गाढ झोपेत असलेल्या त्याच्या चेहऱ्यावर मानवी भावनांची जणू जत्राच भरली होती. मध्येच त्यावर एखादी स्मित लकेर उमटून जाई, मधेच त्याचा चेहरा पूर्ण जगाचे दुःख पचवल्यासारखा करुण होऊन पिचून निघे. स्वप्न बघत होता हो तो. हास्याचा भाग म्हणजे त्याचे पितृतुल्य गुरुजी, घरून पळून आलेल्या बासरीवेड्या पोराला त्यांनी दिलेला थारा. त्याच्या चेहऱ्यावर अगोदर आलेलं स्मित त्याला आठवण देत होतं, पहिल्या दिवशी गुरुजींनी जेव्हा त्याला पोकळ वेळूच्या भोके पाडलेल्या काठीत भावना रित्या करणे शिकवणे सुरू केले होते तेव्हा तो जागेपणी असाच स्मित करत होता.
[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा. ]
*********************
दुनियेचे जीवघेणे इशारे
आणि लचके तोडण्यास सरसावलेले हात
चौफेर वखवखलेली नजर
आणि अंग चोरून चालणारी ती…
दुनियेच्या खोचक कमेंट सहन करत
कानाडोळा करून, रस्ता कापणारी
थोडी घाबरलेली,
मनात असंख्य विचारांचं काहूर घेवून
एकटी घराबाहेर पडलेली ती….
आकाशाकडे झेपावणार्या झाडाची फांदी प्रणवने रेखाटली आणि पेन्सिल खाली ठेवली. चित्राला जुनं, विटकट रुप आणण्याचा तो कसोशीने प्रयत्न करत होता. १८६० च्या काळातल्या शेताचं, खोपटेवजा झोपडीचं आणि त्या झाडाचं त्याने वेगवेगळया बाजूने खूपवेळ निरीक्षण केलं. हिरवागार मळा, कडे कडेला नजर खिळवून टाकणारी फुलझाडं, इकडे तिकडे बागडणारी मुलं. सुंदर चित्र होतं. पण मनात घर करुन राहिलेलं त्या शेतात राबणार्या गुलामांचं वर्णन चित्रात काही केल्या जिवंत होत नव्हतं. तो तसाच स्तब्ध उभा राहिला. शेजारच्या खोलीतून येणारे गाण्याचे स्वर आत्ता कुठे त्याच्या मनात झिरपले. अमिता एरोबिक्स करत असावी.