते.
अवांतर. चलती का नाम गाडी चा रिमेक येतोय म्हणे. त्यात शाहरुख आणि ऐश्वर्या असणार आहे. धाकट्या भावची ( अनुप कुमार ) ची भूमिका, अभिषेक करणार का ? आणि मोठ्या भावाची ? शाहरुखपेक्षा वयाने मोठा अभिनेता कुठला आहे ???![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवांतर. चलती का नाम गाडी चा
अवांतर. चलती का नाम गाडी चा रिमेक येतोय म्हणे. त्यात शाहरुख आणि ऐश्वर्या असणार आहे. धाकट्या भावची ( अनुप कुमार ) ची भूमिका, अभिषेक करणार का ? आणि मोठ्या भावाची ? शाहरुखपेक्षा वयाने मोठा अभिनेता कुठला आहे ??? >>>>
हे राम!
मधुबालाच्या जागी ऐश्वर्या?
मग शाहरुख खान कोण किशोरकुमार?
त्याला एकच रोल शोभेल त्या पिक्चरमधला - के. एन. सिंग!
शाहरुखपेक्षा वयाने मोठा
शाहरुखपेक्षा वयाने मोठा अभिनेता कुठला आहे ???
>>>>>
वन एण्ड ओनली अमिताभ बच्चन.. दोघे मोहोब्बते सारखे एकत्र आले तर धमाल उडवतील पुन्यांदा!!!
आणि यातही दोघांना त्यांचे त्यांचे रोल सूट होतील..
शाहरुखपेक्षा वयाने मोठा
शाहरुखपेक्षा वयाने मोठा अभिनेता कुठला आहे ???<<< आमिर खान!!!
लहान भावाचा रोल सलमानला द्या. समद्यांचे फॅन्स खुश होतील.
शाहरुखपेक्षा वयाने मोठा
शाहरुखपेक्षा वयाने मोठा अभिनेता कुठला आहे ???
>>>>>
वन एण्ड ओनली अमिताभ बच्चन.. दोघे मोहोब्बते सारखे एकत्र आले तर धमाल उडवतील पुन्यांदा!!!
आणि यातही दोघांना त्यांचे त्यांचे रोल सूट होतील..>>>>> ऋन्मेष, आर यु शुअर्?:अओ: शाहरुख ६० च्या आसपास आहे?:अओ: आता तूच शाहरुखला इतका म्हातारा समजत असशील तर धन्य आहे तुझी. अमिताभ सत्तरी च्या आसपास आहे. देवा! उठा ले रे बाबा.
खरे वय आणि भुमिका
खरे वय आणि भुमिका साकारण्याच्या वयातील फरक लक्षात घ्या.
शाहरूख किशोर कुमारच्या भुमिकेत फिट बसल्यावर अमिताभ अशोककुमारची जागा भरून काढू शकतो.
शाहरूखची हिरोईन ऐश्वर्या तर अमिताभची जया
तसेच छोटा भाऊ म्हणून अभिषेक..
एक शाहरूख आणि बच्चन फॅमिली .. धमाल येईल!
आमिर खान >> हा गडी शाहरूखचे नाव ऐकून कच खातो हा ईतिहास आहे!
मध्यंतरी एक फॅशन आली होती
मध्यंतरी एक फॅशन आली होती माधुरी दीक्षितची मधुबालासोबत तुलना करायची.
शिरीष कणेकरांनी वैतागुन एका लेखात लिहीलं की अशा लोकांनी एक तर मधुबालाला पाहिली नसावी किंवा माधुरी दीक्षितला पाहिली नसावी किंवा मग कदाचित दोघींनाही पाहिली नसावी.
इथे चलती का नाम गाडीच्या रिमेकचा विषय येतोय. रिमेक बनला नसल्यामुळे कुणीच पाहिलेला नाहीये परंतु इथे प्रतिसाद देणार्यांनी मूळचा चलती का नाम गाडी देखी़ल पाहिलेला नाहीये का?
किशोर कुमारच सर्वात लहान बंधु होते (जन्म १९२९). अनुप कुमार (जन्म १९२६) हे देखील अशोक कुमार (जन्म १९११) यांच्याप्रमाणे त्यांच्यापेक्षा मोठे बंधु होते. चलती का नाम गाडी चित्रपटात देखील हे याच क्रमाने दाखविले होते. तेव्हा नव्या चित्रपटात जर शाहरूख खान किशोर कुमारचे पात्र साकारणार असतील तर उरलेले दोन्ही कलाकार त्यांच्यापेक्षा वयाने मोठेच दाखवावे लागतील. एक लहान आणि एक मोठा भाऊ कोण दाखवावा अशी चर्चा का केली जात आहे?
<< आमिर खान >> हा गडी शाहरूखचे नाव ऐकून कच खातो हा ईतिहास आहे! >>
ऋन्मेऽऽष यांच्या गड्याचे नाव वाचून एक मायबोलीकर म्हणून अभिमान वाटला.
चलती का नाम गाडी चित्रपटात
चलती का नाम गाडी चित्रपटात देखील हे याच क्रमाने दाखविले होते.
>>>
ओह्ह ओके असेल, हे ध्यानात आले नव्हते..
साधारण अशोक कुमार युधिष्टिर, किशोर कुमार अर्जुन आणि अनुप कुमार तुलनेत कमी प्रसिद्ध हा नकुल-सहदेव असेच वाटते पटकन..
:कपालबडवतीमोड़ ऑन: बाफ देवेन
:कपालबडवतीमोड़ ऑन: बाफ देवेन वर्माविषयी आणि चर्चा शाखाची ! चांगलय :कपालबडवती मोड़ ऑफ़:
अरे मी अवांतर म्हणूनच लिहिलेय
अरे मी अवांतर म्हणूनच लिहिलेय ना. बाकी भावांच्या वयाचा माझाही घोळ झाला म्हणायचा !
जाई.
जाई.:हहगलो:
Pages