अंगूरी विनोद-बहाद्दूर - देवेन वर्मा

Submitted by महेश on 10 December, 2014 - 04:20

Deven_Verma.jpg

देवेन वर्मा यांच्या निधनाने अभिनयाच्या वेलीवरचे एक टपोरे द्राक्ष (अंगूर) गळून पडले.

कधीही स्टारडमचे वलय नसलेल्या आणि अतिशय निवडून अभिजात विनोदी भुमिका केलेल्या देवेन यांना सलाम.

लोकमत मधे त्यांच्यावर आलेल्या लेखातला खालील परिच्छेद वाचला आणि या कलाकाराबद्दल आधीच मनात असलेला आदर आणखीनच दुणावला.

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच देवेननं अगोदरच मनात पक्कं केलं होतं, की विनोदासाठी कधीही अचकट विचकट चाळे करायचे नाहीत. लुळा, पांगळा, आंधळा, बहिरा अशा व्यंगांवर कधीही विनोद करायचे नाहीत. व्यंगांची चेष्टा करायची नाही. अशा अभागी व्यक्तींच्या व्यंगांची क्रूर चेष्टा करून आपण पैसे कमवायचे नाहीत. याशिवाय साडी नेसून तृतीयपंथी विनोद तर बापजन्मात करावयाचा नाही, अशी तर त्यांनी भीष्मप्रतिज्ञाच केली होती.

देवेन यांच्या भुमिका आणि त्यांच्याबद्दल माहिती असलेल्या गोष्टी येथे लिहून त्यांना श्रद्धांजली वाहू.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष यास शाखाप्रेमी हा मायबोलीचा सर्वोच्च पुर्स्कार देण्यात येत आहे.:फिदी: खुद्द देवेन वर्मा सुद्धा स्वर्गातुन गालातल्या गालात हसले असतील ऋन्मेषचे कोणताही धागा शाहरुख वळवण्याचे कसब बघुन.

धाग्यात खास अंगूरचा उल्लेख आणि शिर्षकातही ते तसे असल्याने झाले.
आता शाहरूख खान अंगूरचा रिमेक करणार आहे हा माझा दोष का?
मी सर्वप्रथम मुंबई ईंडियन्स आहे आणि मगच कोलकता नाईट रायडर्स..

She said, "Dilip Saab played Devdas, and Shahrukh Khan played Shahrukh Khan". >> देवदास तिनदा मेला असा एक कॉमेंट कोणा तरी हिंदी सिनेमातल्या जुन्या फटकळ दिग्दर्शकाने केलेला आठवतो. "पहिल्यांदा जेंव्हा शरदचंद्रांचे निधन झाले तेंव्हा, दुसर्‍यांदा जेंव्हा दिलीपकुमारने केला तेंव्हा नि तिसर्‍यांदा शाहरुख खान ने केला तेंव्हा" कोणी केलेला ते आठवतो का ?

अरे बाबानो पहिला देवदास के एल सहगल ने केला होता ना. लोकान्च्या डोळ्यासमोर दिलीप कुमार का यावा?:अओ:

असामी कोण दिग्दर्शक होता तो?

अभय देओल कमाल का तिरसट बंदा आहे, बहुतांश हटकेच चित्रपट करतो, मला स्वतःला तो आवडत नाही ती गोष्ट वेगळी, पण देओल कंपनीमध्ये त्याच्या या गुणाचे कौतुक आहे, अन्यथा बाकी सारे जट यमला पगला दिवाणाचे सिक्वेल वर सिक्वेल करण्यातच धन्यता मानणारे आहेत.

मग अभय देओल ने देव D करून परत जिवंत केला का ? ;-० >> jokes apart माझ्यापुरते म्हणायचे तर आजच्या जमान्याला शोभेलसा देवदास करून अनुराग कश्यपने नक्कीच Dev D मार्फत देवदास जिवंत केला.

रश्मी, मला ते कोणी म्हटलय ते आठवत नाही असे वर लिहिलय ना.

