रांगोळी
मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - रांगोळी" १७ सप्टेंबर
मोठ्ठी मोठ्ठी घरं, सारवलेलं अंगण आणि त्यावरची सुबकशी रांगोळी.. यथावकाश घरं आटोपशीर झाली, अंगणं हरवली, रांगोळीही काढण्या ऐवजी चिकटवता यायला लागली... पण रांगोळीची सुबकता कधीच कमी झाली नाही.
याच सुबकतेला माबोकरांसमोर मांडा आणि खेळा खेळ झब्बू रांगोळींचे.
नेमकं करायचंय काय? तर तुम्ही काढलेल्या, पाहिलेल्या,प्रसंगी बनवलेल्या देखील रांगोळींचे फोटोज इथे टाकायचेत आणि एकमेकांना झब्बू द्यायचेत.
हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
चैत्रांगण
राजा शिवछत्रपती!
मी प्रयत्न केला होता शिवाजीमहाराजांची छबी रांगोळीत उतरवायचा.
माझी दिवाळीतली रांगोळी
माझ्या ऑफिसातल्या रांगोळ्या - २०१२
सगळ्या मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
माझ्या ऑफिसातल्या हौशी कलावंतानी दिवाळीच्या स्वागतासाठी घातलेल्या रांगोळ्या इथे देतेय.
खालची रांगोळी रंगवलेले तांदुळ वापर्पुन घातलीय.
रांगोळी पोर्ट्रेट्स
रांगोळी पोर्ट्रेट्स काढायला लागले तेव्हाच्या सुरुवातीच्याच पहिल्या दोन रांगोळ्या.
१) बाबा आले.....
हे पोर्ट्रेट माझे रांगोळी प्रकारातील पहिले पोर्ट्रेट आहे (कळतंच आहे ते ) टेक्निकल बाबी काहिच माहित नसल्याने डायरेक्ट जमिनीवर आणि तेही चौरस न आखता काढलं होतं साध्या फळ्यावरच्या खडूने काढून मग रंगवलं होतं. प्रोफेशनल कलर्स वापरले नव्हते. फोटो काढेपर्यंत रांगोळी हलली गेली आहे. तरी गोड मानून घ्या जुन्या मायबोलीवर काही दिवस टाकली होती.
२) स्वामी विवेकानंद -
रांगोळ्या व दिवाळी फराळ
नमस्कार मायबोलीकर मित्रमैत्रिणींनो,
आज "व्हिनस" तुमच्याजवळ सादर करत आहे, मी काढलेल्या रांगोळ्या व स्वत:च्या हाताने एकटीने केलेला दिवाळी फराळ..........आता श्रावण सुरू झाला आहे .... त्यामुळे हा प्रकाशचित्रांचा धागा समयोचित वाटत नाही, पण कधीपासुन हे फोटो मायबोलीवर टाकीन टाकीन असे करत होते, पण वेळेअभावी शक्य झाले नाही, आज मस्त वेळ मिळाला आहे त्यामुळे तुमच्याबरोबर शेअर करते, चला तर मग करु सुरुवात..............
१.
रांगोळी
आमची रांगोळी!_ऑस्ट्रेलिया
दिवाळी-मेळा २०११, पॅरामेटा स्टॅडीयम, न्यू साऊथ वेल्स.
ऑस्ट्रेलीयात रांगोळी काढायची म्हणजे दारावर पांढरा हत्ती झुलवण्या सारखं. भारतात विस-तीस रुपयात होणार्या रांगोळीसाठी इथे दिडशे-दोनशे डॉलर सहज जातात. यानंतर लांबून लांबून रांगोळी-रंग आणायचे, स्टेडीयमच्या मॅनेजमेंट्ला समजवायचे ई. नाना प्रश्न समोर येतात. मित्र-मैत्रीणींचे मदतीचे हात मिळाले आणि या सर्वांवर मात करून यावर्षीही आम्ही रांगोळी साकार केली.