रिक्त
Submitted by मोहना on 22 January, 2014 - 18:40
आकाशाकडे झेपावणार्या झाडाची फांदी प्रणवने रेखाटली आणि पेन्सिल खाली ठेवली. चित्राला जुनं, विटकट रुप आणण्याचा तो कसोशीने प्रयत्न करत होता. १८६० च्या काळातल्या शेताचं, खोपटेवजा झोपडीचं आणि त्या झाडाचं त्याने वेगवेगळया बाजूने खूपवेळ निरीक्षण केलं. हिरवागार मळा, कडे कडेला नजर खिळवून टाकणारी फुलझाडं, इकडे तिकडे बागडणारी मुलं. सुंदर चित्र होतं. पण मनात घर करुन राहिलेलं त्या शेतात राबणार्या गुलामांचं वर्णन चित्रात काही केल्या जिवंत होत नव्हतं. तो तसाच स्तब्ध उभा राहिला. शेजारच्या खोलीतून येणारे गाण्याचे स्वर आत्ता कुठे त्याच्या मनात झिरपले. अमिता एरोबिक्स करत असावी.
विषय: