श्रद्धांजली

निरोप द्यावा.... (श्रद्धांजली - ए. के. हनगल R.I.P. A K Hangal)

Submitted by रसप on 26 August, 2012 - 01:40

किती जणांनी समोर माझ्या
अर्ध्यावरती डाव सोडला
अखेरच्या वळणावरती मी
परिस्थितीचा घाव सोसला

मीच अडकलो घरात माझ्या
धडपड केली सुटकेसाठी
मदतीच्या हातांनी माझे
श्वास वाढले घटिकेसाठी

सर्वाधिक वजनाचे ओझे
कुठले असते खांद्यावरती ?
मीच जाणले - 'आयुष्यच ते'
श्वासामागुन श्वास वाढती..!

दुर्दैवी अन खडतर जीवन
कधीच नव्हते नको वाटले
झळा वर्तमानाच्या लागुन
पाणी डोळ्यांतले आटले

अखेर झाली माझी सुटका
शेवटचा हा सलाम घ्यावा
धडपडणारा कलाकार मी
मंचावरुनी निरोप द्यावा....

....रसप....
२६ ऑगस्ट २०१२
श्रद्धांजली - ए. के. हनगल
http://www.ranjeetparadkar.com/2012/08/rip-k-hangal.html

विषय: 

८८ हे काय वय होते का जायचे ?

Submitted by किंकर on 4 December, 2011 - 00:54

८८ हे काय वय होते का जायचे ?
सर्व साधारण आयुष्यमान,वाढते वयोमान विचारात घेतले तर याचे उत्तर होय असेच आहे. पण आज हा प्रश्न ज्यांच्या जाण्याचे संदर्भात विचारला गेला आहे त्यांच्या बाबत खरेतर हे काही जाण्याचे वय नव्हते हेच खरे. आपल्या सर्वांचे लाडके आणि अनेक तरुणींच्या मनातील'कॅटबरी चव' जिवंत ठेवणारे चॉकलेट हिरो देवानंद यांचे नुकतेच निधन झाले. त्यासंदर्भात मात्र नक्कीच त्यांचे जाण्याचे वय नक्कीच झाले नव्हते.आणि म्हणूनच आपल्या मायबोलीकारांपैकी मित यांनी म्हटल्या प्रमाणे ८८ हे काय वय होते का जायचे ! हे अगदी भाव पूर्णतेने म्हटले आहे असे मनाला नक्की पटते.

गुलमोहर: 

बाकी ठीकेकर

Submitted by स्वातीपित्रे on 1 October, 2011 - 02:23

# १ #

येह जमीन ही आसमान, येह जमीन ही आसमान, हमारा कल हमारा आज, बुलंद भारत कि बुलंद तस्वीर, हमारा बजाज..

गुलमोहर: 

आपण कधी शिकणार आहोत धडा घ्यायला?

Submitted by विशाल कुलकर्णी on 26 November, 2010 - 00:20

२६/११ च्या त्या काळरात्रीला आज शुक्रवारी दोन वर्षे पुर्ण होत आहेत. त्या रात्री दहशतवाद्यांनी मांडलेले थैमान, छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक तसेच इतरत्र गेलेले निरपराधांचे बळी, हा हल्ला परतवुन लावताना धारातीर्थी पडलेले वीर अशा या क्रौर्य, शौर्य आणि वेदनेला आज दोन वर्षे होत आहे. त्या हत्याकांडाला बळी पडलेल्या सर्व असहाय नागरिकांना तसेच हा हल्ला छातीवर झेलुन स्वतःच्या प्राणाचे बलिदान देवुन दहशतवादाला आपले सामर्थ्य, आपली एकजुट दाखवुन देणार्‍या सर्व ज्ञात्-अज्ञात महावीरांना विनम्र श्रद्धांजली !

"हुतात्मा हेमंतजी करकरे, हुतात्मा विजय साळसकरसाहेब आणि हुतात्मा अशोकजी कामटे"

गुलमोहर: 
Subscribe to RSS - श्रद्धांजली