रांगोळी
फुला पानांची नक्षी (रांगोळी)
ही मी काढलेली दिवाळीतील रांगोळी आहे. ह्या रचनेसाठी शेवंती, झेंडू, त्याच्या पाकळ्या, गुलछडी गावठी गुलाबाच्या पाकळ्या, हिरवी पाने वापरली आहेत. जसे सुचले तशी रचत गेले फुल. गुलछडीच्या नैसर्गिक बाक आलेल्या देठांमुळे मला मध्ये गुलछडीचे चक्र करता आले आणि वर दोन फुले एकमेकांना फ्रिहॅन्डकरुन पाकळ्या करता आल्या.
माझ्या ऑफिसातली रांगोळी स्पर्धा
दिवाळीनिमित्त ऑफिसात रिटेल टिमने रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. वेगवेगळ्या ब्लॉक्सनी आधी रांगोळ्या घातल्या होत्या, त्यांचे आयोजन वेगळे होते आणि हे आयोजन वेगळे होते. इथे सगळ्यांना २x२ चा चौकोन दिला आणि फक्त ५ रंग दिले, कोणाला चाळण किंवा इतर काही वापरायचे असेल तर ते त्यांचे त्यांनी आणायचे. रंग मात्र दिलेलेच वापरायचे असे बंधन होते. दिलेल्या रंगात मिठ, तांदुळ किंवा इतर काही मिसळायचे स्वातंत्र्य होते.
खाली रांगोळीत गढलेल्या रांगोळीवीरांचे फोटो
माझ्या ऑफिसातल्या रांगोळ्या
दिवाळीनिमित्त माझ्या ऑफिसातल्या विविध ब्लॉक्स मधल्या कलाकार मंडळींनी आपापली हस्तकला सादर केली, त्याची ही एक झलक...
१. तांदुळ रांगोळीच्या रंगात रंगवुन ही रांगोळी घातलीय -
२. मिठ रांगोळीच्या रंगात रंगवुन ही रांगोळी घातलीय -
३. ह्या सगळ्या फुलांच्या रांगोळ्या
माझी फुलांची रांगोळी
आमच्या साखरचौतीच्या गणपतीच्या दिवशी मी ही रांगोळी काढली होती. खुप फुले उरली होती त्यातुनच ही रांगोळी काढली झर्ब्रेरियाची फुले आदल्या दिवशी वाहिलेल्या कंठीतुन काढली. त्यावरच ते मणी होते. खालची टोकेरी पाने गेलार्डीयाच्या काडीतील कापुन घेतले. हिरविगार गोलकार पाने आमच्य कंपाउंडच्या झाडाची काढली आहेत. त्यावर तगडीच्या कळ्या लावल्या आहेत. तसेच मध्ये मध्ये गेलार्डीया आणि ऑरगंडी ची फुले लावली आहेत. ऑरगंडीच्या फुलांच्या खाली कडू मेहंदीची पाने लावली आहेत. हयावर्षीची ही रांगोळी खास आकर्षण ठरली होती.