Submitted by रसप on 26 August, 2012 - 01:40
किती जणांनी समोर माझ्या
अर्ध्यावरती डाव सोडला
अखेरच्या वळणावरती मी
परिस्थितीचा घाव सोसला
मीच अडकलो घरात माझ्या
धडपड केली सुटकेसाठी
मदतीच्या हातांनी माझे
श्वास वाढले घटिकेसाठी
सर्वाधिक वजनाचे ओझे
कुठले असते खांद्यावरती ?
मीच जाणले - 'आयुष्यच ते'
श्वासामागुन श्वास वाढती..!
दुर्दैवी अन खडतर जीवन
कधीच नव्हते नको वाटले
झळा वर्तमानाच्या लागुन
पाणी डोळ्यांतले आटले
अखेर झाली माझी सुटका
शेवटचा हा सलाम घ्यावा
धडपडणारा कलाकार मी
मंचावरुनी निरोप द्यावा....
....रसप....
२६ ऑगस्ट २०१२
श्रद्धांजली - ए. के. हनगल
http://www.ranjeetparadkar.com/2012/08/rip-k-hangal.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हंगल साहेब सलाम. जीवनाचेच ओझे
हंगल साहेब सलाम. जीवनाचेच ओझे झाले होते त्यांना
अखेर झाली माझी सुटका शेवटचा
अखेर झाली माझी सुटका
शेवटचा हा सलाम घ्यावा
धडपडणारा कलाकार मी
मंचावरुनी निरोप द्यावा.... >>
ए. के. हनगल यांना
ए. के. हनगल यांना श्रद्धांजली.
इतना सन्नाटा क्यूं है भाई?
इतना सन्नाटा क्यूं है भाई?
अतिशय गाजलेला साईड हीरो.
अतिशय गाजलेला साईड हीरो.
ए. के. हनगल यांना
ए. के. हनगल यांना श्रद्धांजली.
ए. के. हनगल यांना
ए. के. हनगल यांना श्रद्धांजली.
सचमुच सन्नाटा छा गया!!!
सचमुच सन्नाटा छा गया!!!
सचमुच सन्नाटा छा गया!!!
कविता छानच !
कविता छानच !