बापरे, या धाग्यावर अचानक २० / २२ प्रतिसाद पाहून आधी आनंदाश्चर्याने वाटले की देवेन यांच्याविषयी बरेच काही लिहिले गेले की काय ? हे म्हणजे एखादा चित्रपट सुरूवातीला फारसा चालत नाही आणि नंतर जोर पकडतो तसे. Happy
असो, चर्चा जारी रहें !!!

बेशरम ह्या सिनेमाबद्दलः देवेन वर्मानी त्यात स्त्रीभूमिका केली हे खरे. मुलगा, बाप व आई हे सगळे देवेन वर्माच. आता हे आवडावेच असा आग्रह नाही. पण मला त्यात ओंगळ, बीभत्स काहीही आढळले नाही. कमरेखालचे विनोद नाहीत. देवेन वर्माची स्त्रीच्या रुपातील वेषभूषा वगैरे सभ्यच वाटली. एकंदरीत ह्या सिनेमाला पॉलिश नव्हते. पण त्यातल्या बाकी हिंसा वगैरे गोष्टी ह्या इतक्या खालच्या पातळीवरच्या वाटल्या नाहीत.
ए के हन्गलचे कपडे उतरवले जातात हे खरे पण एक सच्चा गांधीवादी अशा भूमिकेतून तो ती विटंबना सहन करतो आणि त्याच्या मुलालाही ती सहन करण्याचा आग्रह करतो. ह्या प्रकाराचा त्याच्यावर काहीही वाईट परिणाम होत नाही. नंतर तो आत्महत्या करतो ते कुठल्यातरी त्याने सही केलेल्या कागदात फेरफार करून घोटाळा करून त्याच्यावर लाचखोरीचा आरोप केल्यानंतर. कपडे उतरवण्याचे चित्रणही असे काही भयानक, अंगावर येणारे नव्हते.
नायकाच्या बहिणीवरील बलात्काराचे चित्रण इतके भयानक नव्हते. किंबहुना त्या काळात नायकाची बहीण आणि बलात्कार ह्यांचे अतूट नाते होते. (उदा. अमिताभचा अदालत) त्यामुळे असा प्रसंग ह्या सिनेमातही ते आहे ह्यात आश्चर्य नाही.
पुन्हा एकदा, हा सिनेमा दिग्दर्शनाचा उत्कृष्ट नमुना होता असे आजिबात नाही. पण त्या काळातल्या बाकी सिनेमांच्या मानाने त्यात फार भयानक, विकृत, ओंगळ असे काही होते असे मला वाटले नाही.

बाकी देवेन वर्माच्या अभिनयाच्या कारकीर्दीबद्दल बाकी लोकांनी म्हटले त्याच्याशी मी सहमत आहे.

शेंडेनक्षत्र, धन्यवाद !
कदाचित देवेन यांनी या चित्रपटानंतरच ठरविले असेल की वेगळ्या प्रकारच्या भुमिका करायच्या नाहीत.

पण अंगूरचा रिमेक शाहरूखला घेऊन झाला तर धमाल होऊ शकते..>>

मला आता तुमच्याबद्दल काही जबरदस्त शंका येऊ लागल्या आहेत. आता यापुढे किमान या बाफवर तुमच्याकडून शाहरुख मधला शा आला तर मी काय बोलेन सांगता येत नाही. सो प्लीजच शटाप.

देवेन वर्मा म्हणजे अंगुर हे समीकरण फिट्ट आहे. बाकी चित्रपटाबद्दलही माहीती मिळालीयं.

बाकी, सो प्लीजच शटाप ला खुप अनुमोदन. इरिटेट होतय राव आता हे सगळ Sad

कोकणस्थ तुम्ही का रागवताय्?:फिदी: ऋन्मेषला नवीन धागा काढायला सान्गा, मी, शाहरुख आणी माझी ग''फ्रेन्ड. बास! येकदम हिट्ट होईल बघा तो धागा.:फिदी:

पुढचं सगळं लेखन आता ब्लॉगवरच होऊदे!>> १००००००

आबासाहेब +१

रश्मी, अहो वात आणलाय या माणसाने. उद्या म्हणेल.......जौद्या.

चला आता धाग्याच्या मूळ विषयाकडे वळा.

Pages