हिम्सकूल यांचे रंगीबेरंगी पान

मराठी कॅलिग्राफी टी-शर्ट्स

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आजपासून अत्रे सभागृह, पुणे येथे मराठी कॅलिग्राफी केलेल्या टी-शर्टचे प्रदर्शन आणि विक्री सुरु होत आहे.

हे टी-शर्ट सिल्व्हर लाईन ही कंपनी वितरीत करणार आहे.. ह्या टी-शर्टवरची सगळी चित्रे प्रसिद्ध चित्रकार अच्युत पालव ह्यांनी काढलेली आहेत.

आज संध्याकाळी ५ वाजता डी.एस.कुलकर्णी ह्यांच्या हस्ते ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे... सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे..

http://epaper.loksatta.com/c/2225526

( इथे उपलब्ध असणारे टी-शर्ट आमच्या ऑफिस(प्राईम इंटरप्राईजेस) मध्ये छापलेले आहेत..)

विषय: 
प्रकार: 

स्वरचित्र फेब्रुवारी २०१३

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

पुणे आकाशवाणी वरुन दर रविवारी प्रकाशित होणार्‍या स्वरचित्र ह्या कार्यक्रमात फेब्रुवारी महिन्याचे विशेष गीताची चाल यंदा माझे आजोबा (म. ना. कुलकर्णी - मनाकु१९३०) ह्यांची आहे...

आणि ह्यावेळेस विशेष म्हणजे हे गीत आपल्या मायबोलीवरची कवयित्री प्राजु हिने लिहिलेले आहे..

आणि गाणार आहे मधुरा दातार...

तेव्हा नक्की ऐका फेब्रुवारी महिन्याच्या दर रविवारी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी पुणे आकाशवाणीवर "स्वरचित्र"

विषय: 
प्रकार: 

गणेशोत्सव २०१२ - पुणे

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

प्रचि १ - श्री कसबा गणपती मंडळ - मानाचा पहिला गणपती


.
.
प्रचि २


.
.
प्रचि ३


.
.
प्रचि ४

शब्दखुणा: 

परसदारातले पक्षी

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

आमच्या घराच्या बाल्कनीमधून दिसलेले काही पक्षी....

काही फोटो जरा धूसर आलेले आहेत... नवीन कॅमेरा असल्याने अजून पूर्णपणे हात बसलेला नाही... अजून चांगले फोटो जसे काढले जातील तसे इथे येतीलच..

शशांक आणि भुंग्याने सगळ्यांची नावे सांगितल्या बद्दल धन्यवाद...

१. अ‍ॅशी व्रेन वॉर्बलर (वटवट्या)

२. अ‍ॅशी व्रेन वॉर्बलर (वटवट्या)

शब्दखुणा: 

दीपावली रांगोळी - आबा आणि मी..

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

दीपावली रांगोळी

DSC09730_1.JPGDSC09776_1.JPGDSC09782_1.JPG

प्रकार: 

आकाशकंदील - बांबूच्या चोयट्यांपासून

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बांबूच्या चोयट्यांपासून करायच्या चौकोनी आकाश कंदीलाची कृती...
१८ इंच लांबीच्या बांबूच्या चार चोयट्या.. १० इंच लांबीच्या बांबूच्या ३२ चोयट्या.. निरनिराळ्या रंगाचा पतंगाचा कागद, फेव्हीकोल आणि भरपूर दोरा,
सगळ्या चोयट्या छोट्या सुरीने किंवा खोरपेपरने साफ करुन घ्याव्यात.
१८ इंची चोयट्या उभ्या वापरायच्या आहेत तर १० इंची आडव्या...
प्रत्येक कोपर्‍यापाशी तीन किंवा चार काड्या एकत्र येणार आहेत.
पहिल्यांदा १० इंच लांबीच्या चोयट्या वापरुन चार चौरस तयार करुन घ्यावेत. ह्या चौरसांच्या एका कोपर्‍यात एक १८ इंची काडी लावायची आहेत... अश्या चार कोपर्‍यात चार काड्या एका चौकोनाला लावाव्यात.

विषय: 
प्रकार: 

स्वरचित्र

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

स्वरचित्र - पुणे आकाशवाणी केंद्रावर दर रविवारी सादर होणारा एक विशेष कार्यक्रम.

मधली काही वर्षे हा कार्यक्रम काही कारणास्तव प्रसारीतच होत नव्हता... गेल्या चार महिन्यांपासून नविन स्टेशन डायरेक्टर आले आणि त्यांनी हा कार्यक्रम परत चालू केला...

महिन्याच्या दर रविवारी सकाळी बरोबर ८ वाजून ४० मिनिटांनी एक विशेष गीत पुणे आकाशवाणीच्या ७९२ किलोहर्ट्झ ह्या वारंवारितेवर म्हणजेच पुण्याच्या AM वाहिनीवर प्रसारीत केले जाते. ह्या गीताचे वैशिष्ट म्हणजे हे पूर्ण महिन्यासाठीचे विशेष गीत असते..

विषय: 
प्रकार: 

||श्री गणेशा||

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

रंगबेरंगीची सुरुवात कशी करावी हेच कळत नव्हते.. पण गणपती उत्सव सुरु झाला आणि म्हटले ह्या कलेच्या देवतेच्या विविध रंगी विविध ढंगी प्रकाश चित्रांनी ही सुरुवात करावी...

    विषय: 
    Subscribe to RSS - हिम्सकूल यांचे रंगीबेरंगी पान